थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर
मुंबई , ०७ ऑगस्ट | महाराष्ट्रात असे अनेक समाजसुधारक होऊन गेले ज्यांनी आपल्या कार्याने फक्त समाजच नव्हे तर देश घडवण्यात मदत केली. असे एक थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा मध्ये झाला. ते समाजसुधारकाबरोबरच एक उत्तम शिक्षणतज्ञ आणि पत्रकार होते. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान निष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९ मध्ये एम.ए करताना झाली. आगरकर हे टिळकांनी सुरु केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. पुढे लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्गुसन कॉलेजची स्थापना केली.
११८७ ला त्यांनाही केसरीचे संपादकत्व सोडले आणि १८८८ साली त्यांनी “सुधारक” हे वृत्तपत्र सुरु केले. आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला .स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार प्रभावीपणे त्यांनी मांडला. राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्वाची आहे तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाले पाहिजे असे होते. समंतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले आणि पुढे जाऊन आगरकरांनी केसरीचे काम सोडले.
आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, “देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फळ होय यात शंका नाही “.
फर्ग्युसन कॉलेजला ‘फर्ग्युसन’ हे नाव का दिलं?
वयाच्या 24 व्या वर्षी म्हणजेच 1880 ला त्यांच्या प्रत्यक्ष सामाजिक कार्याला सुरुवात झाली. निबंधमालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी टिळक आणि आगरकरांना सोबत घेऊन ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. पहिल्या वर्षी या शाळेत केवळ 35 विद्यार्थी होते. तर वर्षाच्या शेवटी ही संख्या 336 वर गेली.
सुरुवातीला शाळेकडे निधीची कमतरता होती तर शाळेचे हे तिन्ही संस्थापकच शाळेच्या भिंती हाताने सारवत असत. पाश्चिमात्य शिक्षण देणारी पुण्यातली पहिली स्वदेशी शाळा असा या शाळेचा लौकिक होता. पाश्चिमात्य शिक्षणात काही त्रुटी असल्या तरी त्याचा वापर करुन आपण आपले राष्ट्रवादाचे ध्येय गाठू शकतो, असा विश्वास संस्थापकांना होता. चार वर्षांनी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि 2 जानेवारी 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांचं नाव या कॉलेजला देण्यात आलं होतं.
गव्हर्नरचं नाव असेल तर सरकारकडून देणग्या मिळतील तसेच इतर देणगीदारांनाही देणग्या देताना अडचण येणार नाही, असा विचार करून हे नाव ठेवण्यात आल्याचा उल्लेख डॉ. गजानन जोशींनी लिहिलेल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद् इतिहासाच्या 10 व्या खंडात आहे. 1919ला सांगलीमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीने कॉलेज काढलं त्याला त्यांनी विलिंग्डन कॉलेज असं नाव दिलं. त्यावेळी मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन हे होते.
‘केसरी’चे पहिले संपादक:
1881 ला ‘केसरी’ची स्थापना झाली. राष्ट्रीय विचारांचे दैनिक म्हणून अल्पावधीतच या वृत्तपत्राला लौकिक मिळाला. केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. आगरकर हे त्यांच्या सुधारणावादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत पण केसरीमध्ये असताना त्यांना इतर विषयावरही विपुल लिखाण केल्याचं मत डॉ. अरविंद गणाचारी यांनी आपल्या – ‘गोपाळ गणेश आगरकर, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक’ या पुस्तकात मांडलं आहे.
‘भारताची वाढती लोकसंख्या आणि उत्पादन व वितरणाशी असलेला संबंध’ या विषयावर लिहिणारे ते देशातील पहिले विचारवंत आहेत. नंतर या विषयावर र. धों. कर्वे यांनी सखोल अभ्यास केला. र. धों. कर्वे स्वतःला ‘सच्चा आगरकरवादी’ यामुळेच म्हणत असत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Story Title: Gopal Ganesh Agarkar information in Marathi news updates.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL
- Family Pension | मुलींनो कौटुंबिक पेन्शनवर तुमचा सुद्धा हक्क; निवृत्ती वेतनाबाबतचे नियम लक्षात ठेवा, आजीवन पेन्शन मिळेल
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, 38 टक्क्याने स्वस्त झालाय शेअर - NSE: SUZLON
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Locker | HDFC, SBI आणि ICICI बँक ग्राहकांना 'या' महत्त्वाच्या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवता येणार नाही, वाचा संपूर्ण डिटेल्स
- Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल