Afzal Khan's wife Kabar | अफझलखानाने आपल्या ६४ बायकांची हत्या का केली?
प्रतिपदेच्या चंद्रकले प्रमाणे वाढणारे स्वराज्य रोखण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अलिआदिलशहा दुसरा व त्याची आई बडी बेगम उलिया जनावा ताज सुलताना यांनी दरबारातील सरदारांना आव्हान दिलं. आदिलशहाचा मातब्बर सरदार अफझल खान (Afzal Khan’s wife Kabar) यांनी हसत हसत आणि मोठ्या आत्मविश्वासाने ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतलेली होती.
Afzal Khan’s wife Kabar. There was a well called Surang Bawdi near Bijapur city in which Afzal Khan drowned his wives. And buried in the graves near him. Although there are 64 tombs, this part of Bijapur is still known as Sathakbaria :
अफजलखान म्हणजे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते. कारण ज्या अफझल खानाने छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या ज्येष्ठ बंधूंना संभाजी राजांना कपटाने मारले, त्याच खुनशी राजकारणा चा भाग म्हणून शहाजीराजे यांना अटक झाली. तो अफझलखान स्वराज्यावर चालून आला होता.
एका मोठ्या फ़ौजेचा तो अधिकारी होता यात त्याची ताकद किती आहे ते दिसून येतं, राजकीय बुद्धिमत्ते चा वापर करून त्याने शहाजी राज्यांना अटक घडवली आणि शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजे यांची हत्या केली यांत तो किती क्रूर होता हे दिसून येतं.
शाही फर्माने आणि मोठी फौज घेऊन अफझलखान विजापूर हुन निघण्याची तयारी सुरू केली. खान मोहिमेवर निघताना त्याच्या त्याच्या गुरू कडे कौल मागण्यासाठी गेला असता गुरूकडून या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार असून तुझ्या जीविताला धोका पोहोचेल असे भाकीत वर्तविले. पण खानाला आपल्या कर्तबगारी वर जास्तच विश्वास होता म्हणून खानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले. (Afzal Khan wife Kabar story)
त्यात भरीस भर म्हणजे विजापूर हुन स्वराज्यात येताना त्याच्या सैन्यदलातील निशाणी चा हत्ती म्हणजे ढालगज फत्तेलष्कर हा अचानकपणे मरण पावला. गुरूने केलेलं भाकीत आणि ढाल गजाचं प्रकरणामुळे खानाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकायला लागली. जर गुरुंचं भाकीत खरं ठरलं तर आपल्या माघारी आपल्या ६४ बायकांचे काय होईल हा प्रश्न उभा राहिला. हा गुंता त्याने आपल्या क्रूर खुनशी वृत्ती ने संपवून टाकला.
विजापूर शहरापासून जवळ असलेल्या सुरंग बावडी नावाची एक विहीर होती त्या विहिरीत त्याने त्याच्या बायकांना बुडवून मारलं. आणि त्याच्या जवळच असलेल्या कबरींमध्ये दफन करुन टाकले. तिथे ऐकून ६४ कबरी असल्या तरी विजापूर मधला हा भाग आज ही साठकबरीया या नावाने ओळखलं जातं.
आजे अफजल खानाच्या या बायकांच्या कबरी आजही कर्नाटक मधल्या विजापूर जवळील साठकबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत. एकाच चबुतऱ्यावर ६४ समाध्या पाहताना भीतीने गाळण उडते.
Story Title: Afzal Khan’s wife Kabar story in Marathi.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट