AadhaarFaceRd App | आता फेसआरडी ॲप'वर फक्त चेहरा दाखवून तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकणार
आता आधार कार्ड डाऊनलोड करणं आणखी सोपं झालं आहे. जर तुम्ही तुमचं आधार कार्ड घरी विसरला असाल किंवा तुम्हाला नवीन आधार डाऊनलोड करायचा असेल तर तुम्हाला आता भटकंती करावी लागणार नाही. आता आपण आपल्या फोनवरूनच फेस ऑथेंटिकेशनद्वारे आपली ओळख सांगून सहजपणे आधार डाउनलोड करू शकणार आहात. युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया या भारत सरकारच्या आधार कार्ड जारी करणाऱ्या संस्थेने एक नवीन फेसआरडी ॲप लाँच केले आहे. गुगल प्लेस्टोअरवरून हे ॲप कुणालाही सहज इन्स्टॉल करता येईल. यूआयडीएआयने ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी