Unsolved Mysteries in World | जगातील या ५ रहस्यमय गोष्टींचा आजवर उलगडा झाला नाही - नक्की वाचा

डी.बी. कुपर: (5 Unsolved Mysteries in the world)
आपण बऱ्याच वेळा चित्रपटात विमानाचं अपहरण झालेली दृश्ये पाहतो पण अमेरीका सारख्या विकसित देशामध्ये एक अशीच खरी गोष्ट घडली होती. बुधवार दिनांक २४ नोव्हेंबर १९७१ रोजी डी बी कुपर या नावाच्या व्यक्तीने उत्तर पूर्व अमेरिकेतील बोईंग ७२७ या विमानाचे दुपारी पोर्टलैंड ते ऑरेगॉन यांच्यातील हवाई क्षेत्रामध्ये अपहरण केले होते. विशेष म्हणजे त्याने हे अपहरण एकट्याने व कोणत्याही हत्याराशिवाय केले होते अणि २००,००० डॉलर्स घेऊन पैराशूट च्या मदतीने विमानातून उडी घेऊन पलायन केले.
Unsolved Mysteries in World, जगातील या ५ रहस्यमय गोष्टींचा आजवर उलगडा झाला नाही – 5 unsolved mysteries in the world :
बऱ्याच गुप्तचर संस्थानी अगदी FBI सारख्या संस्थानी तपासणी करूनही आजतागायत गुन्हेगाराचा शोध लागला नाही. आणि कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. काही पोलिस अधिकार्यांच्या मते जेव्हा डी बी कुपर याने विमानातून उडी घेतली तेव्हा तो जिवंत राहिला नाही असे सांगितले पण त्याच्या शरीराचा एक अवशेष देखिल अजून हाती लागला नाही. बरयाच तज्ञ अधिकाऱ्यांनी ह्या केसचा शोध घेण्याचा प्रयत्न केला खरे त्यांची हाती फक्त अपयशच लागले. त्या व्यक्तीने तिकीट बुक करताना डी.बी.कुपर या नावाने केले होते त्यावरून त्याला हे नाव देण्यात आले होते. ही गोष्ट विमान अपहरणातील एक निराशाजनक आणि न उलघडलेले सत्य म्हणून ओळखले जाते.
द लॉस्ट सिटी ऑफ़ अटलांटिस:
अटलांटिस चे हरवलेले शहर, या शहाराचा सर्वात प्रथम उल्लेख प्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञ प्लेटो यांनी केला होता. प्लेटो च्या मते यूटोपियन बेटावरील साम्राज्य ९००० वर्षापूर्वी अस्तित्वात होते अणि ते त्या काळी सर्वात मोठे शहर होते. अचानक एके दिवशी हे शहर जगाच्या नकाशावरून रहस्यमयरीत्या गायब झाले म्हणजेच हे पूर्ण शहर अचानक समुद्रात बुडाले होते.
बऱ्याच तर्क-वितर्का नंतर ही या शहराबदल काहीच सापडले नव्हते त्यामुळे याच्याशी जोडलेल्या अनेक दंतकथाना प्रसिद्धी मिळाली आहे. आज ही नेमके अटलांटिस शहर जगाच्या नकाशावर कोणत्या ठिकाणी स्तिथ होते यावर ही बराच वाद चालू आहे. हल्लीच समुद्रामध्ये या शहरातील काही वास्तुंचे अवशेष सापडले आहेत पण एवढे मोठे शहर एके दिवशी अचानक पणे समुद्रात कसे काय बुडाले याचा मात्र अजूनही शोध लागला नाही त्यामुळे हे जगातील सर्वात जुने आणि महान रहस्यापैकी एक म्हणून ओळखले जाते.
डेथ वैली ऑफ़ केलिफोर्निया:
हे एक जगातील रहस्यमय ठिकाण आहे. कारण येथील लोक असे म्हणतात की, या प्रदेशातील दगड हे आपोआप आपली जागा सोडून दुसरया ठिकाणी जातात म्हणजेच स्पष्ट शब्दात म्हणायचे झाले तर दगड स्वता:हून चालतात आणि आशचर्याची गोष्ट म्हणजे एखाद्या मळलेल्या पायवाटेप्रमाणे त्याच्या खुणा आज देखील उपलब्ध आहेत.
हे अद्भुत दगड इतके वजनदार असूनही कसे काय एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात हे एक रहस्यमय गूढ़ बनले आहे. येथील स्थानिक लोक सांगतात की, वाऱ्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड आपली जागा बदलतात पण ही गोष्ट मनाला न पटण्यासारखी आहे. त्यामुळेच हे एक अद्भुत रहस्य बनले आहे.
ओव्हरटाउन ब्रिज ऑफ़ स्कॉटलैंड:
ओव्हरटाउन पूल हा स्कॉटलैंड देशातील डंबर्टन शहरात स्तिथ आहे. हा पूल १८९२ मधे बांधला गेला होता. या नंतर या पुलाने बर्याच आंतराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतले. याचे कारण असे की हा पूल येथून येणा-जाणाऱ्या कुत्र्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतो. १९६० च्या दशका नंतर आजपर्यंत जवळपास ६०० कुत्र्यांनी येथून उडी घेऊन आत्महत्या केली आहे अणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वच कुत्र्यांनी पुलावरील एका विशिष्ट जागेवरूनच उडी घेउन आत्महत्या केली आहे.
स्थानिक लोक सांगतात की हा पूल भुत-प्रेत,पिशाच अणि मृत लोकांचे शक्तिस्थान आहे आणि या शक्ति फक्त प्राण्याना दिसतात आणि त्यांना आपल्याकडे आकर्षित करुण आत्महत्या करण्यास प्रवृत करतात. या गोष्टी विचारात घेता येथील सरकारने या पुलावर येणारया लोकांना आपल्या कुत्र्यांना सावधानीने घेउन जावा असा सुचना फलक ही लावला आहे.
ईस्टर आयलैंड मधील ‘मोई’ पुतळे:
ईस्टर आयलैंड हे दक्षिण प्रशांत महासागरमधील एक चिलीयन बेट आहे. या ठिकाणी ६०० रहस्यमय पुतळे आहेत. ह्या पुतळ्यांना स्थानिक भाषेत ‘मोई’ असे म्हणतात. हे पुतळे आकाराने १०० टनी वजनी, ३० ते ४० फूट उंच आणि दिसायला एखाद्या माणसासारखे आहेत. विशेष गोष्ट म्हणजे हे सर्व पुतळे दिसायला एकसारखेच आहेत. हे सर्व पुतळे भक्कम आणि जाडजूड आहेत. हे पुतळे समुद्राकडे पाठ करून गावच्या दिशेने तोंड करून आजही मोठ्या डौलात उभे आहेत.
पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मते हे पुतळे पॉलिनेशियन लोकांच्या पूर्वजांचे प्रतिनिधी आहेत. आता रहस्यमय गोष्ट म्हणजे ह्या बेटावर कोणत्याही मानवी वस्तीचे अस्तित्व नव्हते असे संशोधनात आढळून आले आहे तर मग हे पुतळे कुठून आले, कोणी आणले आणि त्यामागचा उद्देश काय होता हे आज ही न उमगलेले गुपित आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
Story Title: 5 unsolved mysteries in the world.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRB Infra Share Price | ही आहे टार्गेट प्राईस, 45 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Trident Share Price | टेक्सटाईल शेअर फोकसमध्ये, मार्केट तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TRIDENT
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON
-
Reliance Power Share Price | 3,044 टक्के परतावा देणाऱ्या शेअरबाबत अपडेट, मजबूत परताव्याचे संकेत - NSE: RPOWER
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC
-
Jio Finance Share Price | अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, जिओ फायनान्शिअ शेअर देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN