6 January 2025 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA
x

मावळप्रांतात नवचैतन्य देणारे 'दादोजी कोंडदेव'

Dadoji Konddev information in Marathi

मुंबई , ०७ ऑगस्ट | इतिहासात असे अनेक गुरु-शिष्य होऊन गेले ज्यांच्यामुळे विद्येला एक नवा अर्थ प्राप्त झाला आणि या देशाच्या भविष्याला एक नवीन वळण दिलं गेलं. अशाच एक गुरुची माहिती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे गुरु दादोजी कोंडदेव.

दादोजी कोंडदेव यांचा जन्म १५७७ रोजी झाला. १६३६ पासून ते वयाच्या ७२व्या वर्षांपर्यंत ते शिवाजी महाराजांच्या जवळ होते. त्याआधी त्यांनी पुणे परगणा जहागीरीची देखेरेक करणारे सुभेदार पदाची चाकरी केली होती. ते शहाजी भोसले यांचे चाकर होते. दादोजी कोंडदेव हे शिरूर येथील होते. त्यांचे मूळ नाव गोजिवडे असे होते. आदिलशाहीमार्फत ते सिंहगडाचे किल्लेदारही झाले.

एका अभ्यासातून असे दृष्टीस आले आहे की दादोजी कोंडदेव हे गुरु होते कीं नाही तर असे मत येते की त्याबाबत पुरावा नाही पण शिवाजी महाराज पुण्यात आल्यानंतर त्यांना दादोजी कोंडदेव यांची मदत झाली, यात दुमत होऊ शकत नाही. तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रानुसार दादोजी कोंडदेव हे शहाजी राजेंच्या विश्वासातले आणि कर्तबगार होते. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते, हा उल्लेख साधारणपणे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर १००-१२५ वर्षांनी लिहलेल्या बखरीमध्ये आढळत असल्याचे इतिहासकार सांगतात.

दादोजींचे काम व मावळप्रांतात नवचैतन्य :
इ.स.१६३७ साली दादाजी, जिजाऊसाहेब व शिवाजीराजांना घेऊन पुणे जहागिरीत आले. पहिलाच प्रश्न उदभवला तो निवासाचा. कारण शहाजीराजांचे पुण्यातील राहते वाडे मागेच भुईसपाट झाले होते. त्यामुळे वाडे बांधून होईपर्यंत पुण्याच्या दक्षिणेस सात कोसांवर असलेल्या खेडेवारे येथील बापुजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे यांच्या वाड्यात राहण्याचे ठरले. जिजाबाई आणि शिवाजी यांच्याकरिता दादाजी कोंडदेवाने पुण्यात लालमहाल नावाचा वाडा बांधला पण तो कधी बांधला हे निश्चित सांगता येत नाही.

शिवगंगेच्या काठी नामवंत आंब्याची बाग लावून त्यांनी त्या बागेला शहाबाग असे नाव दिले. संभाजीराजे व शिवाबराजे यांच्या नावे संभापूर व शिवापूर अशी दोन गावेही त्यांनी वसवली. पुण्यापासून चार पाषाण म्हणून गाव आहे. तेथे दादोजीनी पेठ वसवून त्या गावचे नवे नाव ठेवले पेठ जिजापूर. जिजाऊसाहेबांच्या खाजगी खर्चासाठी केळवडे व रांझे ही दोन गावे लावून दिली. त्यासाठी नारो त्रिंबक पिंगळे हा स्वतंत्र कारकून नियुक्त केला होता.

दादोजीनी ओसाड गावच्या पाटील, देशकुळकर्णी, चौधरी, चौगुले यांना पुण्यात बोलावून त्यांची तक्रार ऐकून घेतली. त्यांना कौल देऊन वसाहत फिरून उभी करण्यासाठी आव्हान केले. नानातऱ्हेने त्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले. दादोजींच्या दिलाशाहाच्या शब्दांनी हळूहळू गावे उभी राहू लागली.

दादोजीनी पुण्यावरून सोन्याचा नांगर फिरवून विलक्षण क्रांती केली. जंगली जनावरांचा नाश करण्यासाठी बक्षिसे लावली. गस्ती तुकडया नियुक्त केल्या. संरक्षणव्यवस्था मजबूत केली. चोराचिलटांचे भय नाहीशे केले. शेतीस उत्तेजन दिले. जमिनीची मापणी करून प्रतवारी ठरविली. मुक्तहस्ते तगाई, कर्जे वाटली. सारा-वसुलीचे प्रमाण ठरवून दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: Dadoji Konddev information in Marathi story updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x