15 November 2024 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण ?

Marathi laghukatha, Tumacha Ayushat Prabhav Taknari Vyakti Kon, Piyush Khandekar

प्रभाव टाकणारा व्यक्ती म्हणन खर तर चुकच ठरेल माझ्या दृष्टीकोनातून पण “प्रभावित” करणारा योग्य ठरेल….

तस तर एक पानठेल्यावाला आहे वय जवळपास १६ नाव सागर

मुळचा राहणार सावद्याचा जळगाव जिल्ह्यातल्या येणार्‍या काही गावांमधले एक… वडील लहानपणीच वारलेले कारण शेती थोडक्यात कर्ज, शेतकर्‍याच्या मृत्यूच कारण थोडक्यात आता आपण सर्वेच गृहीत धरतो तसच याच्या घरचं ही तेच कारण… राहत घर आहे तेव्हड बर तेपण गहाण होत त्याचा काका धावून आला म्हणून कसबस वाचलं… त्याच्या काकाच्या पान टपर्‍या आहेत इथे जळगावात त्याने नुकतीच १०वि ची परीक्षा पास केली फर्स्ट क्लास मध्ये कुठल्याही प्रकारची शिकवणी न लावता…

काकांच्या कृपेने एक टपरी तो सांभाळतो, नेमकी त्याची टपरी देशी गुत्त्याजवळच आहे त्यामुळे परिस्थितीने खालावलेले अन व्यसनाच्या आधीन गेलेल्या खेडूत अन शहरी दारूड्यांना हा पोरगा उपदेशाचे डोस पाजतो ते पण व्यसन करू नका म्हणून… माझ आपल कॉफी काही सुटत नाही म्हणून मी सहजच कुतूहल म्हणून त्याच बोलन ऐकत होतो अन विचारात पडत होतो, ताणून झोपायच्या काळात हा पोरगा पोटापाण्याचा व्यवसायही करतोय आणि कधी उपाशी राहिला तरी उद्या मोठे होण्याची स्वप्नही बघतोय त्याच्या त्या कोवळ्या वयातील प्रौढ विचारांनी मी खूप प्रभावित झालो न राहवून त्याची थोडी चौकशी पण केली त्याला खूप शिकायचं म्हणतो पण कुणाचे उपकार घेऊन नाही स्वताच्या स्वाभिमानाने आणि इमानदारीने कमवून शिकेल पण शिकेल. त्याच वय आणि व्यावहारिक बोलन एकूण एकदम प्रभावितच झालो…

बाकी पोरगा नावासारखाच मनानी आहे… अन मनात घर करून राहणारा आहे सध्या ११वि कॉमर्सला आहे…..

लेखक: पियुष खांडेकर

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x