4 January 2025 7:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

आपण..! सिंगल आफ्टर मॅरेज

Marathi Stories, Marathi Laghu Katha, Marathi Kavita, Marathi Bhay Katha, Marathi Sahitya

आपण, तसा तर तीन अक्षरांचा एक शब्द आहे. तू तुझ्या टोकावर आणि मी माझ्या टोकावर या दोन टोकांना एकत्र आणणारे बेट म्हणजे आपण. आता विभक्त झाल्यावर स्पष्ट भाषेत फारकत झाल्यावर संबंधांना सोप्या शब्दात नात्याला पुन्हा बेटावरच्या आपण या नौकेत वल्ल्हवण्यासारख कारण काय असतं? पटत नाही- सुर जुळत नाही- एखादा स्वर बेसुर लागला झालोत वेगळे! मनात असलेल्या गोष्टी दडवल्या भुतकाळाची कल्पना दिली नाही याची फसगत केल्याचा पुरावा उभा वर्तमान असल्यावर आणि ताणलं म्हणून तुटलचं! अर्धवट अपेक्षेवर उपेक्षा करुन फरफटत असण्यापेक्षा तुटेल एवढं मी ताणतोच..!

हो! कोंडामारा स्वतःसोबत तुझा कशाला म्हणून करावा? अधिकार होते तेव्हा त्रास आणि अधिकार संपुष्टात आणूनही जाच वाटतोच! माझ्याकडून तुला काही नको होतं आणि तुझ्याकडे माझं असं काहीच नव्हतं. ते अजूनही तुझं तुझ्याकडे माझं माझ्याकडे व्यवस्थितच आहे. अगदी बरोबर शिल-आब्रू-इभ्रत अगदी तशीच पवित्र आहे स्पर्श करुन नासवलं आणि उष्ट केलं असा फसवणुकीचा व्यवहार मी केलाच नाही. तू स्वतः जवळ आलीस तरीही! त्या क्षणाला कसबीनं लाथाडलेच आहे. कारण ती फक्त नात्यातल्या व्यवहाराची गुंतवणूक होती. नात्याची गुंफन करणं तुला? नको, मलाच जमले नाही..!

मी अंतर ठेवलं बऱ्याच मैलांची उंची सुद्धा गाठली. जाणारी-येणारी वाटं मोकळी राहू दिली. तुझे तुला भेटणे आवश्यक होते आणि मला माझे! एकमेकांना भेटून सर्रास होणारा व्यवहार अपहार असतो. त्याला टाळून एकत्रित येणं हे ‘आपण’मध्ये समाविष्ट उगाच कसं करायचं? का करायचं? तू जोडते जोड म्हणालो, तोडते तोड म्हणालो! पण आपण जपू या नात्याला असं माझं म्हणन सहज विसरुन जायचं..!

बरं केलस! हो, खरंच बरं केलस. आज आठवलं ना तुला ते सगळे? अगदी नातं तुटल्यावरच सर्व कळले. इथेही तुझी अपेक्षा होतीच मी पुन्हा एक संधी द्यावी आणि तुटलेल नातं पुन्हा जुळवून घ्यावं! पण याची खात्री काय? की पुन्हा असे होणारच नाही? नात्यातून एकदा विश्वास उडाल्यावर पुन्हा तो मिळवणं शक्यच नसतं. मग कितीही चांगुलपणा जपला आणि कितीही तोंड गोड केलं तरी नात्यातला कडवटपणा आयुष्यभर जात नाही तो रेंगाळत राहतो अपमानासारखा..!

सन्मान करता येत नाही म्हणून अपमान करायचा नसतो! हे जरी बरोबर वाटत असले तरी व्यक्तिसापेक्ष स्वभावाच्या आणि अनुभवाच्या चौकटीत बसवल्यावर प्रत्येकाला माझंच खरं करायची सवय असते. साध्या सुध्या जखमासुद्धा जीवघेण्या होऊन त्यांना हसत सहन केल्यावर सहजतेने मनात नसतांना ‘इगो’ हा दुखावला जातोच कारण कोसळल्यावर पुन्हा सावरणे शक्य नसते. ज्या वाटेला पुन्हा चालायचेच नाही त्या वाटेला पुन्हा पावला खाली आणून लाजवायचेही नसते..!

एकदा चढलेल्या चौकटीत मी माझा प्रामाणिक राहू शकतो. पण एकदा सोडलेल्या चौकटीत परत येऊन अपमानाने तुंबलेल्या नजरांना सामोरे जाणे आणि स्वतःमुळे लाजीरवाणे जातवले जाते हे कळने असह्य होते. नातं तोडण्याआधी नातं शाबूत असायला एक नव्हे, शांतपणे कळत-नकळत हजार संध्या दिल्या जाऊ शकतात पण एकाने देत राहायच न दुसऱ्याने स्वैर असायच कण भराचा स्वार्थीपणा जपायचासुद्धा नाही ही कदर रुपी अपेक्षा आपल्या ‘आपण’ वेगवेगळ्या तू आणि मी मध्ये हास्यास्पद उरली आहे.

दोन टोकं एकत्र आणून गाठ बांधता येते. ती बांधलेली गाठ जपण्यासाठी टोकावर यायचे की सोडण्यासाठी टोक गाठायचे हे नात्यात पडणाऱ्या गाठीच्या नकळत ठरवायचे असते. तेव्हा तू मी बरोबर आपण म्हणू शकतो अन्यथा “सिंगल आफ्टर मॅरेज” याची उद्या होणारी मोठी संकल्पना मला नाही वाटत विशेष काही महत्त्व ठेवेल नात्याचे..!

 

लेखक: पियुष खांडेकर

Marathi Laghu Katha English Title: Marathi Laghu katha Apan Single after marriage written by Piyush Khandekar.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x