ओळख नव्या आविष्कारांची: चुंबकीय आनुनाद प्रतीमायंत्र (MRI)
आजच्या धावत्या युगात मानवी जीवन सुखद बनविण्यासाठी अनेक नव नवीन आविष्कार घडवण्यात आलेले आहेत ज्याचा वापर करून खुपसारया अशक्य गोष्टी आगदी सहज पने शक्य झाल्या आहेत.
मराठी मध्ये खुप सुंदर म्हण आहे “गरज हि शोधाची जननी असते ” या म्हणीचा पुरेपूर वापर मनुष्याने आपल जीवन सोप आणि सुखद करण्यासाठी केला आहे यात तिळमात्र शंका नाही.
आज आपण वैदकीय क्षेत्रातल्या एका वेगळ्या आविष्काराबद्दल जाणून घेण्याचा प्रयन्त करूया. हा लेख वाचल्यानंतर तुमच्या खुपसार्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला भेटतील याची खात्री मला आहे म्हणूनच हा एक स्वार्थी पर्यन्त, या माशिनाबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा व सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा. चला तर वैदकीय क्षेत्रातील या रायगडच भ्रमण सुरु करूया…
हि मशीन एवढी महत्वाची का आहे हे सांगण्यासाठी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कि, जवळपास वेगवेगळ्या वर्षी चे तीन नोबेल पारितोषिक या मशीनचा अविष्कार घडवण्यासाठी समर्पित झालेली आहेत.
सन १९३७ च्या काळात कोलंबिया विध्यापिठातील भौतिकशास्त्र चे प्राध्यापक Mr.Isidor Rabi यांनी आण्विक नाभीक कणांची हालचाल मोजण्यासाठी एक वेगळी पद्धत जगासमोर मंडळी (method for measuring the movements of atomic nuclei) आणि त्यांनी याला परमाणु चुंबकीय अनुनाद (nuclear magnetic resonance (NMR)) अस नाव दिल या त्यांच्या आविष्कारासाठी सन १९४४ सालच भौतिकशास्त्र विषयातील नोबेल पारितोषिक त्यांना प्रदान करण्यात आल.
यानंतर जवळपास १५ वर्षा नंतर Mr.Paulataerbur या शास्त्रज्ञाने या विषयावर संशोधन करण्यास सुरवात केली आणि १९७१ साली ग्रेडीयंट चुंबकीय क्षेत्राचा (Gradient Magnetic Field) वापर करून द्वामितीय छायाचित्र काढता येऊ शकते आणि याचा उपयोग बायोमेडिकल शेत्रात होऊ शकतो असा महत्वपूर्ण शोध त्यांनी लावला.
त्याच काळात इंग्लंड मधील भौतिकशास्त्र चे प्राध्यापक Sir Peter Mansfield यांनी सुद्धा या अविष्कारावर संशोधन चालू केल होत आणि जवळपास १९७२ च्या काळात मानवी शरीराच्या आतील भागाची प्रतिमा उपलब्ध करून देणाऱ्या तंत्राचा शोध त्यांनी लावला.
सन १९८० साली MRI Machine चा वापर करून पहिली प्रतिमा मिळवण्यात संशोधकांना यश आल यात Sir Peter Mansfield व Mr.Paulataerbur या
संशोधकांचा मोलाचा वाटा होता. वैधकीय क्षेत्रातील या अविस्मरणीय अविष्काराबद्दल सन २००३ साली Medicine क्षेत्रातलं नोबेल पारितोषिक या दोन संशोधकांना बहाल करण्यात आल. यांनाच या MIR Technology चे God father सुद्धा म्हंटल जात.
या क्रांतिकारी शोधामुळे माणसाच्या शरीराच्या आतील असुरक्षित भागाची प्रतिमा काही मिनिटातच मानवी शरीराला कोणताही इजा न पोहचवता घेता येन शक्य झाल. यामूळ मनुष्याचा मेंदू सुद्धा एखाद्या खुल्या पुस्तकाप्रमाणे पडताळण शक्य झाल.
