15 November 2024 6:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Prati Shivaji Netaji Palkar | मी दुसरा शिवाजी...नेताजी पालकर बोलतोय

Prati Shivaji Netaji Palkar

लाहोरमधून काबूल कंदाहारच्या मोहिमेवर मला मोगल नेत होते. मी येथून पळून जाण्याचा अपयशी प्रयत्न केला खरा, पण तो काय जमला नाही. शेवटी मनाची तयारी केली आणि स्वत:चीच समजूत घातली होती कि ‘महंमद आता तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिलात, तुम्हाला आता इथेच (Prati Shivaji Netaji Palkar) राहावे लागणार, स्वत:ची तयारी करून घ्या.’

Prati Shivaji Netaji Palkar. Netaji Palkar was made Sarnaubat in the year 1657 after the death of Mankoji Dahatonde. During the period of the rise of Shivaji from 1645 to 1665, Netaji was given charge of many expeditions which he successfully completed. His greatest success was the campaign against the Adilshah of Bijapur Sultanate that followed the killing of Afzal Khan. His standing among the local population was such that he was known as Prati Shivaji (image of Shivaji) :

तेवढ्यात एक सैनिक आरोळी देत म्हणाला,
‘ए महंमद, चल तुम्हे सरदार ने बुलाया है, बहोत गुस्सा है तुमपे.’
‘ त्याचं काय जातंय, म्हणे गुस्सा झालाय, जा आलोच म्हणावं.’
क्या?..
‘अरे जा, और बोल हम उनकी सेवा में आ रहे है.’
मी मोगलांच्या उभारलेल्या शामियान्यात गेलो आणि सरदाराला मुजरा करुन बोललो,
‘जी हुजूर.’
‘हम क्या सून रहे है, तूमने यहाँ से भागने की कोशिश की.’
‘नहीं हुजूर, हम तो रास्ता भूल गये थे.’
‘जी, एसा हि हो, वरना मारे जाओगे, चल तुम्हे कंदाहार जाना है.’

आता, इथुन पुढे ज्या मोगलाविरोधात मी आणि शिवराय लढलो, त्यांच्या सोबत मला मोहिमा काढाव्या लागतात, केवढं दुर्दैव.

एकेक क्षण आज मला आठवतो आहे.
जेव्हा मी आणि राजं, मोहिमा काढायचो. जिथे राजांची नजर पडली ती स्वराज्यात आलीच म्हणून समजा.
जिथं जिथं आम्ही मोहिमा काढल्या, तिथं तिथं आम्हाला यश मिळतच गेलं. मी नेहमी राजांसोबतच असायचो.
का नाही..!
शेवटी ते स्वत:ला माझ्यात बघायचे, स्वतः ची प्रतिकृती समजायचे म्हणजेच, दुसरा शिवाजी.
माझ्या रणनिती, युद्ध कौशल्य पाहून लोकंच नाही तर मोगलदेखील मला प्रति शिवाजी महाराज म्हणायला लागले, शिवाजीची सावली, स्वराज्याचा दुसरा सरनौबत, नेतोजी पालकर नाव होतं आमचं.
विचारांत पडला ना, नेमकी नेतोजी पालकर की महंमद कुलीखान.
मी होतो शिवरायांचा दिर्घ काळ असलेला सेनापती, स्वराज्याचा नेतोजी पालकर आणि आता मोगलांचा दास म्हणजे महंमद कुलीखान.
या नेतोजी पालकरचा कुलीखान कसा झाला, हे रहस्यच आहे.

ती दिवस होता, ६ मार्च १६६०,
जेव्हा महाराज पन्हाळगडावर अडकले होते, गडाच्या पायथ्याशी सिद्दी जौहरने संपूर्ण वेढा दिलेला होता, महाराज त्यातून निघूच शकत नव्हते. अशा वेळी त्यांना अपेक्षा होती ती फक्त त्यांच्या सावलीची.
पण त्यावेळेस मी दक्षिणेच्या मोहिमेवर होतो.
जेव्हा, मला हि खबर मिळाली, की महाराज पन्हाळगडावर अडकले आहेत. सिद्दी जौहरने राजांना वेढा घातलाय, जौहरकडे तब्बल चाळीस हजाराचे सैन्य होते, एकट्या सिंहाची शिकार करायला चाळीस हजार लांडगे.
मी विचार केला, की आपण सिद्दीला मैदानावर हरवू शकत नाही, कुठे चाळीस हजार आणि कुठे माझे दोन हजार.
जरी शिवरायांच्या एका मावळ्यात शंभर मोगली सैनिकांना धूळ चारण्याची शक्ती होती हे खरं, पण दक्षिण मोहिमेत सैन्य थकलं होतं.
मला काही करुन आदिलशहाचे लक्ष विचलित करायचे होते, जेणेकरून तो सिद्दीला परत बोलावेल.
म्हणून, मी विजापूर जवळ असलेल्या शहापूरलाच लुटलं आणि आदिलशहाला आवाहन दिलं. आदिलशाहाच्या मनात भीती भरवण्याचा प्रयत्न केला की, आम्ही विजापूर काबीज करायला आलो आहोत.
यावेळी आदिलशाही बडी बेगम आणि अली आदिलशाह सांभाळत होते. आमच्या हल्ल्याने तो विचलित झाला खरा, पण आदिलशहाला वेळीच कळले की, आमच्याकडे पुरेसे सैन्य नाही, कदाचित त्याला आमचा मनसुबा कळला असावा.
म्हणून त्याने सिद्दीला न बोलावता, खवासखानाला पाच हजार सैन्यासह आमच्यावर चाल करायला पाठवले. सैन्य थकलं होते म्हणून यात आमचा पराभव निश्चित होता. अखेर आमचा पराभव होऊन आम्ही माघारी फिरलो.
तीन महिने उलटली होती राजांना अडकून, तेवढ्यात खबर मिळाली की, शाहिस्तेखान हा दीड लाख सैन्यासह पुण्यात आला होता.
आम्ही थेट राजगडावर, आऊंना भेटायला गेलो.
आऊ खूप चिंताग्रस्त होत्या, आमचं येण्याचं कळताच त्या सुखावल्या, आणि मोहिमेबद्दल विचारणा केली.
‘आऊसाहेब, अख्ख विजापूर लुटून आलोय, पण शहापूरला हार पत्करावी लागली.’
‘जय पराजय तर होत राहतो, पण सह्याद्रीचा सिंह, तो तर अजूनही लांडग्यांच्या विळख्यात अडकला आहे.’
‘होय, आऊ, पण सिद्दीचा वेढा खुप तगडा हाय, आम्ही प्रयत्न केला आऊसाहेब’.
‘आऊ, सततच्या मोहिमांमध्ये सैन्य खूप थकले होतं, म्हणून वेढा तोडून राजांना आणणं कठीण होत.’
‘आणि, शाहिस्तेखान पुण्यात धुमाकूळ घालत आहे, असं ऐकतोय की, आपल्या विरोधात औरंगजेब, आदिलशाही आणि कुतुबशाही एकत्र आलेत.’
आऊ बोलल्या, ‘ माझा शिवबा आल्यावर, बघेल तो.’

आऊंची रजा घेऊन मी सैन्याला आराम करायला वेळ दिला, आणि इतर सर्व सैन्यासोबत मी पुण्यातच शाहिस्तेखान याच्या बंदोबस्तासाठी गेलो.
तिकडे काही दिवसांत राजे पन्हाळगडावरुन सुखरूप राजगडावर पोहोचले. मी राजांना भेटायला राजगडावर गेलो, राजांनी मला बघून एकदम आलिंगन देऊन रडू लागले.

आमचं राजं दुश्मनांसाठी काळ आणि मावळ्यांसाठी करुणानिधी होते. महाराजांसाठी शिवा काशिद हा शहीद झाला, बाजीप्रभू देशपांडे हे खिंड लढवताना शहीद झाले होते. शिवा काशिद हा प्रतिशिवाजी बनून सैन्याला विचलित केलं आणि म्हणूनच राजांना निसटून येण्यास मदत झाली होती, म्हणून राजांना अतिशय दुःख झालं होतं आणि अभिमान वाटत होता. परंतु राजं सावरल्या नंतर शाहिस्तेखानाला धडा शिकविण्याचा चंग बांधला.

मी राजांना सर्व माहिती पुरवली. शाहिस्तेखानाबद्दल मी आणि गुप्तहेर बहिर्जी नाईकांनी मिळवलेली माहिती राजांना सांगु लागलो,
‘राजं, इकडे तुम्ही पन्हाळगडावर आणि आम्ही दक्षिण मोहिमेवर असताना, या शाहिस्तेखानानं अख्ख पुणं लुटलं आणि काबीज केले आहे.’ ‘ राजं, रमजानच्या या महिन्यात त्यानं मुलीचं लग्न पार पाडलं, आताच बेत आखला पाहिजे.’
राजे तयार झाले आणि या मोहिमेसाठी तानाजी मालुसरे, येसाजी कंक, संताजी, फिरंगोजी मी आणि राजं मोहिमेत सहभागी होतो.
सर्व तयारी करून आम्ही लाल महालात शिरून कापाकापी सुरू केली, यात राजांनी खानाची तीन बोटे कापली.

खान तर पळाला, पण पुण्यात झालेली लूट भरून काढण्यासाठी मी आणि राजांनी सुरत लुटली.
सुरत लुटल्यामुळे औरंगजेबाने आपला सरदार मिर्जा राजा जयसिंग याला स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी पाठवण्यात आला होता.
यावेळी मात्र मिर्जा पूर्ण तयारीनिशी आला होता, यात आमचे खूप मावळे शहीद झाले, अखेर राजांनी माघार घेण्याचं ठरवलं आणि पुरंदरचा तह केला गेला.

पुरंदरचा तहाचा तपशील असा होता

१. या तहानुसार राजांनी आपले तेवीस किल्ले व चार लाख होनांचे क्षेत्र बादशहाला दिले.
२. राजांच्या ताब्यात बारा किल्ले आणि लाख होनांचे क्षेत्र राहिले.
मिर्झाराजांनी चाळीस लाखांची खण्डणी राजांवर लादली.वार्षिक तीन लाखांचे हप्ते ठरले.
३. सम्भाजीराजांना बादशहाकडून पाच हजाराची मनसब मिळाली.
४. कलमांची पुर्तता होईपर्यंत सम्भाजीराजे मिर्झाराजाकडे ओलीस म्हणून राहीले.
५. राजांनी औरंगजेब यांच्या भेटीसाठी आग्र्याला जावं.

