20 December 2024 10:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, मग ही फंडाची स्कीम पैशाचा पाऊस पाडेल, यापूर्वी 4346% परतावा दिला SBI Mutual Fund | बिनधास्त पैसे गुंतवा या SBI फंडाच्या योजनेत, पैसा अनेक पटीने वाढेल, सेव्ह करून ठेवा स्कीम डिटेल्स 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: IRFC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला - NSE: MUFIN Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट- NSE: MAZDOC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

हे खरं आहे? | निळावंती ग्रंथ वाचल्याने खरंच मृत्यू येतो का ? | काय आहे सत्य? - नक्की वाचा

The secret of Nilavanti Granth in Marathi

मुंबई ०८ ऑगस्ट | निळावंती एक असे पुस्तक आहे ज्याच्या विषयी अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. असे सांगितले जाते कि निळावंती ग्रंथाच्या वाचनाने लोक वेडे होतात इत्यादी. पण सत्य काय आहे इथे जाणून घेऊया. निळावंती ह्या ग्रंथाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यातील पहिला गैरसमज म्हणजे ह्या ग्रंथाच्या वाचनाने वेड लागते किंवा मृत्यू येतो. लोकांच्या मते ह्या ग्रंथात पशु पक्षी ह्यांची भाषा समजण्याचे ज्ञान आहे आणि हे ज्ञान घेण्यासाठी काही तरी त्याग करावा लागतोच. स्वामी विवेकानंद ह्यांचा अकाली मृत्यू ह्या पुस्तकाच्या वाचनाने झाला. ह्या पुस्तकाची संपूर्ण कथा कधीही ऐकू नये किंवा सांगणाऱ्याने सांगू नये. भारत सरकारने ह्या ग्रंथाचे मुद्रण बंद केले आहे. अश्या अनेक अफवा पसरवल्या जातात.

पण ह्यांत तथ्य आहे का ? आमच्या देशांत गूढ विद्याविषयी शेकडो ग्रंथ आहेत त्यांत निळावंती ह्या ग्रंथातच काय असे विशेष आहे ? ह्या अफवा कोणी आणि का पसरवल्या ? काहीजणांना निळावंती हा ग्रंथ थोर गणिततज्ञ भास्कराचार्यांनी लिहला असं वाटतं पण तसं नाही कारण भास्कराचार्यांचा ग्रंथ ‘निळावंती’ नसुन ‘लिलावती’ हा आहे. हा गणितविषयक ग्रंथ असुन भास्कराचार्यांची मुलगी लिलावतीच्या नावावरुन आहे. हा ग्रंथ भास्कराचार्य लिखित ‘सिध्दांत शिरोमणी’ या ग्रंथाचा एक भाग आहे.

स्वामी विवेकानंदांचा मृत्यू कुठल्याही ग्रंथाच्या वाचनाने झाला नाही. त्यांनी स्वतःहून समाधी घेतली. निळवंती ग्रंथावर भारत सरकारची बंदी नाही. अंधश्रद्धा प्रकारात मोडणाऱ्या पुस्तकावर सरकार बंदी आणू शकत नाही. गुढविद्यावर कोर्ट विश्वास ठेवत नसल्याने त्यांच्या पुस्तकावर निव्वळ मनोरंजन म्हणून पहिले जाते. निळावंती ग्रंथा च्या वाचनाने सहा महिन्यात मृत्यू येतो किंवा वेड लागते. ह्यात काहीही तथ्य नाही. निळावंती ग्रंथाचा अभ्यास शेकडो लोकांनी केला असून अनेक शाहीर, तांत्रिक मंडळींनी हे पुस्तक वाचून आपले आयुष्य सुखांत घालवले आहे. तंत्र आणि मंत्र शास्त्रांत असा कुठलाही मंत्र नाही ज्याच्या वाचनाने माणसाला आपल्या इच्छेविरुद्ध मृत्यू येतो.

निळावंती ग्रंथाने पशु पक्ष्यांची भाषा येते. इथे थोडे तथ्य आहे. पशु पक्षी माणसा प्रमाणे हजारो शब्दांनी परिपूर्ण भाषेत बोलत नाहीत. मुळांत पशु पक्ष्यांना विकसित मेंदू नसतो त्यामुळे भाषा हे प्रकरण त्यांना मुळांतच जास्त जमत नाही तिथे माणूस आणि त्यांच्याशी काय संवाद साधणार ? पण त्यांची थोडी जुजबी अशी भाषा असते आणि प्रयत्नाने माणूस ती समजून तरी घेऊ शकतो.

१९९८ साली ज्योतिषी आनंद कुलकर्णी ह्यांनी ह्या पुस्तकावर एका खाजगी समारंभांत व्याख्यान दिले होते. एक तरुण धनिक एका गांवातून दुसऱ्या गावांत प्रवास करत असतो. त्याची बैलगाडी मोडते आणि रात्री त्याच्यावर दरोडेखोर हल्ला करतात. जीव वाचवण्यासाठी तो जंगलातून पळत राहतो आणि एके ठिकाणी पडून बेशुद्ध पडतो. सकाळी जाग येते तेंव्हा एक सुंदर तरुणी त्याची काळजी घेत असते. तिच्या सौन्दर्यावर तो त्वरित भुलतो. तिच्या शुश्रुतेने तो बरा होतो आणि त्या मुलीने आपल्याबरोबर लग्न करून घरी यावे अशी इच्छा व्यक्त करतो. इथे ती मुलगी त्याला आपले नाव निळावंती असे सांगते. तिच्या अनेक अटी सुद्धा असतात. उदाहरणार्थ रात्री ती त्याच्या सोबत झोपणार नाही आणि रात्री ती कुठे जाईल ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याने करू नये. तो अटी मान्य करतो.

अश्या पद्धतीने निळावंती गांवात येते. तिचे सौंदर्य सर्वानाच दैवी वाटते. निळावंती दर रात्री शयन कक्षातून उठून बाहेर जाते. निळावंती एक अतिशय दुर्मिळ प्रकारची यक्षिणी असते आणि पृथीवर अडकलेली असते. पुन्हा आपल्या लोकांत पोचण्यासाठी तिला काही तरी गूढ ज्ञान आवश्यक असते म्हणून रात्रभर भटकून ती आत्मे, भुते, इतर यक्ष, इत्यादींकडून माहिती गोळा करते आणि लिहून काढते. हजारो वर्षे हेच केल्याने तिच्याजवळ अनेक गूढ विद्या असतात. अर्थांत इतर भुते, सिद्ध, आत्मे इत्यादी हे ज्ञान फुकट देत नाहीत. है ज्ञानासाठी तिला काही ना काही त्याग करावा लागतोच. कधी कुणा प्राण्याचा बळी तरी कधी मोठे हवन तर कधी स्वतःचे रक्त.

खरे तर निळावंतीला एका सिद्धाने सांगितले होते कि ह्याच गावांत तिला शेवटी आपल्याला पाहिजे असलेले ज्ञान मिळेल म्हणून तिनेच धनिक तरुणाला मोहित करून गावांत प्रवेश मिळवला होता. गांवातील काही लोकांना मात्र हिच्या विषयी असूया वाटते आणि ते लोक तिच्या पतीचे कां तिच्या विरुद्ध भरत असतात. गांवातील काही प्राण्यांचा मृत्यूचा आळ ते खोटेपणाने निळावंतीवर टाकतात. शेवटी निळावंतीला समजते कि आपल्या लोकांत जाण्यासाठी तिला एक दिव्य नदी पार करावी लागणार आहे. हि नदी पार करण्यासाठी जी नाव लागते ती फक्त दिव्य आत्म्यानाच दिसू शकते आणि पैलतीरी जाण्यासाठी नाविकाला काही विशेष भेट द्यावी लागते. हि वस्तू कशी मिळवावी हे ज्ञान सुद्धा निळावंतीला मिळते.

एका अमावास्येच्या रात्री गांवातील नदीतून एक प्रेत वाहत एणार आहे अशी माहिती एक घुबड तिला दिते. हे घुबड प्रत्यक्षांत एक दिव्य आत्मा असतो. नदीच्या उगमाकडे एक युद्ध होत असते. तिथे एक सैनिक गंभीर जखमी होतो आणि आपले प्राण जात असताना आपल्या लहान मुलीची आठवण म्हणून एक ताईत त्याने हातात बांधला असतो त्याला पकडून तो मृत्यू पावतो. त्या ताईताला सुद्धा इतिहास असतो पण थोडक्यांत तो ताईत दिल्यास तिला दिव्य नावेतून पैलतीरी जायला मिळू शकते.

निळावंती रात्री नेहमी प्रमाणे बाहेर जाते पण ह्यावेळी तिचा पती सुद्धा उठून तिच्या मागोमाग जातो. तिला हे ठाऊक असते पण ती त्याला थांबवत नाही. गांवातील नदीचा किनाऱ्यावर ते प्रेत वाहत येते आणि ती नदीतून उडी टाकून ते प्रेत ओढून आणते. ते दृश्य पाहून तिच्या पतीला किळस येते आणि तो येऊन तिला जाब विचारतो. निळावंती त्या प्रतच्या हातातून ताईत घेऊन पळून जायला बघते पण इथे तिच्या अपेक्षेच्या विरुद्ध तिचा पती तिच्यावर जादूचा प्रयोग करतो.

तिला जबरदास्त धक्का बसतो. तिचा पती ज्याला ती सामान्य माणूस समजत होती प्रत्यक्षांत एक राक्षस होता. त्याला सुद्धा जादू विद्या येत होती आणि तो तो ताईत घेऊन पळून जातो. रागाच्या भरांत निळावंती सुद्धा पक्षाचे रूप घेऊन सर्व काही मागे सोडून जंगलांत जाते. गांवातील एक अर्धवट ज्ञान असलेला माणूस तिच्या सामानातून तिची ताडपत्रे गोळा करतो अनिल त्यातील ज्ञान वापरण्याचा प्रयत्न करतो.

त्या पत्रांत हजारो लोकांकडून गोळा केले ज्ञान असल्याने त्याला काही स्ट्रक्चर असे नसते, काही पाने तर वाचण्यासारखी सुद्धा नसतात तर काहींची भाषा सुद्धा विसरली गेलेली असते. पण काही वर्षांत त्यातील काही गोष्टी निळावंती ग्रंथ नावाने प्रसिद्ध पावतात. ह्या कथेत किती सत्य आहे ह्याची कल्पना कुणालाच नाही पण निळावंती ग्रंथ दासबोध किंवा सहदेव-भाडळी ह्याप्रमाणे एक व्यक्तीने मुद्देसूद पद्धतीने लिहिलेले पुस्तक नसून विविध वेगळे मंत्र जोडून केलेली एक विचित्र पोथी आहे असे सर्वच लोक मान्य करतात.

ह्या पुस्तकात घुबड, गरुड, डोमकावळे इत्यादी पक्षी योनीतील प्राण्याशी बोलण्याचे मंत्र आहेत पण कुठलाही मंत्र काम करत नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे हे मंत्र सर्वसाधारण पक्ष्यासाठी नसून पक्ष्यांच्या रूपांत असणाऱ्या दिव्य आत्म्याशी संवाद साधण्यासाठी आहेत. आपणाला जर असे आत्मे पाहण्याची अध्यात्मिक शक्ती नसेल तर हे मंत्र सुद्धा व्यर्थ आहेत.

निळावंती ग्रंथात अनेक अंजने करण्याचे सुद्धा मंत्र आणि कृती आहे. ह्यांत रात्री दिसण्यासाठी मार्जार अंजन अतिशय उपयुक्त असून अनेक तांत्रिक ते सहजपणे वापरतात. पण इतर अनेक अंजने पृथ्वीवरून दिव्य लोकांत जाण्यासाठी असलेली द्वारे शोधण्यासाठी आहेत. मुळांतच अशी द्वारे अत्यंत कमी असल्याने साधारण माणसाला त्यांचा काहीही फायदा नाही. ह्याशिवाय अन्न नासू नये, अन्नाला किडे लागू नयेत इत्यादी साठी जे मंत्र आहेत ते खूप प्रसिद्ध आहेत आणि वापरले सुद्धा जातात. निळावंती ग्रंथाच्या प्रति बाजारांत उपलब्ध नाहीत कारण मुळांतच हे एक पुस्तक नाही. काळाच्या ओघांत निळावंती ग्रंथाच्या अनेक प्रति निर्माण झाल्या आणि त्यांत बदलावं सुद्धा झाले आहेत. हे ज्ञान गुप्त स्वरूपाचे असल्याने गुरु शिष्य परंपरेतूनच ते दिले जाते.

काही प्रति आणि निळावंती ग्रंथाचे जाणकार जळगांव जामोद जवळील भेंडवळ या गावातील श्री वाघगुरु़जी यांना हि विद्या अवगत आहे म्हणतात. फुनवाडी बाजार जवळ बुकडी बुद्रुक इथे रस्तंभा नदीच्या संगमाजवळ कनकरनाथ भेंडोळेगुरुजी यांच्याकडे हा ग्रंथही आहे आणि त्यांना ज्ञानही आहे अशी माहिती आहे. खेड शहराच्या जवळ चाकदेव म्हणून गांव आहे इथे पपू घारनाथ गुरुजी राहतात. त्यांच्याकडे निळावंती ग्रंथाची २ जुनी ताडपत्रे आहेत पण त्यावरील भाषा कुणाला हि येत नाही.

कर्नाटकातील एनॅममूर येथे दार अमावास्येला एक ठिकाणी अनेक तांत्रिक आणि स्त्री मांत्रिक येतात तिथे काही जणांना निळावंतीतील अंजनाची माहिती आहे आणि अनेक जण मार्जार अंजन सुद्धा वापरतात. येथील काही मांत्रिकाकडे एक खास अंजन आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यांत घातले तर तुमची वस्तू कुणी चोरली असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचा चेहरा पाण्यात पाहू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Story Title: The secret of Nilavanti Granth in Marathi news updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x