वैदकीय शेत्रात विविध रोगांचे निदान करण्यासाठी व तपासणी साठी डॉक्टरांना विविध प्रतिमा यंत्रांची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने क्ष-किरण मशीन, सोनोग्राफी मशीन , CT Scan मशीन या प्रकारच्या मशीन्स सर्वत्र उपलब्ध आहेत पण MRI Machines खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. मोठ्या मोठ्या हॉस्पिटल मधेच या मशीन ची सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते कारण छोट्या हॉस्पिटल ना हि गोष्ट न परवडण्यासारखी आहे. एकंदरीत पाहिलं तर एका १.५ ते ३ T माशिनची किंमत जवळपास पन्नास लाख ते वीस कोटी रुपये पर्यंत असू शकते (सर्व चार्गेश पकडून). हि मशीन बनवण्याचं धाडस खूप कमी कंपनी नि केल आहे कारण यासाठी लागणार तंत्रज्ञान अवगत करण हि जवळपास अशक्य गोष्ट आहे. हे तंत्रज्ञान अवगत केलेल्या कंपनी मध्ये प्रामुख्याने GE, Simens, Philips, Hitachi या कंपन्यांचा नंबर लागतो.
जर हि मशीन भारतात बनविली व याच तंत्रज्ञान अवगत केल तर वैधकीय शेत्रात खुपसारे जानिवपूर्वक बदल घडतील तसेच नोकरीच्या संधी हि उपलब्ध होतील. कारण आजच्या काळात वैधकीय क्षेत्रात हि मशीन काळाची गरज बनली आहे. हे एक अस तंत्रज्ञान आहे जिचा वापर आपण वर्षे नो वर्षे करत राहू.
या मशीनमध्ये मानवाच्या शरीराच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण केल जात. हे चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठीचा चुंबक बनवन हि या क्षेत्रातील खूप अवघड गोष्ट आहे. या चुंबकीय क्षेत्राच्या सोबतीला रेडीओ फ्रिकवेन्सी लहरींचा वापर केला जातो. व माणसाच्या शरीरातील विविध भागातील पाण्याच्या रेणूंचा अभ्यास करून संगणकाच्या मदतीने मानवी अवयवाची सखोल प्रतिमा तयार केली जाते. या मशीनचा वापर विविध रोगांचे निदान करण्यसाठी केला जातो यामध्ये प्रामुख्याने:
शरीरात धरणाऱ्या गाठींचे निदान
कर्करोगाचे निदान
मेंदू चे आजार
मज्जातंतू चे आजार
सांध्यांचे आजार
गर्भाशयाचे आजार
रधयविकार आणि राक्त्वाहीनींचे आजार
अश्या विविध आजारांचे निदान या मशीनद्वारे करणे आता डॉक्टरांना सहज शक्य झाले आहे. मुख्य म्हणजे या मशीन मध्ये किरणोत्साराचा अजिबात वापर केला जात नाही त्यामुळ हे मशीन बाकी मशीन पेक्ष्या खूप सुरक्षित आहे.
जाता जाता एवढाच सांगायचे आहे कि या सर्व रोगांचे निदान करण्यसाठी आपण या मशीनचा वापर करतो व हि मशीन आपल्या शरीरातील पाण्याचा वापर प्रतिमा तयार करण्यासाठी करते. आपल्या शरीरात जवळपास ७० % पाणी आहे. आपल शरीर सदृढ राहण्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची कमी कधीही न पडू देणे हि आपली जबाबदारी आहे.
धन्यवाद !!!!
लेखक: अजित नांदवडेकर
Marathi Science Story English Title: Marathi Science story ‘The invention of MRI Machine’ written by Ajit Nandawadekar on Maharashtranama.
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम