16 December 2024 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

सांज किनारा..!

Marathi Stories, Marathi Laghu Katha, Marathi Kavita, Marathi Bhay Katha, Marathi Sahitya

ती त्याची वाट बघत सारखी ये-जा करत होती. वेळ झाली होती त्याच्या येण्याची पण उगाच तिची नजर भिरभिरत होती. सांजेचा रवि पुन्हा तिच्या हातांवरच्या मेहंदीचा रंग नभावर उधळत होता. फिक्कट पुसट होत किनारा वारा दमट होत होता.

अजुन कसा आला नाही. कुठे राहिला हा! नेमकं वेळे आधी हजर असलेला एखाद वेळेस चुकला तर होता-होईल तितका त्रागा-शंका-कुशंका वरचे-वर मनात डोकावत राहातात. धावत येत असलेल्या लाटेसोबत सावकाश तो ही तिच्या मागे तिच्या नकळत येतो.

डोळ्यांवर हात ठेवून खर्जातला आवाज अजुन खर्जात नेवून बोलतो “ओळख पाहू”. तिची वैतागलेली पाकळी त्याच्या स्पर्शाने मोहरुन खुलून येते. एका हातात त्याने लपवलेली गुलाबाची फुले ‘तुला हवा तोच आहे’ गंधातून चुगली लावून देतो. ती ओळखते आणि तो विस्मयीत होतो.

कसं ओळखलंस-कसं ओळखलंस सांग-सांग हैरान करु लागतो. ती फक्त हसते! त्याच्या हातातली फुले घेवून लाटांजवळ धावत जाते. तिच्या मागे तो पळतो आणि अस्ताला जाणारा सुर्य गुलाबी रंगाची बरसात करतो. लाटांशी खेळ करत, वाळूवर पाऊले रुतवत त्या दोघांची क्षितिजावर एक शत-पावली सुरु होते.

हातात हात गुंफले जातात. पावलांशी पाऊले मिळवले जातात. सहवास स्पर्शाचा अबोल एका क्षितिजाचा नजरेतून नजरेत संवाद पेरतो. उधळलेला प्रत्येक रंग त्यांच एकमेकांवरच प्रेम व्यक्त करतो. ते दोघं मात्र त्याच रंगांवर नजर खिळवून एकमेकांच्या शेजारी उभे असतात. नि:शब्द-स्तब्ध-हतबद्ध स्वत:च्या प्रेमाच्या उधळणीला दृष्ट लावत, हातांची गुंफण घट्ट करत अनवाणीच…रात्रीच गडद सावट उमटे पर्यंत..!

लेखक: पियुष खांडेकर

 

Marathi Kavita English Title: Marathi Kavita Sanj Kinara written by Piyush Khandekar.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x