23 December 2024 6:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

उद्योजक व्हायचंय? | तब्बल 40% मार्जिन देणाऱ्या Generic Aadhaar'ची फ्रेंचायजी कशी घ्याल? - वाचा सविस्तर

Generic Aadhaar medicine store franchise

मुंबई, २० जुलै | मागील काही वर्षांपासून Generic औषधांना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच सामान्य जनतेचा कलही Generic औषधे घेण्यामागे वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्य औषधांच्या क्षेत्रात आताच्या घडीला मोठी स्पर्धा नसल्याचे दिसून येत आहे. यातच आता Generic Aadhaar या कंपनीची फ्रेंचायजी सुरु करून चांगले पैसे कमावता येऊ शकतात. मेडिकल चालवणाऱ्या व्यवसायिकांनाही Generic Aadhaar ची फ्रेंचायजी सुरु करता येते. विशेष म्हणजे अन्य औषध कंपन्यांच्या फ्रेंचायजीसमध्ये तुम्हाला १५ ते २० टक्के मार्जिन मिळते. मात्र, Generic Aadhaar ही कंपनी फ्रेंचायजी चालवणाऱ्यांना तब्बल 40 टक्के मार्जिन देते, असे सांगितले जात आहे.

Generic Aadhaar च्या औषधांच्या किंमती कमी असल्याने त्यांना मागणी जास्त असते. परिणामी खपही चांगला होत असल्याचे बोलले जाते. याशिवाय, कंपनीकडून टेक्निकल सपोर्ट, लोकल ऑनलाईन ऑर्डर अशा सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. आताच्या घडीला Generic Aadhaar जवळपास ७०० ते १००० प्रकारच्या जेनेरिक औषधांची विक्री करते.

Generic Aadhaar च्या संकेतस्थळावर भेट द्या:
* पुढील वेबसाईटवर क्लिक करा अथवा लिंक कॉपी करा: https://genericaadhaar.com/franchise-opportunities.php
* Business Opportunity असा पर्याय दिसेल.
* त्यावर क्लिक केल्यास फ्रेंचायजी घेण्यासाठीचा फॉर्म मिळेल.
* याठिकाणी आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता, शहराचे नाव, ईमेल आयडी असा सर्व तपशील भरावा लागतो.
* याशिवाय, तुम्ही संकेतस्थळावर नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधूनही फ्रेंजायजीची माहिती मिळवू शकता.

संपूर्ण देशभरात ३० हजार रिटेल आऊटलेट उघडण्याचे लक्ष्य कंपनीने डोळ्यांसमोर ठेवले आहे. प्रत्येक शहरात कंपनीची १०० दुकाने असतील, अशी योजना आहे. आतापर्यंत देशातील १८ राज्यांमध्ये Generic Aadhaar च्या फ्रेंचायजी सुरू झाल्या आहेत. सन २०१८ मध्ये ठाण्यातील अर्जुन देशपांडे या तरुणाने Generic Aadhaar च्या स्टार्टअपची संकल्पना मांडली होती. ही संकल्पना उद्योगपती रतन टाटा यांना भावली. त्यामुळेच रतन टाटा यांनी Generic Aadhaar कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

अलीकडेच टाटा समूहाने 1MG कंपनीच्या शेअर्समधील मोठा हिस्सा खरेदी केला आहे. फार्मसीसंबंधी कोणताही बिझनेस कुठेही सुरु केला, तरी हमखास उद्योग चालतो, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Who to get Generic Aadhaar medicine store franchise details in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#startup(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x