थोर समाज सुधारक | स्त्रियांचा आदर्श क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
मुंबई, ०३ ऑगस्ट | आजच्या काळात शिक्षणाचे महत्व आपणा सर्वांना ठाऊक आहे आणि त्यातही एक स्त्रीचे शिक्षित असणे हे फार गरजेचे आहे. अशा या शिक्षणाचे महत्व ज्यांच्यापासून सुरु झाले त्या अर्थात सावित्रीबाई फुले. ज्यांचा आदर्श आज सर्व समाज ठेवतो. जाणून घेऊया, त्यांच्या कार्याबद्दल.
सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या प्रथम महिला शिक्षिका असून त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटलं जातं. अशा वेळेला त्यांच्या काळात महिलांना शिक्षण देणे हेय फार कठीण असल्यामुळॆ त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी, नायगाव, सातारा येथे झाला. सावित्रीबाईंचा विवाह अवघ्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्यासोबत झाला.
त्यांचा विवाह झाला तेव्हा त्या शिक्षित नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिरावांनी त्यांना शिक्षित केले. ज्या काळात महिलाना शिक्षणाची परवानगी नव्हती त्या काळात सावित्रीबाईंनी आपला शिक्षणासाठीचा संघर्ष सुरु ठेवला. या जुन्या रूढी तोडण्यासाठी सावित्रीबाईंनी पती ज्योतिरावांसोबत १८४८ साली मुलींची पहिली शाळा उघडली आणि सावित्रीबाई ह्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यपिका बनल्या.
सावित्रीबाईंवर अनेकदा शेण, दगड, कचरा फेकण्यात आला. त्यांना शिवीगाळ केली गेली तरी त्यांनी हार मानली नाही. महिलांच्या शिक्षणासाठी प्रेरित होऊन दोघांनी आपले कार्य चालू ठेवले आणि त्यासाठी १६ नोव्हेंबर, १८५२ रोजी ब्रिटिश सरकारने त्यांचा गौरव केला. सावित्रीबाई ह्या कवयित्री सुद्धा होत्या. त्यांच्या “काव्यफुले” आणि “बावनकशी सुबोधरत्नाकर” यात काव्यरचना पाहायला मिळतात. ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर देखील त्या अविरत कार्य करत राहिल्या. १८९७ ला पुण्यात प्लेग ची साथ सुरु झाली आणि त्यात त्यांना प्लेग ची लागण झाली आणि त्यातच १० मार्च, १८९७ ला त्यांनी जगाचा निरोप घेतला.
अनेक शाळांची निर्मीती:
पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासुन 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. 1849 ला पुणे इथं उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली. महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत सावित्रीबाई सतत या क्षेत्रात काम करीत राहिल्या. सावित्रीबाईंचे आणि ज्योतिबांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान पाहुन 16 नोव्हेंबर 1852 ला ब्रिटीश शासनाने त्यांचा यथोचित गौरव केला.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Thor Samaj Sudharak Savitribai Phule information in Marathi news updates.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
- NHPC Share Price | पीएसयू NHPC शेअरबाबत CLSA ब्रोकरेज फर्मचा फायद्याचा रिपोर्ट, शेअर रॉकेट होणार - NSE: NHPC