Aakash Educational Services IPO | 'बायज्यूस'च्या उपकंपनीचा IPO लाँच होतोय, सुरुवातीला एंट्री करून नफा कमावणार?
Aakash Educational Services IPO | जगातील सर्वात मोठी एज्युटेक स्टार्टअप कंपनी ‘बायज्यूस’ आपली उपकंपनी ‘आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस’ चा IPO लाँच करण्याआधी 250 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी करणार आहे. आणि त्यासाठी कंपनीने कनवर्टिबल नोट्स जारी करण्याची योजना आखली आहे. हे नोट्स खरेदी करणार्या गुंतवणूकदारांना कंपनी IPO जाहीर केल्यानंतर त्यांच्या कनवर्टिबल नोट्सच्या बदल्यात शेअर्स वाटप करेल. आणि त्यासाठी त्यांना शेअर्सच्या लिस्टिंग किंमतीवर 20 टक्के सूट दिली जाईल. एका दिग्गज मीडिया हाऊसच्या बातमीनुसार ‘बायज्यूस’ कंपनीचे काही विद्यमान गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात कनवर्टिबल नोट्स खरेदी करू शकतात. मात्र, त्यांनी ही माहिती सार्वजनिक केलेली नाही.
2 वर्षांपूर्वी