महत्वाच्या बातम्या
-
केसरकरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंसोबत भगवी लाट | कोकण दौऱ्यात प्रचंड गर्दी आणि समर्थन मिळतंय
आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तरुण, महिला ते ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे म्हणाले रात्रभर याचा विचार मनात येतो. उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. आम्ही डोळे बंद करून मिठी मारली पण पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा मग बघू सत्य जिंकते की सत्ता जिंकते, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचं नाव न आव्हान दिले. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहे. आज सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती प्रहार केला.
2 वर्षांपूर्वी -
धार्मिक टीकेसाठी सोशल मीडियावर १ वर्षापूर्वीचे फोटो व्हायरल | नेहमीप्रमाणे भातखळकर अग्रस्थानी
वरळीमध्ये एका मोठ्या हिरव्या रंगाच्या कटआऊटवर आदित्य ठाकरेंचा सफेद रंगाचा कुर्त्यामधला फोटो व्हायरल झाला आहे. फोटोच्या शेजारी ऊर्दू भाषेत ‘नमस्ते वरळी’ असा संदेश लिहिला आहे. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी हा फोटो टि्वट करत ‘भगवा झाला हिरवा’ असा संदेश लिहिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी? | मनसेचा युवासेनेला पोश्टरबाजीतून टोला
ठाकरे सरकार आणि त्यांचं पेंग्विनप्रेम सध्या चांगलंच चर्चेत आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला मात्र महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेच आता आक्षेप घेतला आहे. या पेंग्विनसाठी लागणाऱ्या खर्चाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ठाकरे सरकारवर चांगलीच टीका करत मुंबईत पोस्टरबाजी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसाठी आंदोलनात पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलणाऱ्या मोहसीन शेख यांना युवासेनेत सहसचिवपदी बढती
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा कारणाऱ्या आणि युवासेनेची ताकद दाखवून देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं बक्षीस दिलंय. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर मोहसीन शेख यांच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना जमलं नाही ते आदित्य ठाकरेंनी करून दाखवलं | मुंबई आरे'तील ८१२ एकर जागा वन विभागाकडे | जंगल कायम राहणार
मुंबईसारख्या महानगरात आता मध्यभागी जंगल उभं राहणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरे ची ८१२ एकरची जागा जंगल म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार २८६ हेक्टर अधिसुचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागाला प्रत्यक्ष सोपवला आहे. त्यामुळे आरे मधली ही जमिन आता अधिकृतरित्या Indian Forest Act च्या सुरक्षेत आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये
तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात बसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तर अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. अशावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. तिथून त्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतलाय. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नाने SRPF जवानांच्या बदलीसाठीची १५ वर्षाची अट रद्द
राज्य राखीव पोलीस दल हे राज्यात वर्षभर कार्यरत असते. नियमित पोलीस जवानांसोबत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या दलातील जवान नेहमीच आघाडीवर असतात. कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या नियमांत पूर्वी दहा वर्षांच्या कार्यकालाची मर्यादा होती. परंतु, मागील फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांनी नियमांत बदल करून हा कार्यकाळ तब्बल पंधरा वर्षांचा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | मुंबईकरांसाठी थेट परदेशातून लसी मागवण्यासंदर्भातील चाचपणी सुरु
राज्याच्या कोरोनास्थितीबाबा एक अत्यंत दिलासादायक बातमी येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात वाढलेले संसर्ग आता नियंत्रणात येत असल्याचे पाहायला मिळत असून राज्यतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होत आहे. राज्यातील दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा तब्बल महिन्याभराहून अधिक काळानंतर आज (१० मे) थेट ४० हजारांच्या खाली गेला असून राज्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजकारण सुरु राहिल, लोकांचा जीव महत्त्वाचा - आदित्य ठाकरे
राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.
4 वर्षांपूर्वी -
ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही | ही तर टाइमपास टोळी - आदित्य ठाकरे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरेंनी मनसेचा टाईमपास टोळी म्हणून उल्लेख केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला होता. आता शिवसेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा टाईमपास टोळी असा उल्लेख केल्याने सेना-मनसे वाद रंगला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण | पुढे पुढे पाहा काय होतंय - आदित्य ठाकरे
औरंगाबाद संभाजीनगर वादावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलंय. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचं एकमत करूनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
4 वर्षांपूर्वी -
टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली | पेज-३ नेत्यांना झटका - मनसे
अमेरिकन कार कंपनी टेस्लाची अखेर भारतामध्ये एंट्री झाली आहे. दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. टेस्ला कंपनीनं 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे. टेस्ला कंपनीनं त्यांचं ऑफिस सुरु करण्यासाठी बंगळुरुची निवड केली आहे. बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचं ऑफिस असेल. या ठिकाणी कंपनीचा संशोधन आणि विकास ऑफिस असेल, अशी माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे | महाविकास आघाडी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरे तरुण आहेत | त्यांनी किमान कांजूरमार्ग कारशेडबाबत सौनिक समितीचा अहवाल वाचावा
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवा, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालयाचा या निर्णयामुळं राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला माझ्यापासून भीती वाटत असल्यानेच वैयक्तिक हल्ला - आदित्य ठाकरे
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर एका मुलाखतीदरम्यान प्रतिउत्तर दिलं आहे. “शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं महाविकास आघाडी उत्तम काम करत असल्याने त्याच्यावर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. वास्तविक भारतीय जनता पक्षाला माझ्यापासून भीती वाटत असल्यानेमुळे ते वैयक्तिक हल्ला करत,” असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (State Environment minister Aaditya Thackeray talked over personal attack from BJP leader) यांनी म्हटलं आहे. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पीडीपी आणि जेडीयूसोबत युती करतात तेव्हा भाजपचं हिंदुत्व कुठे जातं? - आदित्य ठाकरे
निवडणुकीदरम्यान आम्ही ज्यांना मित्र समजत होतो, ते तर शत्रू निघाले, अशा तिखट शब्दांत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (State Environment Minister Aaditya Thackeray) यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे वैयक्तीक पातळीवर टीका करत ही लोकं इतक्या खालच्या थराला जातील असा विचार देखील मी कधी केला नव्हता. आम्ही केव्हाही अशा प्रकारच्या विखारी आणि वयक्तिक पातळीवरील टीका केली नाही. तरीही ठीक आहे. सामान्य जनता सगळं पाहतेय, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. हिंदी वृत्तवाहिनी ‘आज तक’शी मुलाखती (State Environment Minister’s Interview on Aaj Tak News Channel) दरम्यान त्यांनी या विषयावर भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
आरे वाचवा नाही... आरे वाचवलं | पर्यावरण मंत्र्यांचं मोजक्या शब्दात ट्विट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यात त्यांनी मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आता आरे काॅलनीऐवजी कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वटिद्वारे यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारला आमचा पाठिंबा | तरी आदित्य ठाकरे साधा फोनही उचलत नाहीत
राज्यातील महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष समाजवादी पार्टी देखील शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचं समोर आलं आहे. अबू आझमी यांनी थेट आदित्य ठाकरे यांचं नाव घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिनाभर पडणारा पाऊस अवघ्या १२ तासांत | तुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचं धुमशान सुरूच आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडाली. लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली. पण असं असतानाही पाऊस काही थांबवण्याचं नाव घेत नाही.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे पितापुत्रांसह सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (Central Board of Direct Taxes – CBDT) तशी विनंती केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो