7 January 2025 11:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

कोल्ह्याचं रामबाण औषध

Marathi Stories, Marathi Katha, Marathi laghu Katha, Marathi Kavita, Marathi Sahitya

एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला .तेव्हा त्याची विचारणा करायला जंगलातील प्राणी,पक्षी येत-जात असत..

तेव्हा एक लांडगासुद्धा सिंहाच्या भेटीला तेथे आला .त्याने सिंहाची विचारपूस केली व सिंहाचे कान भरायला सुरुवात केली ती अशी.

लांडगा सिंहाला म्हणाला…महाराज क्षमा असावी ,पण एक गोष्ट विचारायचे धाडस करू काय ? तेव्हा सिंहाने लांडग्याला लगेच परवानगी दिली व म्हणाला , विचार काय विचारायचे ते . तेव्हा लांडगा म्हणाला ,महाराज आपल्या आजाराची विचारण करायला जंगलातील सर्व प्राणी आले पण …! पण काय …..? सिंह म्हणाला.

महाराज या प्राण्यांमध्ये मला कोल्हा दिसला नाही….नाही मी सहज विचारलं या कोल्ह्याला महाराजांबद्दल बिलकुल आदर नाही,असे मला वाटते.

नाहीतर तो एकदा तरी येऊन गेला असता…

कोल्हा तेवढ्यातच तेथे येऊन उभा राहीला. पण लांडग्याचे शेवटचे शब्द कोल्ह्याच्या कानावर पडले होते.

तेव्हा कोल्हा शांतपणे म्हणाला…, महाराजांनी एकदा माझे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे नंतर काय ते बोलावे.

महाराज आजपर्यंत एवढे पशु आपल्या भेटीला आले,पण कोणी आपल्या आजाराचा उपाय शोधला ? या उपायासाठी मी आजपर्यंत खटपट करत होतो व ते औषध शोधल्यावरच मी आपल्याजवळ आलो.

सिंह म्हणाला..सांग मग काय उपाय शोधला तू ! महाराज औषध एकदम रामबाण शोधल आहे. सांग बाबा लवकर काय ते औषध आहे, सिंह म्हणाला.

कोल्हा म्हणाला ते औषध असे आहे की एका जिवंत लांडग्याचे कातडे सोलून ते गरम असतानाच तुम्ही अंगावर घेतले म्हणजे झालं.

त्याच क्षणी लांडगा तेथे मरून पडला.

कोल्हा म्हणाला,कोणाचे कान भरण्यापेक्षा त्यांच्यातला सद्भावना जागृत करणे केव्हाही उत्तम !

 

Story English Title: Kolhyacha Ramban Aushadh a lesson story on Maharashtranama.

राहुन गेलेल्या बातम्या

x