28 November 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट स्पीडमध्ये, 5 दिवसात 25% परतावा दिला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News Honda SP 125 on EMI | बाईक प्रेमींसाठी खुशखबर; केवळ 5000 भरा आणि बाईकचा ताबा मिळवा, एकाच वेळेला धावेल 700 KM Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL BEL Vs HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Business Idea | हा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत; स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवाल - Marathi News
x

The Death of Birbal | अकबराच्या एका चुकीच्या निर्णयामुळे झाला चतुर बिरबलचा मृत्यू | वाचा काय घडलं होतं?

The Death of Birbal

मुंबई, १५ सप्टेंबर | तुम्ही, आपण सर्वजण अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो. यातील बिरबल ही व्यक्ती अतिशय हुशार, चतुर, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली. आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीच्या गळी उतरवायचं असं कौशल्य बिरबलाकडे होतं की समोरची व्यक्ती कुणी सर्वसामान्य असो किंवा खुद्द अकबर बादशाह असो, बिरबलाच्या बुद्धीचातुर्यापूढे सपशेल दंडवत घालायचाच अशा या विद्वान व चतुर बिरबलाचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायचय ?

अकबराच्या एका चुकीच्या निर्णयामुळे झाला चतुर बिरबलचा मृत्यू – The Mughal emperor Akbar was responsible for death of Birbal :

असं म्हणतात की बिरबलाला अकबर फक्त प्रधानच नव्हे तर राजा बनवू इच्छित होता. ही गोष्ट तेंव्हाची आहे जेंव्हा हिमाचल प्रदेशातील कांगडावर राजा जयचंद्र चे राज्य होते. इसवी सन १५७० ला राजा जयचंद्राने दिल्ली व आग्रा शहरात हवेली बांधून घेतली होती. मुघल व कांगडा राज्यात विस्तव सुद्धा अडवा जात नसे व काही ऐकीव गोष्टींनुसार हेच कारण होते अकबराने राजा जयचंद्रला कैद करण्याचे.

राजा जयचंद्रास कैद करण्यामुळे जयचंद्राचा मुलगा बिथरला. त्याने स्वतःला राजा घोषित केले व अकबराविरुद्ध उठाव केला. अकबराने राजा जयचंद्राचा मुलाचा बीमोड करण्यासाठी आपल्या आधिपत्याखाली असलेल्या पंजाब प्रांतातील सुभेदार हुसेन कुली खान यांस कांगडा वर हल्ला करण्याचे आदेश दिले.

अकबराच्या आदेशानुसार सुभेदार कुली खान सैन्य व युद्ध सामग्री घेवून कांगडा कडे निघाला. कांगडा ला हादरा देण्यासाठी कुली खानने एक योजना आखली. प्रथम त्याने दिल्ली प्रांतातील कोटलाच्या किल्ल्यावर हल्ला चढवला कारण कांगडावर हल्ला करताना कुलीखानला या कोटला नजीकच्या किल्यावर तैनात असलेल्या कांगडाच्या सैन्यतुकडीचा व्यत्यय नको होता. या युद्धात मुघलांची सरशी झाली व दोन दिवसांनंतर मुघलांचा सैन्याने कुलीखानच्या नेतृत्वाखाली कांगडावर हल्ला केला व तेथील एका किल्ल्यास वेढा दिला.

कांगडाचे सैन्यबल तोकडे होते व त्यांचा मुघलांसमोर टिकाव मुश्किल होता. मुघलांचा कांगडावर विजय जवळजवळ निश्चित होता तोच एक बातमी अकबराला मिळाली की पंजाब प्रांतात मुघलांविरुद्ध उठाव झाला त्यामुळे नाइलाजाने अकबराने कुलीखानला हे बंड मोडून काढण्याचे आदेश दिले. पण अकबराला एक बाब सलत होती ती म्हणजे, जवळजवळ काबिज केलेले कांगडा त्याला पूर्णपने जिंकता आले नव्हते. काहीही करून त्याला हाती आलेले कांगडा गमवायचे नव्हते. त्याने राजा जयचंद्र व त्याचा मुळाशी बोलणी सुरू केली व या चर्चेदरम्यान अनेक तह व अटी ठरवल्या गेल्या.

ठरल्याप्रमाणे बिरबलास किल्ल्याचा प्रवेश द्वाराजवळ एक मस्जिद बांधून देण्यात आली आणि मुबलक प्रमाणात सोने-नाणे देण्यात आले अर्थात बिरबल आता राजा झाला होता. अनेक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख राजा असा केलेला तुम्हाला पाहायला मिळेल. पण बिरबलास आपण संपूर्ण राज्य देवू शकलो नाही ही खंत अकबराच्या मनात होती म्हणून त्याने बिरबलाला आपल्या विशेष सैन्यातील एक तुकडी उपहारस्वरूप दिली. सर्व काही सुरळीत चालू असतांना एके दिवशी अकबराला एक वार्ता समजली की अफगाणिस्तानातील बाजौर या प्रांतात काही दरोडेखोर व लुटारू सामान्य नागरिकांचा साधन संपत्तीची लूट करत आहेत. लोकांना त्या भागात राहणे मुश्किल बनले असून अनेक नागरिकांनी लुटारू व दरोडेखोरांच्या भीतीने स्थलांतर केले असून बाजौर जवळजवळ उजाड झाले आहे.

ही बातमी समजताच अकबरने आपल्या एका सरदारास ज्याचे नाव जेनखान कुका असे होते त्यास लुटारूंचा बीमोड करावयास पाठवले सोबत सैन्य व युद्धासाठी आवश्यक सामग्री ही दिली. जेन खान मजल दरमजल करत अफगाणीस्तानच्या दिशेने जात होता. प्रचंड जंगल व दुर्गम भाग पार करत करत तो अखेर अफगाणला पोहोचला तिथे पोहोचल्यावर सर्वप्रथम मुघलांचा सामना अफगाणी यूसुफझाई कबिल्याशी झाला.

मित्रांनो, अफगाण हे शूर व लढवय्ये असतात. ते अतिशय चिवट झुंज देतात पण जेन खान व मुघलांना याची कल्पना नव्हती. अफगाणी लोकांची युद्धनीती वेगळी होती. ते समोरासमोर युद्ध न लढता गोरीला युद्धतंत्राचा अवलंब करत होते. आधीच झाडांवर चढण्यात माहिर असणारे अफगाणी अशा युद्धाचा अजिबात अनुभव नसलेल्या मुघलांवर भारी पडत होते. जेनखानने कल्पना ही केली नव्हती की ही मोहीम इतकी अवघड असेल.

मुघल सैनिक अफगाणी योद्ध्यांसमोर हतबल झाले होते. मुघल पराभवाच्या छायेत होते. जेन खानला काहीच कळेना की यातून मार्ग कसा काढावा. अखेर त्याला एक युक्ती सुचली. त्याने अकबर बादशाहास पत्र पाठवले व खोटा संदेश दिला की आपण जवळजवळ युद्ध जिंकत आलो आहोत व आणखीन थोड्याशा सैन्याचा मदतीने आपण ही मोहीम फत्ते करू. अकबराने हे सारे खरे मानले व तो जेनखानाच्या मदतीसाठी आणखीन सैन्य पाठवण्याबाबत विचार करू लागला. त्याला जेंव्हा जेनखानचा संदेश मिळाला तेंव्हा दरबारात अबूल फजल व बिरबल हे दोघेच हजर होते.

अबूल फजलने जेनखानचा मदतीस जाण्याची इच्छा व्यक्त केली पण अकबराने त्यास मनाई केली. पण जेंव्हा बिरबलने जेनखानच्या मदतीस जायची इच्छा व्यक्त केली तेंव्हा तो बिरबलास नकार देवू शकला नाही व बिरबलास काही सैन्य देवून अफगाणिस्तानास रवाना केले. बिरबल हा महान राजनीतिज्ञ जरूर होता पण तो युद्धनीतीमध्ये तितकासा पारंगत नव्हता. तरीही बिरबलची फौज जिद्दीने लढली व त्या दिवशी मुघल अफगाणांवर भारी पडले. संध्याकाळ झाली व नियमानुसार युद्ध विराम जाहीर करण्यात आला.

The Death of Birbal :

रात्र झाली, बिरबल दुसर्‍या दिवशीच्या युद्धाची रणनीती ठरवू लागला. इकडे अकबराने अबूल फतेह या सरदरास बिरबलाच्या मदतीसाठी ससैन्य अफगाणीसतनाला रवाना केले. अकबराने अबूल फतेहास बिरबला च्या सहाय्यासाठी रवाना केले खरे पण अबूल फतेहसुद्धा युद्धनीतीत फारसा पारंगत नव्हता तसेच मुघल व अकबरासाठी चिंतेची आणखीन एक बाब म्हणजे अबूल फतेह,बिरबल व जेनखान यांचे आपआपसात फारसे जमत नव्हते. मुद्दा कुठलाही असो, या तिघांचे कधीच एकमत होत नसे.

अफगाणिस्तानात तिघे जेंव्हा एकत्र भेटले तेंव्हा बिरबलने एक रणनीती ठरवली पण नेहमीप्रमाणे या तिघांचे एकमत होऊ शकले नाही व ते तिघेही वेगवेगळ्या वाटेने निघाले. बिरबल आपल्या वाटेने निघाला व ३-४ कोस प्रवास करून रात्री मुक्कामी आपल्या सैन्यासाह एका ठिकाणी त्याने डेरा टाकला. आणि इथेच घात झाला. पुढे जे होणार होते ते बिरबलच्या ध्यानीमनीही नव्हते.

कारण….. ती रात्र बिरबलच्या आयुष्यातली अखेरची रात्र होती. कारण बिरबलाने ससैन्य जिथे डेरा टाकला तिथे अफगाणी आधीच दबा धरून बसले होते. अफगाण्यांनी मुघल सैन्यास चहूबाजूंनी घेरले व बाण आणि दगडांचा वर्षाव केला. मुघल सैन्यामध्ये अफरातफरी माजली मुघल सैरावैरा पळू लागले, घोडे बिथरले होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुघल छावणीत हल्लकल्लोळ माजला होता. तीर आणि दगडांनी अनेक मुघल सैनिक घायाळ झाले व काही सैनिक तर जागीच ठार झाले होते. त्यातच एका बाणाने बिरबलाचा वेध घेतला. त्या काळोख्या रात्रीत बिरबलाने स्वतःला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला पण बिरबलाचा काळ जवळ आला होता व त्या रात्री एका महान राजनीतीज्ञ, कुशल व कर्तव्यनिष्ठ अशा महान बिरबलाचा मृत्यू झाला.

अशा प्रकारे अकबराने घेतलेल्या या एका निर्णयामुळे महान बिरबलाचा मृत्यू झाला. अर्थात अकबराला तरी याची कुठे कल्पना होती की आपण आपल्या दरबारातील रत्नास मृत्युचा दाढेत पाठवतोय. अकबर बिरबलाच्या अनेक कथा अतिशय प्रसिद्ध आहेत पण बिरबलचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयी फारशी माहिती कुणाला नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: The Mughal emperor Akbar was responsible for death of Birbal.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x