विस रुपये...!
आज सहजच बाजारात जाण्याचा योग आला, रविवार म्हणून मटणाचा बेत सो थोडी कोथिंबीर, आले आणि उद्या बाबांच्या डब्यासाठी पावभर वांगे घेण्यानिमित्त गाडीचे वळण बाजारा कडे झाले, नेहमीचीच थोडी घासाघीस करून वजनात थोड जास्तच घेतलं. सगळ लवकर आटोपून एखादी सिगरेट प्यायला सवड मिळावी म्हणून आधी सांगितलेली कामे हाता वेगळी केली, सगळे गाडीच्या हॅंडलला आरामात झुलत ठेऊन जवळच्याच टपरीवाल्या कडून माझ्या ब्रॅंडची एक सिगरेट घेतली तिचे पण पैसे लगेच देऊन टाकले उगा मधेच फोन वाजला तर लगेच निसटायला बंर… झुरक्यांचे आस्वाद घेत, गडद धुराचे वलय सोडत टपरीच्याच बाजूला सावलीत मस्त रमत गमत आजूबाजूला बघत उभा राहिलो, काही क्षणांनंतर एक मध्यम वयस्क स्त्री थोडे जीर्ण झालेले लुगडे, एका हातात खेडूत साधारण परवडेल अशी नायलॉनची विजीर्ण झालेली पिशवी, हातात एक छोटी जर्मनची प्लेट…. हळद अन् कुंकू मुळे प्लेट नेमकी कशाची आहे ते कळले नाही पण जाडी वरून अन् कडेला असलेल्या अर्ध गोल रिंग वरून बहुदा जर्मनचेच असावे त्यात बहुतेक पितळ्याची लक्ष्मीची मूर्ती ती पण नक्की पितळ्याची का तिला पण बरेच दिवस हळदीच्या सहवास झाल्याने तिने घेतलेला तो पिवळा रंग माहित नाही, ती बाई माझ्या जवळ आली आणि दक्षिणा-दान मागू लागली, माझी निरीक्षणाची नजर त्या बाईला कळली असावी पेहराव्या वरून शेतात मोल-मजुरी करणारी वाटली अन् दान मागायची कला नुकतीच आत्मसात केली असावी अस बोलण्यात अवघडलेल्या शब्दांमुळे वाटले.
मी आपला सहज सुटे आहेत का म्हणून खिसे चाळू लागलो, खिसे चाळता चाळता सहज विचरले माऊशी दुष्काळा मुळे का दान मागता, जणू तिच्या दुखर्या जखमेवर नकळतच मी बोट ठेवलं, तिच्या डोळ्यात राग दिसला थोडी संतापाने कापुही लागली मी तसच बाजूला झालो माझी सिगरेट फेकली आणि पाण्याच पाऊच घेऊन आलो अन् तिला दिले, तिने ते निमूट घेतले आणि उभ्या असलेल्या जागेवरच बैठक मारून पाणी पिऊ लागली, जरा तरतरी आली वाटत तिला की बंर वाटल माहित नाही एव्हढंच बोलली स्वताची शेती आहे भाऊ पण कर्ज आहे सरकारने माफ केलंय पण कलेक्टर हापिसात कोणी दाद देत नाही गरीब म्हणून लाथाडले जातो, उपोषणावर बसलोही त्याच झाल काय आमची सोडून इतरांची रक्कम परत केली आमची ठेवली तशीच अजून अडकवून आम्ही पण किती निर्लज्ज म्हणून जायचं आम्हाला नाही का लाज?
शेवटी दिले पत्रक देयची तेव्हा द्या आमची रक्कम, सरकार दरबारी पण तक्रार अर्ज केला पण दाद काय लगेच मिळते होय शेतकर्याला? सतत आमचाच हक्क वारंवार मागायची आता लाज वाटते, लोकांकडे घर कामाला जायचे म्हंटले तर या घरकामवाल्या बायकांची युनियन त्यात त्यांची ठरलेली घरे ठरलेली कामे आम्ही पण करू म्हंटले तर नका आमच्या पोटावर लात मारू म्हणतात त्यांचही बरोबर मग उरल काय भिक मागायची तर हल्ली कोणी देत नाही ही देवाची मूर्ती पाहून दिवस दोन दिवसाचा गुजरा होईल इतक मिळते दोन दिवसांनी फिरते काय करू हेच एक साधन आहे मी फ़क्त सुन्न देवाच्या ताटाकडे पाहिले पाकीट काढून तिला विसची नोट देयला काढली तर तिने ताट पुढे केलं, मी हटकले! मी देवाला तस मानत नाही माणूस म्हणून देतोय हातात घ्या ताटात मी टाकणार नाही तिचा प्रश्नार्थक चेहरा अजूनही डोळ्यापुढून हलत नाही तिने मुकाट्याने हातात घेतले पैसे अन् गेली मी होतो तिथेच क्षणभर थबकलो कुणाची पिळवणूक देवही किती करतो…अन् स्वतःच्याच दगडी रूपाने पोट भरून श्रेयही घेतो वाह रे तुझी लीला… बरय माझा तुला अन् तुला पुजणार्यांना दुरूनच नमस्कार…!
लेखक: पियुष खांडेकर
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL