15 November 2024 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर | थोर समाज सुधारक डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी

Dr Anandi Gopal Joshi

मुंबई, ०३ ऑगस्ट | स्त्रियांनी आजपर्यंत अनेक क्षेत्रात पुरुषांना तोडीस तोड उत्तर दिले आहे. प्रत्येक संकटावर मात करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अशा ह्या अनेक स्त्रियांपैकी एक म्हणजे डॉ. आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. त्यांचा जन्म ३१ मार्च, १८६५ रोजी पुण्यात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी ह्यांच्यासोबत झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी एक मुलाला जन्म दिला, परंतु उपचार न मिळाल्यामुळे ते मूल जास्त काळ नाही जगू शकले आणि हा टप्पा त्यांच्या आयुष्यात महत्वाचा ठरला.

गोपाळराव स्वतः लोकहितवादी ची शतपत्रे वाचत. आपल्या पत्नीसला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले होते. लोकहितवादीच्या शतपत्रातून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीभस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला. गोपाळराव पोस्ट ऑफिसात कारकून होते. गोपाळराव यांची नोकरी निमीत्त बदली होत असे. कोल्हापूर, मुंबई, भुज, कोलकता, बराकपूर, श्रीरामपूर (बंगालमधलं) इथे प्रत्येक ठिकाणी गोपाळरावांबरोबर आनंदीबाई जात राहिल्या आणि गोपाळराव तिला शिकवीत राहिले.

कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांशी ओळख वाढल्यावर तिथे प्रथम गोपाळरावांच्या मनात आलं की आनंदीला अमेरिकेला पाठवून तिचं शिक्षण करावं. त्या वेळी गोपाळरावांनाही अमेरिकेला जायची इच्छा होती, परंतु ते काही जमू शकलं नाही. आनंदी बुद्धिमान. तिनं इंग्रजी भाषा व अन्य विषय पटकन आत्मसात केले. आनंदीला अमेरिकेला शिकायला जाण्यासाठी पैशांची तरतूद आवश्यक होती. ती करण्यात, तिला जायला सोबत शोधण्यात २-४ वर्षे गेली.

भारतात बदलीच्या ठिकाणी आनंदीबाईना समाजाचे, शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे विपरीत अनुभव आले. त्या गोपाळरावांबरोबर फिरायला जातात. इंग्रजी शिक्षण घेतात. याबद्दल कुतूहल म्हणून त्या दोघांना पाहायला लोक गर्दी करीत आणि गोपाळरावांना विचारीत, ही ठेवलेली बाई का? आनंदीलाही खूप अपमानास्पद शेरे ऐकावे लागत. परंतु तिकडे दुर्लक्ष करून आनंदी आपला अभ्यास निष्ठेने करी. गोपाळरावानी आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणासाठी अथक प्रयत्न केले. आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३ मध्ये ‘ वूमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हानिया ‘ मध्ये प्रवेश मिळाला .

कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर आनंदीबाई यांनी मार्च, १८८६ मध्ये एम.डी ही पदवी मिळाली. एम.डी साठी जो प्रबंध सादर केला होता त्याचे नाव ‘ हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र ‘ होते. पण पुढे जाऊन वयाच्या विशीत त्यांना क्षयरोगाने ग्रासले आणि काही महिन्यांतच म्हणजे २६ फेब्रुवारी, १८८७ रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. अशा रीतीने खडतर परिस्थितीवर मात करून आनंदीबाई जोशी ह्यांनी एक आदर्श निर्माण करून दिला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: First Indian Lady doctor Anandi Gopal Joshi information in Marathi news updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x