Laghu Katha | Lahanpan Dega Deva | लहानपण देगा देवा...!!
मराठी शाळेत असतानाचे दिवसच मी व्यक्त करू शकत नाही. कारण बालवयात जे काही संस्कार आमच्यावर झालेत त्याच संस्कारांच ओझ घेऊन आम्ही आता आमच जीवन जगतो आहे. मला अजूनपण माझे ते दिवस आठवत…आणि आपोआपच डोळ्यातून पाणी येत.
लहानपण देगा देवा… मुंगी साखरेचा रवा
ऐरावतरत्न थोर त्यासी अंकुशाचा मार..
खरच या ओळींचा अर्थ मला आत्ता समजायला लागला आहे. त्या वेळच जीवन अगदी सभ्य म्हणजे, त्या कोवळ्या चेहर्याला कोणीच नाव ठेऊ शकत नव्हत कारण त्या वेळेस काही समजतच नव्हत आणि जसेजसे मोठे होत गेलो तसतस माणूस नावच खर रूप बिलातून एखाद खेकड हळूहळू बाहेर येत हे रूप जगासमोर येऊ लागल.
‘Lahanpan Dega Deva’ a Marathi Laghu Katha | लहानपण देगा देवा…!!
खोटेपण, मोठेपना, अश्लीषता, चावटपणा, चिडणे, राग, मोह, माया, मत्सर…अश्या अनेक रूपांनी तरुणपण हळूहळू उजळत चालाल होत. जगात हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक सोडले कि बाकीच्या सर्व लोकांला हे गुण लागू होतात त्यात मी पण अपवाद नाही.
पण शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. कोवळ्या मनावरती जे काही संस्कार आपण बिंबवू शकतो ते तुम्ही तुमच्या जीवनात अथक प्रयत्न करुन्सुध्या बिंबवू शकत नाही. प्रतेक व्यक्तीन त्याच माध्यमिक शिक्षण त्याच्या मातृभाषेतच कराव हे माझ स्वार्थी मत आहे, पण आजकाल तस पाहायला भेटतच नाही. सध्याची शिक्षण व्यवस्था बदलत आहे. आणि याला कारणीभूत कोण असेल तर आजकालचे उचाशिषित ज्यांनी कधीकाळी आपल शिक्षण मराठी शाळेतच केल होत …. पाचवीपर्यंत यांना ABCD येत नव्हती अशे पालक आज आपल्या पाल्याकडून तो पहिल्या वर्ष्यातच फाडफाड इंग्लिश बोलावा ची अपेक्षा करणारे हेच ते लोक.
मी जेव्हा पाच वर्षांचा झालो तेव्हा मला जेमतेम कळायला लागलेलं. रंग, माणसं, भाषा इत्यादी गोष्टीची जेमतेम ओळख होत होती. तेव्हा घरच्यांनी म्हणजे माझ्या वडिलांनी मला अंगणवाडीत बसवलं..पाटील बाईंकडे छान छान गाणी शिकत दुपारचा अल्पोपहार करत अर्धा दिवस कसा संपायचा कळत पण नसायचं. तिथेच पहिल्यांचा ओळख झाली ती अक्षरांशी. यानंतर खरं शिक्षण चालू झालं मराठी शाळेत. गुरुजींनी अंगणवाडीत येऊन प्रत्येकाला, डावा हात डोक्यावर घेऊन उजव्या कानाला लावायला सांगितला. ज्यांचा पोचला त्यांची पहिलीच्या प्रवेशासाठी निवड झाली यातच माझही नाव होतच.
इथं खऱ्या अर्थाने हसत खेळत शिक्षण चालू झालं. जिल्हा परिषद ची कौलांची शाळा, एखाद्या सर्वगुण ससंपन्न शाळेपेक्ष्या कमी न्हवती.तो दररोज दहा ते आकार वाजेपर्यंत चा परिपाठ …राष्ट्रगीत …प्रतिज्ञा…प्रार्थना… (खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे..)….(आता उठू सारे रान आता पेटउ सारे रान ..)….बोधकथा … सुविचार …आणि पसायदान …जगन शिकून गेला ..
आकार ते पाच मधळ ते मराठी शाळेच जीवन … पाहीला तास वर्गाशिकाशकांचा ….हजेरी …. काल गैर हजार राहणार्यांना मिलनारी शिक्ष्या… दंड वसूल करणारा सेक्रेटरी… पाहीला मराठीचा तास ..मग गणित …हिंदी .. जेवणाची सुट्टी … इंग्रजी …इतिहास/ भूओल /आणि विज्ञान …चार वाजले कि गांडीला पाय लागेपर्यंत मैदानावर उद्या मारण… खो खो ,कब्बडी , नगडी, लगोरी, पकडापकडी, रस्सीखेच, घोटी खेळ, भोहरा फिरवणे, लपंडाव…खेळता खेळता मराठी शाळेतली सात वर्ष कशी निघून गेली काही समाजालच नाही.
मला आठवत मी पाचवीत होतो तेव्हापासून आम्हाला पोषण आहार शाळेतच मिळत होता आम्ही बहुतेक विद्यार्थी शाळेतच जेवण करायचो. तो मिळणारा डाळ भात अगदी आवडीने आमच्या गळ्यातून खाली उतरायचा मित्रांसोबत बसलेली पंगत जवळजवळ एक तास भर चालायची एकमेकांची मस्करी करत मजेत जेवण केल जयायचं, जेवणासाठी आम्हाला वेळेचे अस काही बंधन नव्हत कारण सरांलापण तेच हव होत त्यांला पण कंटाळा यायचा, आम्ही जेवढे शांत जेवण कारायाचो त्यापेक्ष्या जास्त दंगा वर्गात असायचा. म्हणून ते आम्हाला काही बोलत नसायचे. नंतर हळूहळू तो पोषण आहार बंद झाला. व आमचा मजेचा काळ लोटला.
सकाळी नाऊ च्या सुमारास माझी शाळेला जायची तयारी सुरु व्हायची. माझ सगळ आवरून झाल्यानंतर आम्ही प्रतेक मित्राच्या घरी जायचो व सगल्यानला सोबत घेऊन मगच शाळा गाठायाचो. आमच्या गावी अजून एका गावाची मुल शिकायला यायची आमचा गाव तरी बरा पण त्याचं गाव अगदी अशिक्षित, जवळपास सगळे विद्यार्थी धनगर समाज्यातील होते. दुसर्याच्या शेतात जाऊन मजुरी करणाऱ्या लोकांची हि मुल अगदी चलाक, तल्लख एक एक हिरा होता हिरा आम्हाला सगळ्या सुख सोई मिळूनसुद्धा आम्ही त्यांच्यासमोर फिके पडायचो.
जवळजवळ तीन एक किलोमीटर चालत हि सगळी आमच्या गावी शिकायला यायची. उन्हाळा,हिवाळा यांना यायला काही त्रास नव्हता पण जसा पावसालायायचा तशी यांची हलत खूप बिकट व्हायची. ना यांना छत्री मिळायची ना रेनकोट मिळायचा, बापडी पोत्यांची खळगी करून स्वताला सावरत सावरत यायची पण शाळेपर्यंत येऊन पोहचायला ती सगळी कुडकुडायला लागायची. संपूर्ण शरीर भिजलेल तशीच वर्गात येऊन बसायची पण जिद्दीन शिकायची. कधी कधी अस वाटायच कि कुठून येते एवढी जिद्द खरच अजब आहे…. देवा तुझी किमया… तू श्रीमताला अजून श्रीमंत करतोस आणि गरिबाला अजून गरीब बनवतोस…..
इथं भेटलेले प्रत्येक शिक्षक आईवडिलांच्या मायेप्रमाणे माया देणारे. सातवी पर्यंतचा प्रवास आणि मौज मजा ते अभ्यास कधी अभ्यास राहिला तर भेटलेली शिक्षा असा संपूर्ण प्रवास बघितलेली आमची जिल्हा परिषद ची शाळा. इथं विद्यार्थी तयार व्हायचा तो शिक्षक आणि पालक यांच्या मेहनतीने, जसा पैलवान आखाड्यात तयार होतो ना अगदी तसाच ..सद्या हे चित्र पूर्ण बदलत चाललंय..
इंग्लिश मेडियम च भूत आता प्रत्येक पालकांच्या डोक्यावर बसलय, सध्या अनेक शिक्षण संस्था निर्माण झाल्या आहेत. लहान मुलांचं बालपणच जणू या शाळांनी हिसकावून घेतलंय. एखाद्या बाहुल्यासारखं त्यांना गाडीत टाकायचं आणि संध्याकाळी परत उतरून घ्यायचं. पण यानां कोण सांगणार कि इथल्या परिपाठातील जे संस्कार मुलांच्या मनावर होतात ते तिथल्या इंग्रजी पोएम मध्ये कुठून येणार, मराठी शाळेच्या वातावरणात तयार झालेला प्रत्येक विद्यार्थी आज यशाच्या शिखरावर आहेच की ! हि जर परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस ह्या जिल्हा परिषद च्या निसर्ग रम्य पवित्र आणि निर्मळ मंदिरांना टाळे लागतील.
दानपेटी ही मंदिरापेक्षा शाळेसमोरच्या सरस्वतीच्या मूर्तीसमोर असायला हवी कारण पैशाची गरज देवाला कधीच नव्हती आणि राहणार हि नाही गरज तर त्या विद्यार्थ्याला आहे ज्याच भविष्य शिक्षणाशिवाय अर्थहीन आहे. शिक्षणाचा अयोग्यपणे मांडला गेलेला बाजार यामूळ या तरुण देशात बेकारी वाढत चालली आहे…
लेखक: अजित नांदवडेकर
Laghu Katha Title: Lahanpan Dega Deva Marathi laghu katha.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- SIP Calculator | 10 हजारांच्या SIP मधून कोटींची रक्कम जमा करण्यासाठी किती कालावधी लागेल, SIPचे संपूर्ण कॅल्क्युलेशन