25 December 2024 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

शेअर मार्केट म्हणजे काय? | शेअर मार्केट कसे काम करते? | जाणून घ्या मराठीत

What is share market in Marathi

मुंबई, २५ ऑगस्ट | आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यांच्या औत्सुकाच्या विषयवार आणि तो म्हणजे शेअर मार्केट. आपण या लेखात शेअर मार्केट विषयी सर्व माहिती मराठीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक एक करून आपण शेअर मार्केटविषयी माहिती पाहणार आहोत.

शेअर मार्केट म्हणजे काय?, शेअर मार्केट कसे काम करते? – What is share market in Marathi – How share market works in Marathi

या लेखात आपण खालील गोष्टी पाहणार आहोत:
१ – शेअर मार्केट म्हणजे नक्की काय ?
२ – शेअर म्हणजे काय ?
३ – शेअर मार्केट कसे काम करते ?
४ – शेअर मार्केट कामाची वेळ .
5 – शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधील फरक काय आहे ?

१ – शेअर मार्केट म्हणजे काय ? What is share market in Marathi

बरेच लोक शेअर बाजाराला सट्टा,जुगार असेही म्हणतात पण तसे नाहीय. जर आपण व्यवस्थित शेअर मार्केटचा अभ्यास करून चांगल्या कंपनीमध्ये आपला पैसा गुंतवला तर नक्कीच आपण चांगले पैसे कमावू शकतो.

आता आपण जाणून घेऊया नक्की शेअर मार्केट म्हणजे काय ?

तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शेअर मार्केट म्हणजे अशी जागा आहे ज्या ठिकाणी आपण शेअर बाजारात लिस्ट असलेल्या कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी किंवा विक्री करू शकतो. पूर्वी स्टॉक Exchange ला स्वतः जाऊन शेअर खरेदी किंवा विक्री करावी लागत असे. त्यावेळेस शेअर चे कागदी सर्टिफिकेट मिळत असे. पण आता टेकनॉलॉजि मुळे घरबसल्या आपण कोणत्याही कंपनीचे शेअर आपल्या मोबाइल किंवा कॉम्पुटर वरून खरेदी विक्री करू शकतो. त्यामुळेच बरेच लोक आता शेअर मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करत आहे.

शेअर बाजार हा आपल्या आठवडा बाजारासारखाच एक बाजार आहे जसे आपण आठवडा बाजारातून पैसे देऊन भाजीपाला खरेदी करतो तसेच शेअर मार्केट मधून आपण पैसे देऊन वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर खरेदी करतो. शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला डिमॅट आणि ट्रेडिंग खाते आवश्यक आहे.

२ – शेअर म्हणजे काय ?
शेअर म्हणजेच कंपनीचा एक छोटा हिस्सा .ज्यावेळेस कोणतीही कंपनी शेअर बाजारात लिस्ट होते त्यावेळेस कंपनी आपल्या एका शेअरची किंमत ठरवत असते .त्यानंतर कंपनीच्या शेअर किमतीमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. हे कंपनीच्या व्यवसायावर अवलंबून असते. ज्यावेळेस आपण कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करतो त्यावेळेस आपण त्या कंपनीचे शेअरच्या प्रमाणात मालक बनत असतो.

जितके जास्त शेअर आपण खरेदी करू तितक्या जास्त प्रमाणात आपली कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढते. शेअरच्या किंमती ह्या दरदिवशी कमी जास्त होत असतात .यासाठी शेअर्सची निगडित अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जसे कि शेअर्सची निगडित बातम्या, कंपनीचे आर्थिक माहिती, जागतिक स्तरावरील घडामोडी, कंपनीचा व्यवसाय कसा आहे इत्यादी ..

३ – शेअर मार्केट कसे काम करते ? How share market works in Marathi

शेअर मार्केट ला नियंत्रित करण्यासाठी सेबी हि संस्था कार्य करते .जसे बँकांना भारतीय रिज़र्व बैंक नियंत्रित करते.शेअर बाजारातील धोके,फसवणूक,नवीन कंपनी शेअर बाजारात लिस्ट करणे ,शेअर बाजारातील व्यवहार सुरळीत पार पाडणे हे सेबीचे मुख्य काम आहे .

शेअर मार्केट मध्ये शेअर खरेदी विक्री करण्यासाठी दोन मुख्य बाजार आहेत .

NSE – नॅशनल स्टॉक एक्सचेंज -दिल्ली
BSE – बॉम्बे स्टॉक एक्सचेंज – मुंबई

यापैकी कोणत्याही एक्सचेंज मधून आपण शेअर खरेदी आणि विक्री करू शकतो .

ज्यावेळेस आपण शेअर खरेदी किंवा विक्रीसाठी ऑर्डर टाकतो त्यावेळेस आपल्या ब्रोकर कडून ती ऑर्डर स्टॉक एक्सचेंजला जाते तिथे ऑर्डर चेक करून आपली ऑर्डर हि पूर्ण होते.

एकदा आपली ऑर्डर पूर्ण झाली कि २ दिवसानंतर हे शेअर आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होतात. डिमॅट अकाउंट मधील शेअर आपण केंव्हाही विकू शकतो. जितके जास्त दिवस आपण चांगल्या कंपनीचे शेअर आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये होल्ड करतो तितका आपल्याला जास्त नफा होऊ शकतो.

४ – शेअर मार्केट कामाची वेळ:
शेअर मार्केट मध्ये आपल्याला शेअर खरेदी विक्री करण्यासाठी खालील वेळ उपलब्ध असते .

मार्केट पूर्व सत्र:

हे सत्र सकाळी 9.00 ते 9.15 पर्यंत असते. कोणत्याही सिक्युरिटीज खरेदी किंवा विक्री करण्याचे आदेश यावेळी दिले जाऊ शकतात. परंतु आपली ऑर्डर हि मार्केट उघडल्यावरच पूर्ण होते .

सामान्य सत्र – सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३०

सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत आपण शेअर मार्केट मध्ये कोणताही शेअर खरेदी किंवा विक्री करू शकतो .

समापन सत्र- दुपारी ३:३० ते ४:००

भारतातील शेअर बाजार बंद होण्याची वेळ दुपारी 3.30 वाजता आहे. या कालावधीनंतर कोणतीही शेअरची देवाणघेवाण होत नाही. फक्त शेअर मार्केट ची बंद किंमत निश्चित करण्यासाठी हे सत्र असते.

याशिवाय दर शनिवार आणि रविवार व सरकारी सुट्ट्यामध्ये शेअर मार्केट मधील सर्व व्यवहार बंद असतात.

दरवर्षी दिवाळीच्या वेळेस एक दिवस सांयकाळी ५:३० ते ६:४० व वेळेत मुहूर्त ट्रेडिंग साठी शेअर बाजार चालू असतो .कारण हे शुभ मानले जाते.

5 – शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधील फरक काय आहे ?
शेअर ट्रेडिंग म्हणजेच शेअर खरेदी करून लगेच विकणे होय त्यालाच आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणू शकतो. यामध्ये पैसा झटपट मिळू शकतो तसाच लवकर नुकसान पण होऊ शकते, त्यामुळेच आपण जर नवीन असाल तर ट्रेडिंग करण्या पेक्षा गुंतवणुविकार भर दिला पाहिजे. शेअर मार्केट मध्ये अनुभव आल्यावर आपण ट्रेडिंग मधून पैसा कमावू शकतो.

इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक म्हणजेच चांगल्या कंपनीचा शेअर खरेदी करून आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये काही महिने,काही वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी होल्ड करून ठेवणे.सुप्रसिद्ध शेअर मार्केट गुंतवणूकदार वॉरेन बफे, राकेश झुणझुणवाला, राधाकिशन दमानी यांनी इन्व्हेस्टमेंट करूनच शेअर बाजारातून खूप सारा पैसा कमावला आहे.

आपणही शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमावू शकतो. त्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीत पैसे गुंतवून जास्त काळासाठी शेअर होल्ड करायचा आहे.व शेअरची किंमत जास्त वाढली की आपण आपल्या गरजेनुसार शेअर विकू शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: What is share market in Marathi.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x