हि बातमी ऐकून आम्हाला दुःख तर झालंच, पण राजे चिंतेत होते.
औरंगजेब नक्की घातपात करेल आणि आम्हाला आग्र्याला बोलावून इकडे आदिलशाही, कुतुबशाही, जंजिऱ्याचा सिद्दी आणि लाल टोपीवाले म्हणजे इंग्रज नक्कीच एकत्र येऊन स्वराज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील.
त्यावेळेस मी आणि राजं यावर खूप बोललो आणि चर्चा केली.
यावर महाराज म्हणतात,’ आम्हाला आग्र्याला बोलवण्यात आलं आहे, नक्कीच दगाबाजी होऊ शकते.’
‘ महाराज, आम्ही तोच विचार करतोय, तुम्ही आग्र्याला पोहोचल्यावर इथे नक्कीच हल्ला करण्याचा बेत आखला जाऊ शकतो.’
हं…
या चर्चेनंतर, कुठेतरी माझं आणि शिवाजी महाराज यांत वैरमनस्य झाले अशी बातमी गडाबाहेर पसरली.
बरेचसे गनिमी सरदार आम्हाला विचारु लागले, आम्हाला त्याच्यात सामील करून घेण्यासाठी ते प्रयत्न करू लागले होते.
माझ्यासोबत असलेले काही मावळेही मला विचारत होते, परंतु मी काहीच उत्तर देत नव्हतो.
एके दिवशी राजांनी प्रतापगड मोहिमेवर असताना, आम्हाला काही निवडक सैन्यांसोबत यायचे होते, परंतु आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा वेळ हाताबाहेर गेली होती, राजे युद्ध हरले होते.
राजांनी आम्हाला पत्र पाठवून कडक जाब विचारला, ‘समयासि कैसे पावला नाही.’
राजांनी गडावर येण्यासाठी आम्हाला आदेश दिला.
गडावर जाताच भर सभेत आम्हाला विचारलं,
‘तुम्ही वेळेत का नाही आलात.’
‘आम्हाला थोडाच उशीर झाला, पण तोवर आपण युद्ध हरलो होतो.’
‘हे असं उत्तर एका सेनापतीला शोभत नाही.’
‘माफ करा, पण आम्ही तुमचे सेनापती राहिलोच नाही, सेनापती हा राजाला असतो, एका सरदाराला नाही.’
‘तुम्ही आता औरंगजेबाचे सरदार आहात, राजे तुम्ही पहिले होते, आता नाही.’
‘तहात तुम्ही सर्व काही गमावलं आहे, शंभुराजांना औरंगजेबाकडुन वेतन मिळते आहे, म्हणे जमीनदारी दिली गेली आहे.’
‘नेतोजी, आपले शब्द मागे घेण्यात यावे.’
‘नाहि, आम्ही बोललो, ते चुकीचे नाही, तुम्ही दुसरा सेनापती शोधा.’
यानंतर राजांनी मला बडतर्फ केले.
हि गोष्ट आता वणव्यासारखी पसरली.
मला अलीआदिलशाहीने जवळ केले, आता प्रति शिवाजीच आपल्याकडे आला आहे म्हणजे संपूर्ण मराठा साम्राज्य आपण जिंकू असे स्वप्न तो पाहू लागला होता.
तिकडे राजे आग्र्याला पोहोचले अन् इकडे मी आदिलशाहीला मिळालो.
अलीआदिलशहाने मला राजगड जिंकण्याचा हुकूम दिला म्हणजे माझा आणि महाराजांचा संशय खरा ठरला.
मी आदिल याला माझा मनसुबा पटवून सांगितला कि आपण पहिले इतर किल्ले जिंकू आणि मग हल्ला करू, त्याला ते पटलं सुद्धा.
मी इकडे कमजोर किल्ले जिंकून आदिल याला क्षणिक सुख देण्याचा प्रयत्न करत होतो.
पण तोच ‘शिवाजी भाग निकला ‘, ‘शिवाजी भाग निकला’
असे म्हणत आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इंग्रज दणाणले.
आदिल माझ्यावर चांगलाच चिडला होता, या कालावधीत मी एकही मोठा विजय त्याला मिळवून दिला नव्हता म्हणून.
इकडे औरंगजेब चिडलेला, शिवाजीला पळवून लावण्यासाठी मिर्जा जयसिंग यांनी मदत केली असं समजून त्याने त्याला विष पाजून त्याची हत्या केली.
आता त्याची नजर आमच्यावर होती.
शिवाजी सुटला आता दुसरा शिवाजी सुटु नये, म्हणून आम्हाला कैद करून घेतले.
त्याने आमच्यावर दबाव आणण्यासाठी आमचे बंधु यांना अटक करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
अखेर चार दिवस माझे अतोनात हाल करून, माझ्या पिळदार मिशा काढून टाकण्यात आल्या.
दि.२७ मार्च १६६७ रोजी, एका मुल्लाला बोलावून माझं जबरदस्तीने धर्मांतर करून मुस्लीम बनवलं गेलं. आता मी नेतोजी पालकर नाही तर महंमद कुलीखान बनलो होतो.

मला अक्षरशः देहत्याग करावासा वाटत होता, पण मी राजांचा शुर सैनिक आहे, मी स्वतःला हरवुन कसं चालेल.
मी माझा चेहरा पाहून हसत होतो, आणि स्वतःशीच बोलायचो, ‘ काय नेतोजी, काय हा अवतार, कुठे आहे तुमच्या पिळदार मिशा.’
‘ आणि काय हा बोकड अवतार, जी मोगली तोंड पाहून तुम्ही अन् तुमच्या साथीदारांना हसू यायचं, त्यांना “बोकड तोंडे” म्हणून हसायचे.
‘नेताजी तुमचा महंमद झाला, काय ही मुस्लिम नावं, ऐकूनच कसं तरी व्हायचं.’

औरंगजेबाने आम्हाला मुद्दाम काबूल कंदाहरला पाठवण्याची तयारी केली, त्याला कळलं होतं की, हा प्रतिशिवाजी, शिवाजी विरुद्ध लढणार नाही.
आणि अशा प्रकारे मी काबूल कंदाहारला आलो होतो.
तब्बल नऊ वर्षे मी काढली, अचानक औरंग्याला या प्रतिशिवाजीची आठवण झाली आणि नऊ वर्षांनंतर आम्हाला दिल्लीत बोलावून आम्हाला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढण्याची मोहीम हाती दिली.
तेव्हा मला कळलं कि आता शिवाजी हा फक्त शिवाजी नाही राहिलाय तर तो दख्खनचा राजा बनलाय.
राजाचा राज्यभिषेक झाला आहे आणि ते हिंदू साम्राज्याचे छत्रपती झाले आहे.
आनंद गगनात मावेनासा झाला, आणि तेथेच ठरवलं की आपलं काम झालं आता इथून सुटलेलंच बरं.
मी १७७६ रोजी मोगली छावणीतून पळून आलो आणि रायगडावर निघालो.
मी मोगली वेशात होतो आणि माझा हा बोकड तोंड अवतार बघुन रायगडावरील सैनिकांनी दुश्मन समजून मला पकडलं.
वर नेत असताना, शिवरायांची हुबेहूब प्रतिकृती असलेला राजबिंडा युवकाने आमच्याकडे पाहून सैनिकांना विचारलं, आणि त्यांनी आम्हाला विचारले, ‘ कोण आहेस तू?’
मी सांगितले, ‘ आम्ही स्वराज्याचे माजी सरसेनापती नेतोजी पालकर.’
तोच सैनिकांनी आमचे हात सोडून दिले,
‘नेताजी काका तुम्ही!’
असं म्हणून तो युवक आमच्या गळ्यात पडला.
‘नेताजी काका, आम्हाला गडावर नेताजी काका तर फक्त बाळराजेच म्हणायचे.’
‘म्हणजेच, हे आमचे बाळराजे, आमचे लाडके युवराज, शंभुराजे आहे.’
खुप दिवसांनी कोणीतरी आपलं म्हणून गळ्यात पडलं होतं.
युवराजांनी आम्हाला थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नेलं.
अहाहा……..
काय ते सिंहासन, काय ते राजांचा रूतबा, वर्णन करायला शब्द अपुरे पडत होती….
आमच्या भेटीचा दिवस म्हणजे इतिहासातील दुर्मिळ क्षण,
हा दिवस म्हणजे चौदा वर्षांनंतर प्रभु श्रीराम आणि भरत भेटीचा,
हा दिवस म्हणजे प्रभु श्रीराम आणि हनुमान भेटीचा.
शिवराय आणि मी गळाभेट घेतली आणि दरबार स्तब्ध झाला होता.
राजांना माझं झालेलं धर्मपरिवर्तन, अत्याचार सर्व काही समजलं होतं.
हिंदू धर्मांतराचा कायदा तर राजांनी आधीच अस्तित्वात आणला होता, बजाजी निंबाळकर यांच्यासाठी.
आज त्याच कायद्यांतर्गत माझ्या धर्मपरिवर्तनाचा निर्णय घेण्यात आला.

माझं शुद्धीकरण करून, १९ जून १६७६ रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी मला पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
आता मी महंमदचा पुन्हा नेतोजी बनलो अन् पुन्हा पिळदार मिशा.
आता सर्वांना पडलेला प्रश्न, मी गद्दारी केली होती की आमचा गनिमी कावा.
जर गद्दारी केली असती, तर राजांनी याचा बदला आधीच घेतला असता, किंवा आज त्यांनी या महंमद कुलीखान याला स्विकारले नसते.
त्या रात्री तहानंतर आमच्यात काय शिजलं होतं, तो तर इतिहास होता,
पण माझ्या फितुरीमुळे नक्कीच स्वराज्यावरील संकटं टळली.
नाहि तर आग्र्याला राजांना अटक झाली, तेव्हाच स्वराज्य संपलं असतं.

|| जय शिवराय ||

 

Story Title: Prati Shivaji Netaji Palkar Maratha Mavala of Chhatrapati Shivaji Maharaj.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x