8 October 2024 7:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI च्या 'या' फंडामुळे गुंतवणूकदारांची रोज दिवाळी, पैसा 4 पटीने वाढतोय, फायदा घ्या - Marathi News NBCC Share Price | PSU शेअरने 250 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला, आता स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, मल्टिबॅगर शेअरवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ, 2800% परतावा देणारा शेअर BUY करावा की Sell - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर 50% पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News
x

टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राचा प्रेरणादायी प्रवास

Neeraj Chopra biography

नवी दिल्ली, ०७ ऑगस्ट | अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकण्यासाठी भारताची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली ऑगस्ट २०२१ मध्ये संपली.. भाला फेकणारा नीरज चोप्रा याने या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर थ्रो करत सुवर्ण पटकावले. नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फाऊल आणि 6 व्या प्रयत्नात फाउल थ्रो केला. नीरजने क्वालिफाइंग राउंडमध्ये 86.65 मीटर थ्रो केला होता आणि आपल्या ग्रुपमध्ये पहिल्या नंबरवर होता.

13 वर्षांनंतर भारताला सुवर्ण:
ऑलिम्पिक स्पर्धेत 13 वर्षानंतर भारताला एखाद्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक नेमबाज अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळाले होते. बिंद्राने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते.

भारताचे आतापर्यंतचे 10 वे सुवर्ण:
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे हे आतापर्यंतचे 10 वे सुवर्णपदक होते. भारताने यापूर्वी हॉकीमध्ये 8 आणि नेमबाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकले आहे. अशा प्रकारे, हे भारताचे केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे.

सर्वसामान्य कुटुंबात जन्म, चंडीगढमध्ये शिक्षण:
अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून शिक्षण आणि खेळाची सांगड घालत नीरज मोठा झाला. नीरज चोप्राचा जन्म 27 डिसेंबर 1997 ला हरयाणाच्या पानीपत जिल्ह्यातल्या खांद्रा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. नीरजने आपलं शिक्षण चंडीगढमधून पूर्ण केलं. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नवह्ती. तरी जिद्दीच्या जोरावर त्याने या खेळात सातत्य ठेवलं आणि चांगली कामगिरी करत राहिला.

भालाफेकीत जागतिक मेडल नंतर सैन्यात अधिकारी:
2016 मध्ये भारतात झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावलं. त्यानंतर 2016 मध्ये नीरजने पोलंडमध्ये झालेल्या IAAF अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये 86.48 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदक पटकावलेलं. अंजू बॉबी जॉर्जनंतर जागतिक स्तरावरच्या अॅथलेटिक स्पर्धेत पदक पटकवणारा नीरज दुसरा भारतीय ठरला होता. या कामगिरीनंतर नीरजची भारतीय सेनेत ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

कोरोनाची लागण, तरी डगमगला नाही:
2018 मध्ये इंडोनेशियाच्या जकार्ता इथं एशियन्स गेम्समध्ये नीरजने 88.06 मीटर दूर भालाफेक केला होता. या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर 2018 मध्ये नीरजच्या खांद्याला दुखापत झाली होती. या कारणाने तो अनेक दिवस खेळापासून दूर होता. 2019 मध्ये त्याला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्याला अनेक स्पर्धांपासून मुकावं लागलं होतं.

जर्मन कोचकडून घेतली ट्रेनिंग:
नीरज चोप्राने आपले थ्रोइंग स्किल्स आणखी चांगले बनवण्यासाठी जर्मनीचे बायो मेकॅनिक्स एक्सपर्ट क्लाउस बार्तोनित्ज यांच्याकडून ट्रेनिंग घेतली. तेव्हापासून नीरज सलग चांगले परफॉर्म करत आहे.

यापूर्वी 5 मोठ्या इव्हेंटमध्ये जिंकले गोल्ड:
इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असलेल्या नीरजने ऑलिम्पिकपूर्वी 5 मेगा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहेत. त्याने एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, साउथ एशियन गेम्स आणि वर्ल्ड जुनिअर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहेत.

वजन कमी करण्यासाठी अ‍ॅथलेटिक्समध्ये:
नीरज चोप्रा हरियाणाच्या पानीपत येथील रहिवासी आहे. त्याने मुळात वजन कमी करण्यासाठी अ‍ॅथलेटिक्सची निवड केली होती. यात अगदी कमी वेळातच स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून नीरजने मागे वळून पाहिले नाही. अ‍ॅथलेटिक्समध्ये चांगल्या परफॉर्मंसमुळेच 2016 मध्ये भारतीय लष्कर जॉइन केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: Javelin Thrower Neeraj Chopra biography in Marathi news updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x