पुरोगामी विचारांच्या थोर समाजसुधारक पंडिता रमाबाई
मुंबई, ०७ ऑगस्ट | इतिहासात अशा काही स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी सर्वांच्या विरुद्ध जाऊन समाजासाठी आणि देशांसाठी पुढे येऊन कार्य केले आहे . त्यापैकी एक म्हणजे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांचा जन्म २३ एप्रिल, १८५८ रोजी कर्नाटकात झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे पुरोगामी विचारांचे होते म्हणून त्यांनी रमाबाईंना वेदादिचे शिक्षण दिले. दुष्काळ पडल्यामुळे त्यांना घर सोडावे लागले होते आणि या भ्रमंती दरम्यान त्यांनी संस्कृत चे शिक्षण सुद्धा घेतले. १८७४ मध्ये भारत भ्रमण करताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावाबरोबर भ्रमंती करून विविध भाषांचे ज्ञान अवगत करून घेतले. कलकत्ता विश्वमहाविद्यालयातील पंडितांनी मोठ्या सन्मानाने रमाबाईंना पंडिता सरस्वती असे बिरुद अर्पण केले.
पुढे जाऊन त्यांनी बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी विवाह केला. आंतरजातीय विवाह करून रमाबाईंनी चुकीच्या रूढीविरुद्ध बंड पुकारले होते. काही कालावधीतच त्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्या पुण्याला स्थायिक झाल्या. पुढे त्यांनी समाजकार्यात वाहून जाण्याचा निर्णय घेतला. बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इत्यादी घातक चालीरीतींना नाहीसे कारण्यासाठी त्यांनी प्रथम पुणे येथे “आर्य महिला समाज”ची स्थापना केली.
१८८२ साली हंटर कमिशनपुढे साक्ष देताना त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांनी २९ सप्टेंबर १८८३ रोजी इंग्लंड मधील बॉटिज चर्चमध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. बंगाली स्त्रियांनी त्यांना “भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण” असे मानपत्र दिले.
आनंदीबाई जोशी यांच्या ६ मार्च १८८६ रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभास हजर राहता यावे म्हणून त्या फेब्रुवारी १८८६ मध्ये अमेरिकेस गेल्या. हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त होणारी ‘बालोद्यान शिक्षणपद्धती’ त्यांनी शिकून घेतली व त्यासंबंधी मराठी पुस्तके लिहिली. अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात हिंदू बालविधवांच्या प्रश्नाचा ऊहापोह करणारे द हायकास्ट हिंदू वूमन (१८८७-८८) हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले. स्त्रियांच्या शोषणाच्या मुळाशी असलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेची कठोर चिकित्सा रमाबाईंनी त्यांच्या या पुस्तकात केली आहे.
एवढेच नव्हे, तर त्या काळातील संपूर्ण देशातील आणि त्यातही महाराष्ट्रातील भौतिक, वैचारिक तसेच सांस्कृतिक व्यवहार ज्या पुरुषप्रधानतेच्या पायावर उभे होते, त्या पुरुषप्रधानतेचे सखोल विश्लेषण, चिकित्सा आपल्याला रमाबाईंच्या या ग्रंथात अभ्यासण्यास मिळते. त्यांच्या विचाराने अमेरिकन प्रभावित झाले. १८८९ मध्ये यूनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. हिंदुस्थानातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी अमेरिकनांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ व इतरही काही संस्था निर्माण केल्या. मुळ हिब्रू भाषेतील बायबलचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.
रमाबाईंनी १८८२ रोजी पुण्यात आर्य महिला समाज स्थापन केले, ११८७ अमेरिका मध्ये रमाबाई अससोसिएशन स्थापन केले, ११८९ रोजी मुंबई मध्ये शारदासदन (शारदाश्रम ) स्थापन केले. अशा प्रकारे रमाबाईंनी आयुष्यभर विविध चालीरीतीना सामोरे जाऊन स्त्रियांच्या आणि समाजाच्या भविष्यचा विचार केला.
रमाबाई आपल्या वडिलांप्रमाणेच काळाच्या पुढे होत्या. अत्यंत बुद्धिवान असलेल्या या महिलेचे अंतःकरण अत्यंत उदार व दीनदुबळ्या स्त्रियांकरिता सतत तळमळणारे होते. वैयक्तिक दुःखांची किंवा अडचणींची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. त्यांनी जरी दीनदुबळ्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारले, ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तरी कोणताही विशिष्ट ख्रिस्ती धर्मपंथ त्यांनी स्वीकारला नाही. त्या धर्माने ख्रिस्ती झाल्या; मात्र त्यांनी हिंदू समाज व संस्कृती कधी सोडली नाही. शेवटपर्यंत त्या शाकाहारी राहिल्या. त्यांनी सतत खादी वापरली व आश्रमवासींनाही ते वापरायला लावली. स्त्रियांच्या उद्धाराकरिता त्यांनी आजन्म व अथकपणे केलेले प्रयत्न त्यांच्या समर्मित जीवनाचेच एक अंग होते. ज्या व्यक्त्तींनी आपल्या सेवेने भारताची प्रतिष्ठा वाढविली त्यांमध्ये रमाबाईंचे स्थान वैशिष्टपूर्ण आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Story Title: Pandita Ramabai information in Marathi news updates.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News