21 December 2024 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, मग ही फंडाची स्कीम पैशाचा पाऊस पाडेल, यापूर्वी 4346% परतावा दिला SBI Mutual Fund | बिनधास्त पैसे गुंतवा या SBI फंडाच्या योजनेत, पैसा अनेक पटीने वाढेल, सेव्ह करून ठेवा स्कीम डिटेल्स 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: IRFC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला - NSE: MUFIN Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट- NSE: MAZDOC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

Quit India Movement | 'ऑगस्ट क्रांती दिन' एक इतिहास | नेमकं काय घडलेलं?

Quit India Movement

नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट | 9 ऑगस्ट हा ‘ऑगस्ट क्रांती दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज ‘ऑगस्ट क्रांती दिना’ला 80 वर्ष पूर्ण झाली आहेत. 8 ऑगस्ट 1942 महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर 9 ऑगस्ट हा दिवस ‘क्रांती दिन’ म्हणून पाळण्यात आला. या आंदोलनाने ब्रिटीश साम्राज्याला हादरा बसला होता. तेथून पुढे पाच वर्षांनी भारताला स्वातंत्र मिळाले. त्यामुळे या दिवसाला भारताच्या इतिहासात खूप महत्त्व आहे.

80 वर्षापूर्वी म्हणजे 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलनाची हाक दिली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवसांपासून ब्रिटीशांनी महत्मा गांधी, पंडीत जवारलाल नेहरूंसह इतर महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यास सुरु केली. यावेळी महात्मा गांधींना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यात आले होत. आयुष्यभर अहिंसेचा मार्ग स्विकारणाऱ्या महात्मा गांधींनी यावेळी ‘करो या मरो’ असा नारा दिल्याने प्रत्येक भारतीयांच्या मनात उत्साह होता. त्यानंतर अनेकांनी रस्त्यावर उतरत क्रांतीची मशाल पेटवली. या आंदोलनाची व्याप्ती देशभरात पसरली होती. या आंदोलनाने ब्रिटीशांनाही हादरा बसला होता.

दरम्यान, या आंदोलनाला दुसऱ्या महायुद्धाचीही पार्श्वभूमी होती. जपानने सिंगापूर, मलाया आणि बर्मा जिंकून भारताच्या सीमेपर्यंत मुसंडी मारली होती. अशा वेळी मित्र राष्ट्रांसाठी भारतीयांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा होता. यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड लिनलिथगो. त्यांनी काँग्रेसला विश्वासात न घेता भारत दुसऱ्या महायुद्धात सहभागी होत असल्याची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी होती.

मात्र, काही दिवसांनी दुसऱ्या महायुद्धाच्या सहभागाबदल्यात स्वांतत्र्याची मागणी भारतीय नेत्यांकडून करण्यात आली. याकरिता ब्रिटिशांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्त्वात ‘क्रिप्स मिशन’ भारतात पाठवले होते. क्रिप्स मिशनने भारतीय नेत्यांची स्वातंत्राची मागणी धुडकावून लावत डॉमिनियन स्टेटस देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, भारतीय नेत्यांनी हा प्रस्ताव नाकारला. ते पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीवर ठाम होते.

भारत छोडो आंदोलनाच्या घोषणेनंतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर या आंदोलनाला नेतृत्व राहणार नाही आणि आंदोलकामधील उत्साह कमी होईल, अशी ब्रिटीशांची धारणा होती. मात्र, या उलट झालं, काँग्रेस नेत्यांना अटक केल्यानंतर भारतीयांमध्ये असंतोष वाढतच गेला. अनेक ठिकाणी आंदोलकाकडून रेल्वे पटऱ्या उखडण्यात आल्या, पोलीस स्टेशनला आग लावण्यात आली. यावेळी जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहियांसारख्या नेत्यांनी भूमिगत राहून या आंदोलनाला दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यासाठी भूमिगत रेडीओ केंद्रही सुरु करण्यात आली होती.

या आदोलनात महिलांसह कामगार, शेतकरी, विद्यार्थी, पत्रकार, कलाकारांचा सक्रिय सहभाग होता. या आंदोलनामुळे दीडशे वर्षांची गुलामी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. या आंदोलनामुळे आपल्याला स्वातंत्र मिळेल, असा आत्मविश्वास प्रत्येक भारतीयांच्या मनात होता. मात्र, या आंदोलनात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: Quit India Movement August Kranti Din information in Marathi.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x