24 November 2024 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Share Market Learning | IPO म्हणजे काय ? | IPO कसा खरेदी करायचा ? - माहितीसाठी वाचा

What is IPO

मुंबई, २६ ऑगस्ट | ज्यावेळेस कोणतीही कंपनी आपले शेअर विक्रीसाठी, सामान्य लोकांसाठी खुले करते त्याला IPO असे म्हणतात.यालाच आपण प्रायव्हेट कंपनी पब्लिक लिमिटेड होणे असे देखील म्हणू शकतो. IPO येण्यापूर्वी कंपनीचे खूप कमी शेअरहोल्डर किंवा मालक असतात त्यामध्ये संस्थापक, इन्व्हेस्टर आणि व्हेंचर कॅपिटल फंड इन्व्हेस्टर इत्यादी असतात. पण आईपीओ आल्यानंतर सामान्य लोक सुद्धा यामध्ये सामील होतात आणि डायरेक्ट कंपनीकडून शेअरची खरेदी आपण करू शकतात व त्यामुळे आपण एकप्रकारे काही प्रमाणात कंपनीचे मालक बनत असतो.

IPO म्हणजे काय ? | IPO कसा खरेदी करायचा ? – What is IPO in Marathi :

IPO मध्ये कोणकोणत्या प्रकारचे शेअर उपलब्ध असतात ?

IPO मध्ये तीन प्रकारे शेअर चे वर्गीकरण होत असते.
1 – Qualified Institutional Buyers (QIBs)
2- Non Institutional Investors (NIIs)
3- Retail Individual Investors (RIIs)

आपण जो IPO खरेदी करतो तो तिसऱ्या पर्यायांमध्ये मोडतो.

IPO मध्ये आपणास एक वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून 10,000 -15,000 रुपयांच्या लहान लॉटमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. IPO हा लॉट मध्ये खरेदी करावा लागतो. एक लॉटमध्ये किती शेअर असतात हे IPO च्या माहिती मध्ये दिलेले असते. आयपीओमध्ये तुम्ही जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

जर उपलब्ध असलेल्या शेअरच्या तुलनेत कमी शेअर खरेदी करण्यासाठी अर्ज आले तर IPO प्रत्येकाला दिला जातो. याऊलट जर उपलब्ध शेअरपेक्षा जास्त शेअर्स साठी IPO चे अर्ज आले तर मग लॉटरी सारखे शेअरची विभागणी केली जाते.त्यामध्ये काही लोकांना शेअर मिळतात तर काही लोकांना मिळत नाही. जास्त वेळा IPO हा oversubscribe होतो म्हणजेच जास्त लोक IPO साठी अर्ज करतात. त्यामुळे सर्वच लोकांना IPO मध्ये शेअर मिळत नाही.

कंपन्या IPO का आणतात ? – Why companies bring IPO in Marathi :

1- कंपनीची वाढ आणि विस्तारासाठी भांडवल उभे करणे:
प्रत्येक कंपनीला आपली ऑपरेशन्स वाढविण्यासाठी, नवीन उत्पादने तयार करण्यासाठी किंवा विद्यमान कर्ज फेडण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. त्या वेळेस बँकांकडून कर्ज घेण्यापेक्षा ,कंपनीसाठी आवश्यक असलेले भांडवल मिळविण्याचा IPO हा एक चांगला मार्ग आहे.

2- मालकांना आणि प्रारंभिक गुंतवणूकदारांना पैसे कमविण्यासाठी:
जे सुरुवातीचे गुंतवणूकदार व कंपनीचे मूळ मालक आहेत त्यानां जर पैसे मिळवायचे असतील तर ते आपल्या मालकीच्या शेअर पैकी काही शेअर IPO च्या माध्यमातून विक्री करून पैसे मिळवले जाते. व्हेंचर भांडवलदार हे परतावा मिळवण्यासाठी आणि कंपनीमधून बाहेर पडण्यासाठी कंपनीमध्ये असलेला आपला हिस्सा IPO मार्फत विक्री करतात.

3- उत्पादने आणि सेवा सार्वजनिक करणे:
शेअर बाजारात आयपीओ हा एक मोठ्या उत्सवा सारखा असतो . नवीन IPO आल्यावर बर्‍याच चर्चा आणि प्रसिद्धी मिळते. एखाद्या बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपली उत्पादने आणि सेवा सार्वजनिक करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

कंपनीला IPO आणण्यासाठी काय करावे लागते ?

1 – एक इन्व्हेस्टमेंट बँक निवडणे:
बँक कंपनीला आर्थिक गोष्टी बाबतीत सर्व मदत पुरवते.

2 – Red Herring prospectus बनवणे:
ज्यामध्ये IPO बाबत सर्व गोष्टींची माहिती आपल्याला मिळते.

