3 April 2025 4:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | खुशखबर, खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांना दरमहा 6,429 रुपये EPFO पेन्शन मिळणार, तुमचा पगार किती? Bank FD Vs Mutual Fund | बँक FD विसरा, इथे पैशाने पैसा वाढवा, वर्षाला 50 ते 90 टक्के परतावा मिळतोय Income Tax Notice | तुमचं बँक खातं आहे का? खात्यामार्फत कॅश व्यवहार करत असालच, इनकम टॅक्स नोटीस येण्याआधी लक्षात घ्या 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना जास्त फायदा होणार, रकमेत एवढी मोठी वाढ होणार IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB Rattan Power Share Price | रतनइंडिया पावर शेअर रेटिंग आणि टार्गेट प्राईस नोट करा, मजबूत परतावा मिळेल - NSE: RTNPOWER Horoscope Today | 03 एप्रिल 2025; तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल, गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

न पाठवलेलं पत्र..!

Marathi Stories, Marathi Kavita, Marathi Laghu Katha, Marathi Bhay Katha, Marathi Sahitya

मला माहीत होतं तुझ्या पत्रात असाच काहीसा मजकूर असेल… म्हणून पत्र उघडून वाचावे असे मनात येऊ दिलेच नाही… मनावर जरी नियंत्रण असले तरी हृदयावर कुठं नियंत्रण मिळवता येते? पाण्याला बांध घालून निश्चित अडवता येत असतं पण आठवणींच्या उधाणलेल्या लाटांना काही करुन थोपवता येत नसतं…ओझं बननं आणि ते पेलनं दोन्ही दुय्यम गोष्टी आहेत.

आपण कुणावर ओझं बनत आहोत अशी आपली वैचारिकताही एक ओझंच आहे. मुळात जबाबदारी व आयुष्याच्या प्रवास सुखकर होण्यासाठी बांधली गेलेली गाठ ही ओझं वाहून घेण्यासाठी पडत नसते..

समजनं, स्वीकारनं आणि आपलं करणं या प्रेमाच्या हळव्या व्यवहारात आपलं ओझं-मन वाटून घेणं असतं. जेणेकरुन आयुष्याच्या प्रवास हसत खेळत पूर्ण होईल… गालावर ओघळलेल्या अश्रुमधुन तुला मोकळं आणि व्यक्त होता येतं..पण माझं काय? हताश, आधार आणि ढासळनं काही केल्या तुला रुचणारं नसतं…

स्वतःबद्दल तुझ्याकडूनच माझ्या एवढ्या चांगल्या कल्पना असल्यावर तुझं सात्वन आणि तुझ्या व्यक्त होण्याच्या वाटेवर अडगळ म्हणून मी माझं अस्तित्व का ठेवावं? गालावर ओघळलेल्या आसवांना ओठांनी टिपतांना समाधान मिळत नाही. उलट मनात पडलेल्या कोरडला थोडा ओलावा मिळतो…

खरंच शोधायचे असेल तुला तर समाधान हे ओठांवरच्या आणि नजरेच्या हसण्यात शोधून बघ! बंधारा भरला म्हणून धरणाची दारं ही उघडाविच लागतात कारण साठवणुकीची मर्यादा ही ठरलेली असते. वाहत जाणाऱ्या पाण्याकडून आपण फक्त प्रत्येक क्षणाला आणि घटकाला स्वीकारायचे कसे? हे शिकायचे असते..!

लेखक: पियुष खांडेकर

 

Marathi Love Letter English Title: Marathi Love Letter Na Pathavalela Patra written by Piyush Khandekar.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या