शिवरायांच्या जिगरबाज मावळ्यांपैकी एक....सरदार कान्होजीराजे नाईक जेधे
एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपञ ठेवलेली जी माणसे महारांजाच्या भोवती होती त्यात प्रामुख्याने आणि अगदिच सुरूवातीपासून जे नाव होते त्यांपैकी एक “रदार कान्होजीराजे जेधे” यांचा करावा लागतो.
कान्होजी यांचा जन्म कारीगावी झाला. त्यांच्या जन्म्यापुर्वी त्यांच्या वडिलांची हत्या नंतर मात्रोश्रीची, अगदी काही दिवसाच्या लहान मुलांला पोरका होण्याचा महाशाप मिळाला. यावेळी कान्होजी जेध्याचा जीवावर भेटलेल्या प्रसंगात; जेध्याचे इमानी स्वामीनिष्ठ चाकरीत असलेले देवजी महाल्याच्या साह्याने तान्ह्या कान्होजीचे प्राण बचावले. रानावनांत फिरत तेंही कान्होजीचा सांभाळ केला. पुढे पासलकर देशमुखांनी त्यांची दिखभाल करून योग्य मुत्सद्दी, राजकारणी योद्धा, युद्धतंत्राचेही परिपूर्ण शिक्षण दिले.
कान्होजी जेधे कारी गावी येऊन आपल्या मातापितरे बलिदानाचा सुढ मिळवून कारी-अंबवडे गावासह रोहिड खोऱ्याची देशमुखी चालवली…संपूर्ण बारा मावळामध्ये कान्होजींनी आपल्या पराक्रमाने व सचोटीच्या वर्तनाने आपला दरारा बसविला होता. कितीही अवघड किल्ला असला तरी कान्होजीचे किल्ले सर करण्याचे खास तंत्र होते. ते म्हणजे शिडया व माळा लाऊन सैनिक गडावर चढविणे व गड सर करणे. तसेच मलिक अंबर या निजामशहाच्या वजीराशी त्यांचा संबंध आला होतो. त्यांच्या समवेत कान्होजीने अनेक लढायात आपली मर्दुमकी दाखून निजामशाही पासून कान्होजी नांवारुपास आले होते… सन इ.इ. १६१९ रोजी काही ऐतिहासिक निजामशहाच्या कागदपत्रा मध्ये ‘कान्होजी राजे जेधे’ असा उल्लेख दिसून येतो.
आदिलशाहचा सेनापती रणदुल्लाखाननी शहाजीराजांना कान्होजीचा परिचय करून दिला होतो. ही घटना साधारण इ.स. १६३५ च्या दरम्यानची आहे. नंतर इ.स. १६३६ च्या सुमारास अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली त्यानंतर शहाजीराजे पूर्णपणे आदिलशाहीकडे चाकरीस राहिले, तेव्हा रणदुल्लाखानाकडून शहाजीराजांनी कान्होजीस आपणांकडे मागून घेतले. सन १६४८ साली शहाजीराजांसोबत कान्होजीना देखील नजर कैदेत जिंजीत राहिले…
कान्होजी जेधे हे शहाजीराजांचे समकालीन असल्यामुळे विश्वासू मित्र बनले होते. “कान्होजी ! तुम्ही आता माझ्या शिवबाची चाकरी करावी. स्वराज्याला तुमची गरज आहे. आपण शूर लढवय्ये आहात. अनुभवी आहत. बाजी पासालकारांच्या निधनाने बारा मावळ खोऱ्यात आता तुम्हीच वडीलधारे आपल्या मायेचे छत्र शिवबावर धरा.” असे म्हणत, शहाजीराजांनी कान्होजी जेधे यांना शेवटचा निरोप घेताना अश्रुपूर्ण नयनांनी मिठी मारली. शहाजीराजांचे बोल ऐकून कान्होजी जेधे शिवाजीराजांचेकडे येवून त्यांना म्हणाले, “महाराजांनी (शहाजी) शपथ घेऊन साहेबाचे सेवेशी पाठविले तो इमान आपला खरा आहे. खास व पाचजण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ” असे म्हणून स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.
शिवाजी महारांजानी इ.स. १६५५ ते ५६ च्या दरम्यान जावळीचा मोर्यांना शासन करून जावळीचा सर्व मुलुख स्वराज्यात दाखल केला. कान्होजी जेधे व त्याचे समर्थक बांदल, शिळीमकर, वगैरे देशमुखानी या कामी छत्रपतींना सहाय्य केले. शिवाजीराजांनी रायगड या किल्याचा कब्जा कान्होजी जेधे यांच्यामार्फत घेतला. जरी कान्होजी जेधे असे स्वराज्याच्या कामी छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करीत होते. तरीही ते आदिलशाहीच्या सेवेत होते. वतनवाडीचे देखील आदिलशहाने त्यांना अधिकार बहाल केलेले होते. वतनवाडीची कोणतीही लालसा ना ठेवता कान्होजी स्वराज्याच्या कार्यात मोठे सहाय्य इमानी करत होते. आदिलशाहीचा बराच मुलुख व काही किल्ले शिवाजीराजांनी स्वराज्यात दाखल केलेले होते. त्यामुळे आदिलशहा शिवाजीराजांवर चिडून होतो, शेवट आदिलशाहीतून अफजलखानाने शिवाजी महाराजांना धरून अथवा मारून आणण्याची घोर प्रतिज्ञा करून विडा उचलून मावळाकडे निघाला होतो.
१६ जून १६६५९ कान्हीजी जेधे यांना आदिलशहाने पाठविलेले फर्मान असे, “शिवाजी अविचारीने व अज्ञानाने निजामशाहीत. कोंकणातील मुसलमानांना त्रास देऊन लुट करून पातशाही मुलखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव त्याचे पराभवार्थ… शिवरायांना पराभव करून निर्मूळ फडशा करावा. शिवरायांचे निसवतीचे लोकास आश्रय न देता ठार मारून या दौलतीचे कल्याण इच्छिणे. खानच्या सांगण्यावरून…. तुमची योग्यता वाढविली जाईल. त्याचे सांगण्याप्रमाणे वागावे, तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही.”
आदिलशहाचे हे फर्मान कान्होजीस मिळताच त्यांच्या जीवनातील सत्व परीक्षेचा प्रसंग निर्माण झाला… कान्होजी जेधे यांनी या फार्मांचा कोणताही मुलाहिजा दिला नाही. ते थेट आपल्या पुत्र व लष्करी जमाव घेऊन शिवाजीराजांकडे आले, “या पुढे खस्त होऊ ( मरण पत्करू ) तेव्हा आमचे वतन कोण खावे, आम्ही इमानानी अंतर करणार नाही असे म्हणून बेल भंडार उचलून शपथ घेतली. आपल्या वतनावर पाणी सोडले” हे दर्शविण्यासाठी पाण्याचा तांब्या उजव्या हातात घेवून डाव्या हाताने राजांच्या पायांवर पाणी सोडले व आपल्या निष्ठेची व प्रामाणिकपणाची राजांना जाणीव करून दिली.
छत्रपति शिवाजी महाराज व दरबारातील सर्व मंडळी कान्होजींच्या या कृत्याने भारावून गेली यावेळी राजांनी कान्होजीस हुकूम केला की, “तुमचे व तुमच्या वंशाचे आम्ही चालवावे व आमच्या वंशाचे तुमच्या वंशाचे चालवावे.” असे म्हणून शपथ दिली. त्यानंतर शिवाजीराजांनी कान्होजीस हुमूम केला की, वरकड मावळचे देशमुख व तुम्ही येके जागा बैसोन त्यांचा मुद्दा मनास आणणे. तसेच तुमचा काबिल कारीस आहे, तो ढमढेऱ्यांचे तालेगावास पाठवा.”
कान्होजी जेधे पुढे महाराजांच्या मसलतीनुसार मावळातील देशमुखांना भेटून घडला सर्व वृतांत त्यांना कथन केला की, “स्वामींच्या पायासी इमान धरून वातनास देखील पाणी सोडीले आम्ही व आपले लोक देखील राजश्री स्वामीपुढे खस्त होतो ऐसा आमचा दृढ विचार आहे. मुसलमान (अफजलखान) बेईमान आहे. कार्य जालियावर नस्ते निमित्य ठेऊन नाश करील. हे ‘महाराष्ट्र राज्य’ आहे. अवधियांनी हिंमत धरून, जमाव घेवून, राजश्री स्वामीसंनिध राहोन, येक निष्ठेने सेवा करावी.” कान्होजी जेधे यांच्या बरोबर सर्व देशमुख मंडळी एकमुखाने संमती दिली. यावरून स्वराज्य कार्यामध्ये कान्होजी जेधे यांचा किती मोठा सहभाग होतो हे कळून येते.
अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी कान्होजी जेधे यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना सर्वोतपरी सहकार्य केल. आपल्या साही मुलांसह अफजलखानाच्या सैन्याचा फडशा पडला. कान्होजी जेधे यांनी नि:स्वार्थी बुद्धीने स्वराज्यासाठी केलेल्या सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचे प्रथम दिले होते. स्वराज्यावर आलेले दुसऱ्या संकटात बांदलाच्या सैन्याच्या तुकडीतील तीनशेच्या दरम्यान सैनिक मारले गेले होते. यामुळे महाराज विशालगडावर सुखरूप पोचले होते. बांदलाच्या या कामावर प्रसन्न होऊन शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचे मानाचे प्रथम देण्याचे ठरविले आहे. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना आपले मनोगत व्यक्त केले. “महाराज, केवळ बांदलाच्या पराक्रमामुळेच आज तुमचे पाय आम्हाला दिसत आहेत. तेव्हा आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो. आपल्या पुढे आमच्या मानाची काय पत्रास ?” कान्होजीनीही आपला मान कृष्णाजी यास देऊन आपल्यात असणारे औदार्य दाखवून दिले. याचा उल्लेख शाहीराने केलेलाच आहे.
|| जैसे हनुमंत अंगत रघुनाथाला | तैसे जेधे बांदल शिवाजीला ||
आजही ‘कारी’ त असलेली त्यांचा वाडा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देते आहे. प्रत्येकाने त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास अंबवडेस जरूर जावे. तेथे क्षणभर उभे राहिल्यावर देवमहालाचे कर्तुत्व, पासलकरांचे पितृत्व, कान्होजींचे नेतृत्व, त्याग वगैरे स्मृतींचा सुगंध दरवळलेला आपल्यास अनुभवास येईल.
II जय शिवराय II
Story English Title: Story Sardar Kanhoji Raje Naik Jedhe warrior of Chhatrapati Shivaji Maharaj history on Maharashtranama.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News