2 April 2025 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Ecotech Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 44 पैसे, हा पेनी स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VIKASECO Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 3,044 टक्के परतावा देणाऱ्या शेअरबाबत अपडेट, मजबूत परताव्याचे संकेत - NSE: RPOWER Vedanta Share Price | यापूर्वी दिला 12,933 टक्के परतावा, भक्कम फंडामेंटल्स, वेदांता स्टॉक टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Vikas Lifecare Share Price | 2 रुपयांचा पेनी स्टॉक तेजीत; गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी - NSE: VIKASLIFE JP Power Share Price | जेपी पॉवर स्टॉक टार्गेट प्राईस, जबरदस्त खरेदी सुरु, शेअर प्राईस 14 रुपये - NSE: JPPOWER Adani Power Share Price | टार्गेट प्राईस अपडेट, मल्टिबॅगर अदानी पॉवर शेअर पुन्हा फोकस मध्ये - NSE: ADANIPOWER
x

Hambirrao Mohite | बहिर्जींची गुप्त बातमी आली | मग हंबीरराव मोहिते अन महाराजांनी डावपेच आखले - नक्की वाचा

Hambirrao Mohite story

नुकताच राज्याभिषेक सोहळा पडला होता.. सहयाद्री आणि रायगड आनंदाच्या वर्षावात न्हाहून गेले.. स्वराज्य अवतरले होते… रायगड आता सर्व सहयाद्री आणि किल्ल्याच्या राजा झाला होता… साधू-संत… लहान-थोर… बाया-बापड्या… सर्व संतुष्ट झाले होते… सर्व आसमंतात राजांचे आणि रायगडाचे नाव दुमदुमत होते… आता कोणाचीही वाकडी नजर होणार नव्हती स्वराज्याकडे.

Hambirrao Mohite, बहिर्जींची गुप्त बातमी आली, मग हंबीरराव मोहिते अन महाराजांनी डावपेच आखले – Hambirrao Mohite story in Marathi :

राजे निश्चिन्त आणि संतुष्ट मनाने..लिंगाणा, राजगड, तोरणा; मकरंदगड, प्रतापगड, वासोटा आणि सभोवताली पसरलेल्या स्वराज्याची पाहणी करत होते… हवेत गारवा पसरला होता… राजांनी अंगाभोवती लपेटलेली शाल अजूनच लपेटून घेतली…आणि टकमक टोकावरून जगदीश्वर मंदिराच्या दिशेने चालू लागले.

जगदीश्वराच्या मंदिरात प्रसन्न शांतता पसरली होती. आता लावलेल्या कापूर आणि धुपाचा वास वातावरणात भरून राहिला होता. आत गाभाऱ्यात पुजारी मंत्रो-उच्चार करत होते… आवाज आतल्या आत घुमत होता… एक दैवी अनुभूती येत होती…एव्हाना राजांनी आपल्या नेहमीच्या पूजेला सुरुवात केली होती… त्या मंत्रो-उच्चाराच्या गजरात राजे थोडावेळ ध्यानस्थ बसले… आणि डोळे उघडून पुजाऱ्याच्या दिशेने नजर रोखुन बोलले… बोला बहिर्जी बोला… आज काय खास बातमी आहे…  ते ऐकून बहिर्जीच्या चेहर्‍यावर प्रसन्न हसू पसरले… राजांनाही त्यांच्या वेगवेगळ्या रूपांची सवय झाली होती.

राजे पक्की खबर आहे २४ पुण्यापासून कोसांवर भीमेच्या काठी औरंगजेब बादशहाचा दूधभाऊ बहादूरखान कोकलताश जफरजंग बहादूरगडावर वस्तीला आहे… बादशहाला २०० जातिवंत अरबी घोडे आणि एक कोटींचा खजिना घेऊन चालला आहे… पण भीमेचे पाणी पावसाने वाढल्यामुळे..मुक्काम अजून ५ ते ७ दिवस होईल… सैन्य पण २००० ते ३००० आहेत… चांगली संधी आहे..हे ऐकून राज्यांच्या डोळ्यांत चमक आली… राजांनी लगोलग हंबीरराव मोहित्यानां सांगावा धाडला… हंबीरराव पण धावत धावत मंदिरात आले… गाभाऱ्यात फक्त राजे आणि पुजारी बघुन गोंधळून गेले.

