1 January 2025 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Poco X7 5G | 32MP फ्रंट कॅमेरा, Poco X7 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होतोय, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनला तोड नाही Home Loan Alert | 90% लोक गृहकर्ज घेताना 'या' गंभीर चुका करतात, कर्जासाठी अर्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
x

हिरकणी बुरुज | निर्भीड वाघीण हिरकणीच्या त्या धाडसाचं महाराजांनीही कौतुक केले

Raigad fort Hirkani Buruj

मुंबई, १५ सप्टेंबर | इतिहासात अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या आहेत ज्यांच्यामुळे संपूर्ण देशाचे नाव मोठे झाले. घरातल्या सगळ्यापासून ते बाहेरपर्यंत स्त्रियांनी अनेक जबाबदाऱ्या पेलल्या आहेत . पराक्रमी, निर्भीड आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या स्त्रिया आपण बघितल्या असतील. प्रसंगी आई होऊन ममतेने मुलांना वाढवताना दिसल्या असतील. अशाच एका स्त्रीची कथा ती म्हणजेच हिरकणी!

हिरकणी बुरुज आपणा सर्वांना माहीतच आहे पण त्यामागे नक्की कोण होतं हे जाणून घेऊया. हिरा नावाची गवळण, रायगडाच्या पायथ्याशी राहायची. तिला एक मूल होते. ती दररोज दूध विकण्यासाठी रायगडावर यायची. एके दिवशी तिने बाळाला घरात झोपवून गडावर दूध विकायला आली असताना तिला वेळेचे भान राहिले नाही. सूर्य मावळला आणि गडावर तोफा डागल्या गेल्या आणि आदेश मिळताच गडाचे सारे दरवाजे बंद होऊ लागले. तोफेच्या आवाजाने हिरा भानावर आली आणि तिला जाण्यासाठी सारे दरवाजे बंद झाले म्हणून ती पहारेकऱ्यांना विनवण्या करू लागली. पण त्यांनी तिचे काही ऐकले नाही.

मग तिने रायगड उतरून जायचा विचार केला. रायगडचा कडा हा निमुळता होता. आधार, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ती कडा उतरू लागली. सगळी संकटे सोसून ती अखेर कडा उतरून तिच्या बाळाकडे पोहचली. एक रात्रीत ही गोष्ट सर्व गावात पोहचली आणि अखेर महाराजांच्या कानावर पोहचली. कडा अत्यंत निमुळता, खोल आणि अवघड असा असून ती उतरली कशी असावी याचा महाराजांना प्रश्न पडला.

एक आई आपल्या बाळाच्या प्रेमापोटी केवढे मोठे धाडस करू शकते याचे उदाहरण हिरा ने दाखवून दिले. शिवाजी महाराजांनी साडी चोळी आणि इनाम देऊन तिचे कौतुक केले आणि तिच्या धाडसाची गोष्ट नेहमी लक्षात राहावी म्हणून बुरुजाला “हिरकणी बुरुज” असे नाव दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: Raigad fort Hirkani Buruj history in Marathi news updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x