3 -सेबीकडून IPO साठी मान्यता मिळवणे:
सेबी कंपणीबाबत सर्व गोष्टी तपासून IPO ला मान्यता देते किंवा जर काही कमी असेल तर त्यामध्ये बदल करण्यास सांगते.त्याचप्रमाणे IPO ची तारीख सुद्धा सेबी देत असते

4- स्टॉक एक्सचेंज कडून मान्यता मिळवणे:
सेबी कडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर स्टॉक एक्सचेंज कडून IPO साठी मान्यता मिळणे आवश्यक असते .

वरील सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावर कंपनी आपला IPO बाजारात आणते.

IPO संबंधित शब्द:

Lot size:
IPO मध्ये आपल्याला शेअर हे एका संचात म्हणजे लॉट मध्ये खरेदी करावे लागतात. जसे आपण शेअर बाजारात एक शेअर खरेदी करू शकतो तसे IPO मध्ये नाही.IPO साठी लॉट size दिली जाते. समजा , ABC या IPO ची लॉट size 50 असेल तर आपणास या कंपनीचे कमीत कमी 50 शेअर म्हणजेच 1 लॉट खरेदी करावा लागेल.

Price Band:
IPO मध्ये ज्या दोन किमतीमध्ये आपल्याला शेअर खरेदीसाठी उपलब्ध असतो त्या किमतीला Price Band असे म्हणतात. जर प्राइस बँड प्रति शेअर 100 – 110 रुपये असेल तर आपण 100 रुपयांपेक्षा कमी किंवा 110 रुपयांपेक्षा जास्त किमतीवर शेअर खरेदी करू शकत नाही.

Cut-off Price:
Cut-off Price म्हणजेच कमीत कमी किंमत ज्यावर आपण IPO खरेदीसाठी बोली लावू शकतो.

Listing Date:
ज्या दिवशी आयपीओ शेअर बाजारात समाविष्ट होतो म्हणजेच लिस्ट होतो त्याला लिस्टिंग डेट म्हणतात. आपण आयपीओमध्ये प्राप्त झालेल्या शेअर्सची विक्री करू शकता आणि जर आयपीओमध्ये शेअर मिळाले नसल्यास कंपनीचे शेअर्स लिस्टिंग नंतर खरेदी करू शकता.

Oversubscribed:
ज्यावेळेस IPO मध्ये खरेदी साठी उपलब्ध असलेल्या शेअरपेक्षा जास्त शेअर्स खरेदीसाठी बोली लागते त्याला IPO Oversubscribed असे म्हणतात.

IPO चे फायदे – Benefits of IPO investing :

1- नवीन आणि चांगल्या कंपनीत गुंतवणूक:
ज्यावेळेस एखाद्या नामांकित कंपनी आपला IPO बाजारात आणते त्यावेळेस आपल्याला कमी किमतीत तो शेअर मिळत असतो.करण ज्यावेळेस कंपनी लाँच होते त्यानंतर शेअर बाजारात त्या शेअरची किंमत खूप वाढत असते.तसेच एका चांगल्या कंपनीत सुरुवातीला गुंतवणूक करण्याची संधी सुद्धा मिळते.

2- लिस्टिंग चा फायदा:
कंपनी जेंव्हा शेअर बाजारात लिस्ट होते त्यावेळेस त्या शेअरची किंमत ipo च्या offer price पेक्षा जास्त असते त्यामुळे त्याचा फायदा इन्व्हेस्टर ला होत असतो. बहुतेक गुंतवणूकदार IPO listing gain साठी IPO विकत घेत असतात.

3- गुंतवणूक करून फायदा मिळवणे:
जर आपण एका चांगल्या उद्योगाचा IPO विकत घेतला आणि काही वर्षे आपल्या अकाउंट मध्ये होल्ड केला तर त्यातून आपल्याला फायदा होतो. कंपनीच्या मजबूत fundamentals चा अर्थ असा की त्याच्याकडे कंपनी मोठी होण्याची चांगली शक्यता आहे. हे आपल्यालाही फायदेशीर ठरू शकते. दीर्घकालीन चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी आपण IPO मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो.

IPO ची काही उदाहरणे:

Happiest Minds Technologies Ltd.
* ऑफर किंमत -166रुपये
* लिस्टिंग किंमत – 351 रुपये

Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC)
* ऑफर किंमत -315-320 रुपये
* लिस्टिंग किंमत – 644 रुपये

HDFC Asset Management Company (HDFC AMC)
* ऑफर किंमत – 1,095रुपये
* लिस्टिंग किंमत – 1739 रुपये

Nazara Technologies
* ऑफर किंमत – 1100 to 1101रुपये
* लिस्टिंग किंमत – 1,990 रुपये

शेअर बाजारातील आयपीओ हे गुंतवणूक करण्यासाठी चांगले साधन आहे. फक्त योग्य कंपनीत गुंतवणूक करून, तुम्हाला दीर्घ कालावधी साठी शेअर होल्ड करायचे आहे जे आपल्याला चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी निर्माण राहील. तर आपण या लेखात IPO विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: What is IPO in Marathi.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x