16 December 2024 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

!!! मृदगंध !!!

Marathi Kavita, Mrudagandh, written by Piyush Khandekar

काळ्या ढगांची गस्त वाढू लागते
उन्हही बेपत्ता झालेली असतात
नकळतच मन भरुन येत अन आभाळ
भर दुपारीच अंधाराच साम्राज्य पसरवतात

क्षणांत आठवणींच्या छतावर
ढगांची ये-जा असते
चम-चमणा-या विजेची
दादागीरीही कमी नसते

अनायसे अशावेळी मी
बाहेर पहात असतो
क्षणाचाही विलंब नसतो की,
जमीनीवर पाऊस तुटून पडतो

वातावरणात गारठा रेंगाळत राहतो
अंगावर काटा उठत राहतो
कड कडाट! ढुम! फSSट्टा
करत विजेच पात लकाकतो

आठवांणी मन ओल चिंब करतो
निगरगट्ट आठवांचा चिखल तुडवतो
वारा! वादळ घेवुन अंगावरच येतो
क्षाणातच मन भिजवायला अडवतो

कितीही आठवांच आभाळ भरल
तरी आज धुंद भिजणार नाही
क्षणा-क्षणात कितीही उरल
तरी आज मृदगंध दरवळणार नाही

 

लेखक: पियुष खांडेकर

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x