राजांनी सदरेत न बोलवता इथे का बोलविले ते समजेना… राजांनी बहिर्जीनी आणलेली खास बातमी सांगितली… राजांचे बोलून झाल्यावर तो पुजारी हंबीरराव मोहित्याच्या पाय पडायला पुढे झाला… ते बघून ते अजूनच गोंधळून गेले आणि नकॊ नको म्हणत अजून पाठी झाले… राजे ते बघून अजून हसायला लागले… हंबीररावांना काही कळेचना तेव्हा त्या पुजार्‍याने आपली दाढी काढली… तेव्हा हंबीरराव मोहित्यानां कळले.. हे दुसरे तिसरे कोणी नसून बहिर्जी आहेत.

राजे,बहिर्जी आणि हंबीरराव मोहित्यांनी डावपेच आखले… ९००० हजारांची फौज घेऊन बहादूरगडाच्या दिशेने बहिर्जी आणि हंबीरराव निघाले… पण आता फक्त २००० हजारांची फौज बहादूरगडाच्या दिशेने दौडत होती आणि त्याचे नेतृत्व बहिर्जी करत होते ?? मग सात हजारांची फौज आणि हंबीरराव गेले कुठे ??… असो.. ती २००० हजारांची फौज बहादूरगडाच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने दौडत निघाली… मराठी फौज छावणीवर चालून येत आहे, असे समजताच बहादूरखानने आपल्या फौजेला सिद्ध होण्याचा हुकूम सोडला… आणि फक्त २०० ते ३०० सैनिक किल्ल्यात ठेवून गडाचे दरवाजे उघडून मराठ्यांच्या दिशेने निघाली आणि काय आश्चर्य !!!

मुघल फौज येत आहे, हे पाहिल्यावर मराठे रणांगण सोडून चक्क पळत सुटले… ते बघून बहादूरखान आणि मोगली सैनिकांना अजून चेव चढला… ते दुप्पट वेगात मराठ्यांच्या पाठलाग करू लागले… मराठे वाट मिळेल तिकडे सैरावैरा धावत सुटले… कोणीच हाती आले नाही.. शेवटी कंटाळून बहादूरखान आणि मोगली सैनिक पाठी फिरले… गडाजवळ येऊन बघतात तर काय ??? जिकडे तिकडे आग लागलेली… तबेल्यात एकही घोडा नाही.. करोडोंचा खजिना पण जागेवर नव्हता… बहादूरखान कोकलताश जफरजंग वेडा झाला.. २०० ते ३०० सैनिक काही जखमी झाले.. काही बांधून ठेवले होते.

आता बादशहाला काय तोंड दाखवणार ?? काय नजराणा पेश करणार?? मराठे आहेत कि भुतं आहेत?? आपणचं त्याना पळवून लावले?? मग झाले काय ??

बहादूरखानाला एका सैनिकाने झालेला प्रकार सांगितला तेव्हा त्याने फक्त आपले डोके गच्चं धरून हताश होऊन बसला…

झाले असे

बहादूरखान खान फार दूरवर गेला आहे समजताच बहादूरगडाच्या आसपास लपलेली ७००० हजारांची फौज आणि हंबीरराव मोहिते…बहादूरगडावर चालून आली..तिथल्या मूठभर मुघलांना ही धडक सोसवलीच नाही… एक कोटीचा खजिना आणि २०० अरबी घोडे अलगद हाती आले…मराठयांनी मोगली छावणी पेटवून दिली आणि आल्या पावली माघारी फिरले.. सर्व लूट रायगडाच्या पायथ्याशी सुखरूप पोहचती झाली… आणि राज्याभिषेकाचा पूर्ण खर्च भरून निघाला

II जय शिवराय II

 

Story English Title: Hambirrao Mohite story in Marathi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या