1 January 2025 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | कमी मुदतीत लाखोंचा परतावा मिळवून देणाऱ्या योजना आहेत तरी कोणत्या, 1 वर्षाच्या बचतीतून बनाल लखपती Horoscope Today | 2025 वर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार अत्यंत खास, अनेकांची आर्थिक अडचण दूर होईल Poco X7 5G | 32MP फ्रंट कॅमेरा, Poco X7 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होतोय, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनला तोड नाही Home Loan Alert | 90% लोक गृहकर्ज घेताना 'या' गंभीर चुका करतात, कर्जासाठी अर्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC
x

Sardar Sarja Khan & Maratha | सर्जाखानचा पाडाव | मराठी मुलुख जिंकायला आला | मराठ्यांनाच खंडणी द्यावी लागली

Sardar Sarja Khan

शंभुराजेंच्या स्वर्गवासानंतर औरंगजेब अक्षरशः चवताळला होता, आता मराठी मुलुख जिंकून घ्याचाच या त्वेषाने मुघलांचे महाराष्ट्रात आक्रमण चालू झाले. यावेळी छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या प्रवासात होते त्यामुळे मुघलांसाठी मराठी मुलुख म्हणजे मोकळे मैदानात वाटले. मराठे नक्कीच खचले होते पण हरले नव्हते. यावेळी संताजी-धनाजी, शंकरजी नारायण आणि रामचंद्रपंत यांनी कारभार हाती घेत मराठ्यांच्यात उत्साह पैदा केला आणि हळू हळू मराठे मुघलांच्या हाती गेलेला प्रदेश पुन्हा एकदा स्वराज्यात घेऊ लागले. मराठा इतिहासातील या मोहिमेत सर्जाखानचा पाडाव (Sardar Sarja Khan and Maratha Empire) हा विशेष महत्वाचा. (हे ही वाचा – Ramji Pangera History | रामजी पांगेरा लढले अन महाराजांच्या मावळ्यापुढे शत्रूने हात टेकले)

Sardar Sarja Khan and Maratha Empire information in Marathi :

सर्जखान मुळात आदिलशाहीतील मातब्बर सरदार, मुघलांनी आदिलशाहीला धूळ चारल्यानंतर हा त्यांच्या चाकरीत आला. औरंगजेब त्याच्यावर लय खुष. सर्जखानाने औरंजेबासाठी अनेक लढाया जिंकल्या होत्या, त्याच्या या कामगिरीवर खुष होऊन औरंगजेबाने त्याला “रुस्तमखान” हा ‘किताब देऊन मराठी मुलुख जिंकण्याच्या मोहिमेवर धाडले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा वाईच्या भागात वावरत होता, त्या वेळीच त्याच्याशी लढताना सेनापती हंबीरराव मोहिते तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पडले.

असा हा मुघलांचा मातब्बर सरदार अख्खा मराठी मुलुख जिंकणार अश्या भावात महाराष्ट्रातच येऊन मोठ्या दिमाखात वावरत होता.

Sardar-Sarja-Khan-Maratha-Empire

यावेळी मराठा सैन्य अनेक ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत होते. यामुळे पद्धतीत बदल करत सैन्याचे तीन विभाग केले गेले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आले. हे सैन्य संबंधित स्थळापासून काहीच अंतरावर होते. तिकडे संताजी घोरपडे आपल्या तुकडीसह रुस्तमखानावर चालून गेला. रुस्तमखानाने गजदल आघाडीवर ठेवले होते. ( गजदल म्हणजे हत्तीची तुकडी ) याचाच फायदा घेत मराठ्यांनी बंदुकीने मारा केला, गोळ्यांच्या वर्षामुळे रुस्तमखानाचे हत्ती मागच्या दिशेने पळू लागले आणि अनेक मुघल सैन्य त्यांच्या पायी चिरडले गेले. ते पाहून रुस्तमखानाने आपल्या सैन्यासाहित धावून आला आणि मराठ्यांनी आपले गजदल पुढे केले त्यामुळे मुघलांवर पुन्हा एकदा नामुष्की ओढवली. मुघलांचे घोडे घाबरून उधळू लागले, खानाच्या सैन्याने घोड्यावर यावर घालून लढण्याचा प्रयत्न केला पण घोडं काही मैदानात थांबेना. या सगळ्यात मराठे गठ्याने अचानक येत आणि मुघल सैनिकाला शांत करून पुढे जात.

काही वेळ असाच गेल्यानंतर दोन्हीकडील सैन्य स्थिरावले. रुस्तमखानाने खेळी बदलत आपल्या पांगलेल्या सैन्याला एकत्र आणले आणि संताजी असलेल्या मराठ्यांच्या मुख्य ताफ्यावर जोरदार हल्ला केला. जोरदार झटपट होऊ लागली आणि मुघलांचे पारडे जड होऊ लागले. यावेळी लढाई ऐन रंगात अली होती आणि अचानक मराठे युद्धभूमी सोडून पळू लागले. मुघलांना काही कळेना, आपला जोर पाहून मूठभर मरहट्टे घाबरले आणि आता जीव वाचवण्यासाठी पळून जात आहेत असा सरळ अर्थ लावला. यामुळे मुघलांच्यात फुकटच स्फुरण चढलं. त्यांनी मराठ्यांचा पाठलाग चालू केला. रुस्तमखान मात्र उरलेल्या सैन्यासोबत तिथेच बसला.

मराठे घाबरून पळाले आणि आता आपले लवकरच विजयाची बातमी घेऊन येणार या विचारात राहिलेले मुघल सैन्य अगदी निर्धास्त होते. इतक्यात अचानक मराठ्यांच्या दुसरा तुकडीने जोरदार प्रहार केला. आणि मुघलांच्यात एकाच खळबळ उडाली. नव्या दमाचे मराठा सैन्य अक्षरशः मुघलांवर तुटून पडलं, आणि त्यांच्या छावण्या लुटायला सुरवात केली. पहिल्या क्षणापासून गनिमी काव्याच्या जोरावर आघाडी घेतलेल्या मराठ्यांनी रुस्तमखानच्या सैन्याची अक्षरशः दाणादाण उडवली होती. यावेळी ठरल्याप्रमाणे सातारच्या किल्ल्यातून हंबीरराव मोहिते (दुसरे) यांची तुकडी बाहेर पडली अन मुघलांवर शेवटचा प्रहार केला. मराठी मुलखात मोठ्या दिमाखात वावरणारा सर्जखान उर्फ रुस्तमखान मराठ्यांच्या ताब्यात आला.

स्वतःचा जीव वाचवण्याच्या आकांताने सर्जखानाने मराठ्यांना एक लाख होन खंडणी देण्याचं काबुल केलं आणि ते देईपर्यंत आपली आई आणि मुलाला ओलीस ठेवून आपली सुटका करून घेतली. पुढे हा मातब्बर सरदार कसाबसा सांगोल्यात पोचला आणि त्याने औरंगजेबला निरोप धाडला पण खानाने अश्याप्रकारे नामुष्की पदरात घेऊन खंडणी देण्याचे कबूल केलेलं कळताच बादशाह चवताळला आणि सर्जखानाला फर्मान धाडले.

स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळलेला सर्जखान पुन्हा मराठ्यांच्या नादी लागल्याचे ऐकवीत नाही….

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

Story Title: Sardar Sarja Khan Cha Padav in Marathi.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x