6 January 2025 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

थोर समाजसुधारक आणि भारतीय असंतोषाचे जनक 'लोकमान्य टिळक'

Lokmanya Tilak information in Marathi

मुंबई, ०५ ऑगस्ट | भारत जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दोन गट पुढे होते. जहाल आणि मवाळ. त्यापैकी जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळक ह्यांच्याकडे होते. लहानपणासून त्यांना आपल्या देशासाठी प्रेम, आपुलकी होती. जाणून घेऊया, अशा महान आणि तेजस्वी व्यक्तिबद्दल.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच “! अशी सिंहगर्जना देणारे लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणून ख्यातनाम आहे. ब्रिटिश अधिकारी त्यांना “भारतीय अशांततेचे जनक” असे म्हणत . त्यांचे मूळ नाव बाळ गंगाधर टिळक असे असून त्यांचा जन्म २३ जुलै, १८५६ रोजी झाला. १८७७ साली त्यांनी पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून पदवी मिळाली आणि १८७९ रोजी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मधून वकिलीची पदवी मिळाली. पत्रकार म्हणून पण कार्यरत असताना त्यांनी अनेक सामाजिक चळवळीत सहभाग घेतला होता.

१८८० साली त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना केली. १८८१ साली केसरी व मराठा अशी वृत्तपत्र सुरु केली. ११८४ साली पुण्य्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली. समाजात जनजागृती यावी म्हणून शिवजयंती आणि गणेशोत्सव याची सुरुवात केली. पुढे जाऊन १९१६ मध्ये त्यांनी होमरूल लीग ची स्थापना केली. तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य लिहून काढले. त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेकदा तुरुंगात जावे लागले पण त्यांनी कधी हार नाही मानली. लोकांपर्यंत देशभक्तीचे महत्व पोहचवण्यासाठी आणि त्यांना जागं करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

राजद्रोहाचा खटला- घटना कशा घडल्या?

* 24 जून 1908- टिळकांना मुंबईतल्या सरदारगृह इथून अटक केली गेली. काही दिवसांपूर्वीच टिळक पुण्याहून ‘काळ’ दैनिकाचे संपादक श्री एस एम काळे यांना त्यांच्यावर सुरू असलेल्या एका खटल्यात कायदेशीर मदत करण्यासाठी मुंबईत आले होते.

* 25 जून 1908 – टिळकांचं घर आणि प्रेस यांच्यावर छापे पडले, यात टिळकांच्या घरातून एक पोस्ट कार्ड मिळालं ज्यावर स्फोटकांशी संबंधित दोन पुस्तकांची नावं लिहिलेली होती. तिकडे मुंबईत टिळकांचा जामीन अर्ज फेटाळला गेला.

* 26 जून 1908, मुंबई – टिळकांवर दुसरा आरोप ठेवला गेला आणि तुरुंगातच वॉरंट बजावलं गेलं. कलम 124A आणि 153 खाली दोन स्वतंत्र खटले भरले गेले. टिळक या काळात डोंगरीच्या तुरुंगात होते.

* 2 आणि 3 जुलै 1908, मुंबई – जस्टिस दावर यांच्यासमोर मोहम्मद अली जिन्ना यांनी टिळकांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद केला. जामीन पुन्हा फेटाळला गेला. टिळकांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी एका विशेष ज्युरीची नेमणूक झाली.

* 13 जुलैपासून खटल्याला सुरुवात झाली. टिळकांवर दोन खटले भरले गेले होते ते एकत्र करून चालवणं कितपत योग्य होतं हा वादाचा विषय ठरला, पण न्यायाधीशांनी त्याला परवानगी दिली.

मराठीतून लिहिलेले दोन अग्रलेख टिळकांवरच्या राजद्रोहाच्या आणि लोकांना भडकवण्याच्या आरोपांचा आधार होते. पण हा खटला ऐकणारी ज्युरी पूर्णतः अमराठी लोकांची होती. यात 7 युरोपीय आणि 2 पारशी असे 9 सदस्य होते. जिन्नाह, बाप्टिस्टा या वकिलांनंतर खुद्द टिळकांनीच स्वतःची बाजू मांडली. चार दिवसांत मिळून टिळकांनी एकूण 21 तास 10 मिनिटं युक्तीवाद केला, असं खुद्द न्यायाधीशांनीच नोंदवून ठेवलं होतं.

2 जुलैला दुपारी टिळकांचा ज्युरीसमोरचा युक्तीवाद संपला, संध्याकाळी न्यायाधीशांनी हा खटला त्याच दिवशी निकाली काढणार असल्याचं जाहीर केलं. दुसऱ्याच दिवशी टिळकांचा जन्मदिवस होता. टिळकांवरचे तिन्ही आरोप ज्युरीने मान्य केले. टिळकांना दोषी ठरवत कोर्टाने 1 हजार रुपयांचा दंड आणि 6 वर्षांचा कारावास सुनावला. टिळकांनी शिक्षा ऐकल्यानंतर म्हटलेल्या ओळी इतिहासात नोंदवल्या गेल्या,

ज्युरीने मला दोषी ठरवले तर खुशाल ठरवो. पण मी गुन्हेगार नाही. लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी एक शक्ती या न्यायपीठाहून वरिष्ठ आहे. मला शिक्षा व्हावी आणि मी शिक्षा भोगल्यानेच मी अंगिकारलेल्या कार्याला उर्जितावस्था यावी, अशी कदाचित या शक्तीचीच इच्छा असेल. खटला आजच निकाली निघणार हे कळल्यानंतर कोर्टाबाहेर गर्दी जमू लागली. अध्येमध्ये पावसाच्या सरी येत असूनही लोक निकाल येण्याची वाट पाहत थांबले. कोर्टाबाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टिळकांना शिक्षा झाल्यानंतर मुंबईत संताप दिसायला लागला. व्यापाऱ्यांनी बंद पुकारला, गिरणी कामगारांनी संप केला, काही ठिकाणी दंगलीच्याही घटना घडल्या, लष्कराला बोलवून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. या काळात टिळकांना साबरमतीच्या तुरुंगात ठेवलं गेलं. साबरमतीहून टिळकांना बोटीने रंगूनला आणि तिथून मंडालेला तुरुंगात रवाना केलं गेलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: Lokmanya Tilak information in Marathi news updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x