15 November 2024 7:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

Pandit Jawaharlal Nehru information in Marathi

मुंबई ०८ ऑगस्ट | पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा. पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडत असत आणि मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे. त्यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी झाला ७ फेब्रुवारी, १९१६ रोजी त्यांनी कमला कौर यांच्याशी विवाह केला. त्यांचे पिता मोतीलाल नेहरू होते आणि आईचे नाव कमला नेहरू होते.

१९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. कमला नेहरू यांच्याशी त्यांनी १९१६ साली विवाह केला. १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर कॉंग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. ते महात्मा गांधीजींच्या विचारांचे समर्थक होते. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत झाले. जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या वडिलांनी आपल्या संपत्तीचा आणि विदेशी वस्तूंचा त्याग केला व स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून स्वातंत्र्यचळवळीला प्रोत्साहन दिलं. ते खादीचा वापर करू लागले.

१९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली. १९२९ साली पं. नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय्य निश्चित केले गेले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. अनेक आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांना १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

पंडित नेहरू यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून सामान्य विज्ञान या विषयात पदवी मिळवली. १९१९ रोजी ते होमरूल चळ्वळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ रोजी ते पहिल्यांदाच महात्मा गांधीजी यांना भेटले आणि प्रचंड प्रेरीत झाले. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास झाला. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली.

१९२९ साली ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले. १९३६-३७ मध्ये नेहरूंच्या काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त्या केल्या गेल्या. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी उत्तराखंडातील अल्मोडा तुरुंगांमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना कैद झाली आणि त्यांच्या जीवनातील दीर्घकाळ कैद ठरली. त्यांनी काही पुस्तके सुद्धा लिहली आहेत ज्यांची नावं Discovery of India, Letters from a Father to His Daughter अशी आहेत. नेहरूंवर अनेकदा देशांच्या आर्थिक स्थितीवरून टीका केल्या गेल्या पण भारत स्वतंत्र होताच देशाला एका आर्थिक घडीत बसवणे कठीण होते ते नेहरूंनी योग्य रीतीने केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: Pandit Jawaharlal Nehru information in Marathi news updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x