19 April 2025 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

थोर समाजसेवक | पद्मविभूषण डॉ. बाबा आमटे, एक दिव्य ज्योत!

Thor Samaj Sevak Doctor Baba Amte

मुंबई, ०३ ऑगस्ट | समाजामध्ये असे अनेक लोक राहत असतात जे स्वतःपेक्षा जास्त समाजाचा विचार करतात आणि निस्वार्थ भावनेने स्वतःला समाजासाठी वाहून टाकत असतात. त्यापैकी एक म्हणजे डॉ .बाबा आमटे. त्यांचे मूळ नाव मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे. ह्यांचा जन्म डिसेंबर २६, १९१४ ला हिंगणघाट, वर्धा मध्ये झाला. कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी आपले जीवन पणाला लावले आणि चंद्रपूर इथे आनंदवन नावाचा आश्रम सुरु केला.

त्यांचे सुरुवातीचे आयुष्य जर पाहिले तर त्यांनी नागपूर विद्यापीठातून बी .ए आणि एल .एल .बी हे शिक्षण पूर्ण केले. त्यांना डॉक्टर व्हायचे होते पण वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. पण १९४९-५० या कालवधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारशींमुळे फक्त डॉक्टरांना करता येणार कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केला.

गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन स्वातंत्र्य प्राप्तीच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी १९८५ रोजी ‘भारत जोडो’ अभियान सुरू केले. भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरु केला. या अंतर्गत आदिवासीना माहित नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकवल्या जातात.

या सर्व कार्यात त्यांची पत्नी साधना आमटे यांचाही मोलाचा वाटा आहे. सतत कामात असूनही बाबांनी ‘ज्वाला आणि फुले’ आणि ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हेय काव्यसंग्रह लिहले. बाबा आमटे ह्यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त झाला आहे. याव्यतिरिक्त १९७१ रोजी पद्मश्री, १९८६ रोजी पद्मविभूषण, १९९९ रोजी गांधी शांतता पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. अशा रीतीने अनेक समाज सुधारक आपल्या जीवनात एक प्रेरणेची ज्योत घेऊन येतात ज्यामुळे आपले आयुष्य प्रफुल्लित होते .

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Thor Samaj Sevak Doctor Baba Amte information in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या