15 November 2024 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

स्पंदने.. त्या फुलपाखराची..!

Marathi Stories, Marathi Kavita, Marathi Laghu Katha, Marathi Bhay Katha

गॅलरीत बसल्या बसल्या कळलं नाही की काय होतंय आणि काय चाललंय? पण जे काही होत त्या रात्री भयंकर होतं. एक-एक थंड घाव होत असल्याचा भास. शरीराची शुद्ध तर नाहीच. थंड श्वासांचेही मग भान राहिले नाही. सुरु होत काहीतरी आतल्याआत. पण बाहेरच्या बाहेर सगळं गार पडत चाललं होतं.

अंगात वाहणार रक्तसुद्धा गोठतांना आपला प्रवाह थोपवत होता. पण झालं एकदाच काय व्हायचं ते. सगळं थांबलही आणि सुन्नही पडलं. जाणिवा पण बोथट होत गेल्या. नजेरेसमोरचा अंधार अलंकार होऊन लुप्त झाला. काही कळलं नाही मग पुढे काय झालं. डोळे उघडले तेव्हा बरंच काही तसंच होतं.

जरा उजाडलं होतं. दुरुन कोणीतरी धावत येत होतं. त्राण नसलेलं शरीर एखादा बाण होऊन गप्प गार पडलेलं होते. नजर धूसर झाली होती आणि वाचा खुंटली होती. वेदना नव्हती ना संवेदना जाणवत होती. बस! स्पंदने त्या वेंधळ्या फुलपाखराची चुकत गेली आणि मग बंदच पडली..!

 

लेखक: पियुष खांडेकर

Marathi Kavita English Title: Spandane Tya Fulpakharanchi written by Piyush Khandekar.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x