15 January 2025 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

RVNL Share Price | ब्रेकआउट देणार RVNL शेअर! तज्ज्ञांच्या खरेदीचा सल्ला, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला दक्षिण रेल्वेच्या (NSE: RVNL) चेन्नई विभागातील रेल्वे प्रकल्पाचे काम मिळाले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 111 कोटी रुपये आहे. हे काम पुढील 18 महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

आरव्हीएनएल कंपनीला या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत स्थानकांवर विद्यमान DCTC सोबत MSDAC ची तरतूद करायची आहे. तसेच दक्षिण रेल्वेमधील चेन्नई विभागातील MAS-GDR आणि MSB-TBM स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सेगमेंट बसवण्याचे काम देण्यात आले आहे. आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.97 टक्के वाढीसह 587.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीच्या एकत्रित नफ्यात जवळपास 35 टक्क्यांनी घट झाली होती. कंपनीचा नफा 223.92 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीने 343.09 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आरव्हीएनएल कंपनीचे एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या तिमाहीत 5,853.18 कोटी रुपये नोंदवले गेले होते. जे जून तिमाहीत 4,336.75 कोटी रुपयेवर घसरले होते.

मंगळवारी आरव्हीएनएल स्टॉक 575.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,20,097.16 कोटी रुपये आहे. मागील एका आठवड्यात आणि 2 आठवड्यात आरव्हीएनएल स्टॉक अनुक्रमे 2.65 टक्के आणि 1.25 टक्के वाढला होता. मागील एका महिन्यात आणि 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत अनुक्रमे 4.32 टक्के आणि 53.03 टक्के वाढली होती. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 116.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीचे शेअर्स 365.33 टक्के, 2 वर्षात 1684.98 टक्के, 3 वर्षात 1955.44 टक्के आणि 5 वर्षात 2156.56 टक्के वाढले होते.

आरव्हीएनएल कंपनीने आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना दोन वेळा लाभांश वाटप केला आहे. या कंपनीने एप्रिल 2023 मध्ये 1.77 रुपये आणि सप्टेंबर 2023 मध्ये 0.36 रुपये लाभांश वाटप केला होता. तर मार्च 2022 मध्ये 1.58 रुपये आणि सप्टेंबर 2022 मध्ये 0.25 रुपये लाभांश वाटप केला होता. नोव्हेंबर 2021 मध्ये या कंपनीने 0.44 रुपये लाभांश वाटप केला होता. जून 2024 मध्ये 450 रुपये किमतीवर ब्रेकआउट दिल्यानंतर आरव्हीएनएल स्टॉक 647.00 रुपये किमतीवर पोहचला होता. त्यांनतर हा स्टॉक पुन्हा 550 रुपये किमतीवर आला होता. तज्ञांच्या मते, पुढील काळात हा स्टॉक पुन्हा 640 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

News Title | RVNL Share Price NSE: RVNL 28 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(162)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x