16 December 2024 8:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

ती दोघं...!

Prem Katha, Ti Dogha, Piyush Khandekar

त्या दिवशी तिची माझी शेवटचीच भेट झाली, बोलायला काहीच नसल्यामुळे फक्त नीट राहा, काळजी घे, तब्बेत सांभाळ आणि सुखी राहा, एव्हढेच सतत निर्थक बोलत बसलो हा “क्षण” आमच्या आयुष्यात कधी ना कधी येणार होताच आणि आलाही, खंत एव्हढीच ज्या क्षणाची कल्पना आम्हा दोघांना सुरुवातीपासून होती तो इतका अचानक आणि आयुष्याच्या टर्निंग पोईंट च्या नंतर येईल असे वाटले तोच “क्षण” यमा सारखा अचानक दारात आलेला पाहून जरा पावले डगमगली…

ती तिच्या अश्रुंना वाट करून देत होती आणि मी तिला म्हणत होतो हसत खेळत आयुष्यात आलीस तशीत हसत मुखाने जा… ती काहीच बोलली नाही जाता जाता एकच विचारून गेली, मला संगतोयेस काळजी घे, तब्बेत सांभाळ…तू स्वतःलाही हे लागू करशील का? मी काहीच बोलू शकलो नाही बाईक सुरु केली आणि तिच्या बसण्याची वाट पाहू लागलो…

कसेबसे डोळे पुसत बसली ती शेवटचंच खांद्यावर हात ठेऊन, तिचा तो थरथरणारा स्पर्श बरंच काही बोलत होता, चेहरा नाही बघत असलो तिचा तरी ती रडत आहे अजूनही मला कळत होत…तिला तिच्या घराजवळ आणून बाईक थांबवली मी, तर आपला प्रवास संपलाय हे तिला कळलही नाही सावरासावर करत स्वताच्या मनाची बाईक वरून उतरू लागली…

मी तिला थांबवलं जरा आणि एकच म्हणालो आयुष्याचे सहप्रवासी बदललेत म्हणून मार्गही बदलायचे नसतात अन आपण पाहिलेले किंवा कुणाला दाखवलेले स्वप्न सोडूनही देयचे नसतात, प्रयत्न आपण दोघांनीही केले ते स्वप्न पूर्ण करण्याचे पण आता नाहीच होणार पूर्ण हे दोघांना सुरुवातीपासून माहित होतेच ना तरी स्वप्ने एकमेकांना दाखवलीच अन आता तुटली ती सारी स्वप्ने म्हणून का कुरवाळत बसलीस मान्य तुझ्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो पण तुला जगायला आणि जगत राहायला शिकवलंय कुणावर नाही पण मला तुझ्यावर अजूनही विश्वास आहे जगाच्या पाठीवर कुठेही असलीस तू तरी जगत राहणार आहेस…

ती अजून काहीच ऐकू शकली नाही हुंदका दाटून आला होता ती तोंडावर हात ठेऊन घराच्या दिशेने पळत गेली पुन्हा त्या दोघांची गाठभेट झाली की नाही कल्पना नाही येव्हढ निश्चित ती दोघ कुठेही असलीत तरी जगत राहतील एकमेकांसाठी, एकमेकांसोबत नाही जगू शकले पण एकमेकांच्या आठवणी जपण्यासाठी तरी जगतील…

 

लेखक: पियुष खांडेकर

 

Story English Title: Prem Katha ‘Ti Dogha’ written by Piyush Khandekar on Maharashtranama.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x