6 January 2025 12:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Interest Rates | SBI बँकेच्या FD व्याजदरात बदल, आता किती व्याजदर मिळणार जाणून घ्या, फायद्यात राहा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक BUY करावा की SELL, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: IRB IREDA Share Price | इरेडा सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT
x

उन्हाळा..!

Piyush Khandekar, Marathi Kavita, Unhala

ऊन जास्त तापू लागले की असं होतं,
घामाची धार लागून मन तहानलेलं होतं..

बर्फाशिवाय मग काहीच लागत नाही,
चहा कॉफीपेक्षा लिंबू सरबत बरं वाटतं..

गरम-गरम वरण भात नकोसा वाटतो,
दहीभात दोन टाईम हल्ली पुरत असतो..

लाहीलाही होऊन देह दुपारी गारवा मागतो,
डोक्यावर तीन पात्याचा पंखा गरगरत राहतो..

उन्हात आल्हाद शोधत फिरणं होत असतं,
नेमकं ज्यूस आइस्क्रीम पार्लर बंद सापडत..

वडापाव भजीचा तेलकटपणा चीटकुन बसतो,
अन् कपाळावरची घामाची थेंब मी टिपून घेतो..

देहाला सावली हवी अन् काळजाला थंडावा,
पण पावलं शोधत राहतात मातीतला ओलावा..

उन्हाळा येतो अन् सावलीलाही जाळत जातो,
बर्फाच्छदित प्रदेशातले टूर महाग करत जातो..

झाडं सुकून जातात अन् पाचोळा गोळा होतो,
करपलेला देह पुन्हा आगीत होरपळत जातो..

सांजेला उनाड वारा बेपत्ता झालेला असतो,
रोजची चिडचिड रात्री दही खिचडीत पचवतो..

हा उन्हाळा आतल्याआत धगधगत राहतो,
रात्री केव्हातरी गारवा हळूच स्पर्शून जातो..!

लेखक: पियुष खांडेकर

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x