Kenjalgad Fort Attack | शिवाजी महाराजांचे वाऱ्याच्या वेगाने केंजळगडावर आक्रमण आणि भेदरलेला शत्रू
आपल्या महाराष्ट्रात जवळपास ३५० वगैरे गडकिल्ले आहेत. हि संख्या आपल्याला प्रथमदर्शनी छोटी वाटत असली तरी देशातील सगळ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात गडकिल्ल्यांची हि सर्वाधिक संख्या आहे. आता या किल्ल्यांच्या संवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष आणि महाराष्ट्राला या गडकिल्ल्यांच्या वारस्याची जाण नसणे हा वेगळा मुद्दा झाला परंतु, आपण आपल्या राज्यातील अशा अभिमानास्पद गोष्टींबद्दल किती अनभिज्ञ असतो हे कमालीचे आहे. राजगड, रायगड, जंजिरा, सिंधुदुर्ग आणि असे १०/१२ किल्ले सोडले तर आपल्याला बाकी किल्ल्यांबद्दल माहिती देखील नसते. अनेक किल्ले अजूनही पडद्याआडच आहेत.
Kenjalgad Fort Attack, शिवाजी महाराजांचे वाऱ्याच्या वेगाने केंजळगडावर आक्रमण आणि भेदरलेला शत्रू – Kenjalgad fort war of Chhatrapati Shivaji Maharaj :
असाच एक किल्ला आपल्या महाराष्ट्रात आहे. या किल्ल्याबद्दल फारशी माहिती लोकांसमोर कदाचित आलेली नसावी. आज आपण याच किल्ल्याबद्दल आणि या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत. या किल्ल्याचे नाव आहे केंजळगड. चला तर मग पाहूया या केंजळगडाचा रंजक इतिहास.
कुठे आहे केंजळगड ?
केंजळगड हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथील किल्ला आहे. वाईच्या उत्तर-पश्चिमेला साधारण १५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. या भागात महादेव पर्वतरांग आहे, याच महादेव पर्वतरांगेत हा किल्ला उभा आहे. केंजळगडाच्या बांधकामाबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही. साधारण १२ व्या शतकात भोज राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले असे समजते. राजा भोज हा परमार घराण्यातील एक राजा होता.
शिवरायांच्या स्वराज्यात केंजळगड सामील:
केंजळगड किल्ला हा बांधल्यापासून पुढे कोणाच्या ताब्यात होता याबद्दल काही माहिती मिळत नाही. साधारण १६४८ च्या आसपासच्या काळात हा किल्ला विजापूरचा बादशाह आदिलशाह याच्या ताब्यात गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मोहीम सुरु केल्यापासून अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले अनेक किल्ले बांधले अनेक किल्ल्यांची डागडुजी करवून घेतली. असे करता करता जवळपास बरेच किल्ले शिवरायांनी स्वराज्यात सामील केले आणि स्वराज किल्ल्यांद्वारे बळकट केले. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही महाराजांनी किल्ले काबीज केले.
वाई प्रांतातील देखील जवळपास सगळेच किल्ले शिवाजी महाराजांनी काबीज केले. तरीही, केंजळगड हा वाई प्रांतातील किल्ला आपल्या ताब्यात घेणे शिवरायांना अवघड जात होते. केंजळगड काबीज करणे हा शिवरायांचा मनसुबा होताच. साधारण १६७४ साली शिवाजी महाराज आपल्या लष्करासहित चिपळूण जवळ एका मोहिमेवर व्यस्त होते. याच दरम्यान महाराजांनी अचानक आपला मोर्चा केंजळगडाकडे वळविण्याचे नक्की केले. महाराजांनी ठरल्याप्रमाणे आपली फौज केंजळगडाकडे फिरविली.
Chhatrapati Shivaji Maharaj won Kenjalgad fort :
केंजळगडावरील किल्लेदाराला आणि सैन्याला थोडीसुद्धा भनक नव्हती कि क्षणार्धात अचानक वाऱ्याच्या वेगाने मराठ्यांनी केंजळगडावर आक्रमण केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे किल्ल्यावरील सैनिकांना लढाईसाठी सज्ज होण्याची देखील मुदत मिळाली नाही. समोर येईल त्या सैनिकाचा बिमोड करत मराठ्यांनी आगेकूच केली. या साऱ्या चकमकीत गडावरील किल्लेदार गंगाजी विश्वासराव देखील मारला गेला. अखेर घमासान लढाईनंतर मराठ्यांनी केंजळगड हा किल्ला जिंकला.
ऐतिहासिक नोंदीनुसार २४ एप्रिल १६७४ रोजी मराठ्यांनी केंजळगड आपल्या स्वराज्यात सामील केला. विरोधकांना आणि खुद्ध मराठ्यांना देखील या अचानक हल्ला करून काबीज केलेल्या किल्ल्याच्या विजयावर विश्वास बसत नव्हता. मराठ्यांची फौज आणि शिवरायांचे नेतृत्व एकत्र आले तर ऐन वेळी सुद्धा कशी विजयाची पताका मिरवीरा येते हे सिद्ध होते.
किल्याची मालकी:
१२ व्या शतकात बांधलेला हा किल्ला साधारण १६४८ साली आदिलशाह ने ताब्यात घेतला आणि मग शिवरायांनी हा किल्ला स्वराज्याचा भाग बनविला. पुढे १६७४ पासून हा किल्ला स्वराज्यातच राहिला. साधारण १७०१ मध्ये केंजळगड किल्ला औरंगझेबाने जिंकला आणि हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. मुघलांच्या ताब्यात हा किल्ला जाऊन एक वर्षही सरले नसावे कि १७०२ मध्ये पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला मुघलांकडून हिसकावून जिंकून घेतला आणि पुन्हा एकदा केंजळगडावर भगवा फडकविला. पेशवाईच्या अस्तानंतर सुमारे १८१८/१८१९ मध्ये केंजळगड ब्रिटिशांच्या मालकीचा झाला.
वर्तमान परिस्थिती:
आज हा किल्ला ब्रिटिशांनी उध्वस्त केलेल्या अवस्थेत आहे. किल्ला तसा आकारमानाने छोटा आहे परंतु भक्कम आणि नैसर्गिक सुंदरतेने नटलेला आहे. या किल्ल्यावर जवळपास ७/८ पाण्याच्या टाक्या देखील आहेत परंतु त्या ब्रिटिशांनी उध्वस्त केलेल्या अवस्थेत आहेत. किल्ल्यावर केंजळी देवीची मूर्ती देखील दृष्टीस पडते. किल्ल्यातील खोल्या आणि सदर आज मोडकळीच्या अवस्थेत आहे. ब्रिटिशांनी केलेली नासधूस अजूनही शासनाकडून भरून निघाली नाहीये.
अनेक खासगी संस्था आणि हौशी तरुणांचे मंडळ आपल्या स्वखर्चातून व लोकनिधी गोळा करून अनेक गडांच्या डागडुजीकडे वाटचाल करत आहेत. या वाटचालीत शासनाची मदत झाली असता हि वाटचाल सुखद व जलद झाली असती यात शंकाच नाही. किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे आणि हे वैभव असेच अखंड आपण टिकवून ठेवणार आहोत. आपला इतिहास जितका पुस्तकांच्या पानापानांतून बोलतो त्यापेक्षा अधिक गडकिल्ल्यांच्या चिरा-चिरा तुन बोलतो. याच साठी हि वैभवाची ज्योत अखंड तेवत राहिली पाहिजे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Kenjalgad fort war of Chhatrapati Shivaji Maharaj.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन