15 November 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

मैत्री...

Marathi Laghu Katha, Maitri, Piyush Khandekar

ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार आपण मैत्री दिवस म्हणून साजरा करतो, खर म्हणजे पाश्चात्य संस्कृतीतील डे’झ आपण डे बाय डे अंगवळणीच पाडून घेतले आहे
पण खरच छान दिवस असतात हे अगदी कधी नव्हे तो एक दिवस मित्र मैत्रिणींसोबत एनजॉय करायला आणि जमलंच तर तो दिवस आपल्या मनातल्या आठवणींच्या पानात जपून ठेवायला… नाही नाही ते कल्पना मनात घर करू लागतात कुठे जायचं कस जायचं तरुण मन सळसळत रक्त धाडसी प्रवृत्ती कसलीच तमा बाळगत नाही… आणि हो या दिवसासाठी घरी बरंच काही खोट बोललं जाते बर का रात्रीचा आऊटिंग आणि स्टे असेल तर… मित्राच्या बहिणीच लग्न, बर्थडे पार्टी आणि काय काय…

पण ते दिवस असतात पुढे कधी येणारे नसतात वडिलांशी एक वेळ आपण खोटे बोलतो पण बाहेर जातांना आईला नाही तर मोठ्या भावाला बहिणीला खर काय ते सांगून जा कारण कमी जास्त काही झाले तर निदान ते तुम्हाला पाठीशी घालू शकतात अथवा मदतीला तरी येऊ शकतात… पण मैत्रीचा दिवस म्हणून ड्रिंक्स घेतलीच पाहिजे असे नाही या शिवायही मैत्रीचा दिवस वेगळ्या पद्धतीने आपण सेलेब्रेट करू शकतोच ना… असो तुम्हाला कितीही काही सांगितले तरी तुम्ही ऐकणार थोडी “मेरी मर्जी” नुसार करा काहीपण पण प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते तिथपर्यंतच आणि तेव्हडच…..!

तस पहिले तर मित्र आणि मैत्रिणींची संकल्पना शाळेपासून सुरु होते… आणि असे बरेच उदाहरण आहेत जे शाळेपासून ते कॉलेज, कॉलेज पासून ते आपल्या आयुष्यात मैत्रीचे अग्रगण्य स्थान ठेवून असतात, जोडलेली नाती टिकवून ठेऊन असतात शाळे नंतर वाटा वेगळ्या होयच्या कारण कॉलेजसाठी प्रत्तेक जन वेगळी शाखा निवडायचा… मग सेक्शन वेगळे मित्रांसाठी मैत्रिणींसाठी वेळ जमणे अशक्यच त्यातही मग एखादी मैत्रीण एखादा मित्र आयुष्यात आला अथवा आली तर सगळ दूरदूरच होऊन जात…. मित्र मैत्रिणी आठवतात तेव्हा जेव्हा एखाद पाऊल चुकत, एखादी व्यक्ती चुकीची जोडली जाते सर्वे सुज्ञ आहेत चुकीचे काही पण आपल्या जागेवर ते व्यवस्थित असतात… पण आपल कस सगळ चांगलं-चांगलं हवे असा अट्टाहास थोडक्यात अपेक्षा असते…

पण एखादा निर्णय चुकला अथवा व्यक्तीही निवडण्यास चुका झाली तरी आयुष्यात असेही प्रसंग असावेत मी तर म्हणतो आवर्जून यावेत… काय प्रत्येक चुकीची वेळ आपल्याला त्याचं खर प्रतिबिंब दाखवून जात असते अस मला तरी वाटत… पण एक मैत्री अशी असावी, ज्यात कसलीच अपेक्षा नसावी, एक नात जोडलं जावं आणि आयुष्यभर जपलं जावं… हल्ली माझ्या मैत्रिणी म्हणतात मैत्रिणीपेक्षा एक मित्र असलेला कधीही चांगला…आणि मित्र म्हणतात मित्रांपेक्षा एक मैत्रीण असलेली कधीही चांगली… मान्य पण सगळेच नशीब घेऊन येत नाही हे ही तितकेच खरे ना… मित्र मैत्रिणी असावेत एकसमान असावेत त्यात हेवे-दावे नसावेत… न स्वताचा स्वार्थ असावा… आयुष्य खूप सुंदर आहे मैत्रीच्या दिवस ५ तारखेला आहे पण त्या आधी २ तारखेला राखी आहे रेशमी बंध…. दरवर्षी राखी नंतर मैत्रीचा दिवस येतो हे मात्र खरय… कारण माहित नाही पण रेशमी धाग्या नंतर आपलेपणाचे धागे अधिक घट्ट होत जावं अशीच त्या निसर्गाचीही इच्छा असेल… अजून वेळ आहे या दिवसांना पण मी मात्र माझे आता पासूनच प्लॅन करायला सुरु केलंय… राखीला ताईला काय देयच…. आणि मित्रांना मैत्रिणींना आयुष्यभर लक्षात राहील अस एखाद गिफ्ट काय देयच…. तुम्हिही बघा ठरवलं नसेल अजून तर ठरवा…. कारण वेळ भुर्कन निघून जाते… बघा काही सुचतंय का नवीन आणि वेगळे काही….

एक जुने गाणे सतत ओठांवर येते,

“ये दोसती हम नाही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे…”

आणि शेवटी येत…

“दिल चाहता है, हम ना रहे कभी, यारो के बिन…

लेखक: पियुष खांडेकर

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x