4 January 2025 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

कधी कधी वाटत...

Laghu Katha, Kadhi Kadhi Vatata,  Piyush Khandekar

कधी कधी वाटत देवाने उगाचच मन दिले नको तितके हजारो आपल्या काहीही कामाचे नसलेले विचार मनात येत राहतात
कधी जुन्या आठवणी मनात अडतून येतात तर त्याच त्याच रटाळ जगण्याची सवय ओठंना उगीचच हसायला लावतात

मनाची एकग्रता करावी तरी कशी साल ! कळतच नाही आपल्याच तंद्रीत असलेले आपण  पाठीमागून कधी कुणाची थाप पडते आणि एखाद
श्वान गाडीखाली सापडल्यावर त्याची जशी केवीलवाणी अवस्था होते तशी कधी कधी आपलीही होते कुठे हरवत हे मन तिच्या विचारात…. ???

छे कहीतरीच काय ती कुठे तू कुठे काही ताळ मेळ तरी आहे काय?? तिचा अस विचार करण्या इतपत तू तिला ओळखतोस काय?? काय माहिती आहे तुला तिच्या बद्दल??

जे माहिती आहे ते खरच आहे कशावरून ती खोट बोलत असेल तर ?? तू तरी कुठे खर खर तुझ्या बद्दल सांगितले आहेस तुझे ही अफेअर होते ते…. मी सांगितले आहे तिला माझ्या बद्दल सगळे खरे

खरे !! अगदी सुरुवाती पासून आता पर्यंत जे काही झाले ते सगळ सांगितलंय मी तिला….यात माझ मन थोड स्वार्थी झालाय मला मान्य आहे मी माझ मन माझ्या मनातली घुटमळ कुणाला तरी

सांगायची होती अगदी एकटा किती रे सहन करणार किती काळ मनातच ठेवणार होतो मी ते सगळ असह्य झालंय अजिबाद सहन नाही होत आता खूप झाल ज्याला पाहव तेव्हा तेव्हा माझ घर ठोठावणार नाही ठोठावणार सरळ आत येणार आणि काय सगळाच लुटून जाणार ?? माझ जन्म काय देण्यासाठीच झालाय का मला नसेल का वाटत कुणाला दोन क्षण माझ मन काळाव

मला समजून घ्याव !! मला नाही का हक्क माझ मन हल्क करायचा माझ टेंशन कुणाला देयाचा ?? मी किती ऐकून घेणार किती समजावणार अजून किती त्यांच्या अडचणी माझ्या मनात कोंबणार ….?

त्यांनी याव भडाभडा मनातले सगळे गा-हाणे सांगावे आणि काय करू आता विचारावे ?? मी का सांगू तू अस कर—तस कर हे करून बघ सगळ ठीक होईल??

त्यांना आलेल्या अडचणी साठी माझ्याकडे उत्तरे आहेत पण माझ्या अडचणींना मी का म्हणून लपून ठेऊ का मी नको सांगू कुणाला?? का ?? का हे माझ्या सोबतच होत?

का??

 

लेखक: पियुष खांडेकर

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x