महत्वाच्या बातम्या
-
ST Bus | यवतमाळमध्ये ड्रायव्हरच्या चुकीने नदीत वाहून गेली एसटी बस | बचावकार्य सुरू
मरखेड येथील दहागावातील पुलावरून हिरकणी एसटी बस (एमएच १४ बीटी ५०१८) पाण्यात वाहून गेली आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गावकऱ्याच्या मदतीने बाहेर काढन्याचे काम सुरू आहे. या बसमध्ये 15 ते 20 प्रवाशी प्रवास करत होते. नांदेड-नागपूर ही बस असून नांदेडवरून नागपूरला पुसद मार्गे जात होती. घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे.
3 वर्षांपूर्वी -
खाडीत कार कोसळून अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि प्रियकर शुभम देगडेचा मृत्यू
कॅलनगुट येथील खाडीत कार कोसळून पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे व शुभम देडगे या प्रेमिकांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पार्टी करून परतत असताना हा अपघात घडला. भरतीच्या वेळी खाडीत पाणी असल्याने दोघांचाही अपघातानंतर बुडून मृत्यू झाला.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | चेकपोस्टवरील अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल | घाई केल्याने मित्रं जागीच ठार
प्रवासात नियमाचे अनेकांकडून पालन केले जात नाही. घाई, गडबडीमध्ये अनेकवेळा मोठ्या दुर्घटना घडतात. सध्या अशाच एका भयानक दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा थरकाप उडाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंब्रा भागातील प्राईम क्रिटिकेयर या खाजगी हॉस्पिटलला आग | 4 रुग्णांचा मृत्यू
मुंब्रा शहरातील कौसा भागात असलेल्या प्राईम क्रिटिकेयर सेंटर या हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी पहाटे 3 वाजता भीषण आग लागली. या घटनेत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून 20 रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर आयसीयूतील 6 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असताना 4 रुग्णांचा मृत्यू झाला. यास्मिन शेख ( 46 वर्षे), नवाब शेख (47 वर्षे), हलिमा सलमानी (70 वर्षे), हरीश सोनावणे (57 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई | भाडूपच्या सनराईज हॉस्पिटला आग | त्या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं वृत्त
मुंबईच्या भांडुप परिसरात एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर बनवलेल्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री 12 वाजता आग लागली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि मात्र त्याबद्दल इस्पितळाने वेगळंच कारण दिलं आहे . हॉस्पिटलमध्ये दाखल 76 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट केले आहे. फायर ब्रिगेडच्या 22 गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी पोहोचल्या. रुग्णालयात बचावकार्य अजूनही सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
बर्निंग ट्रेन | दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसच्या बोगीला आग
दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या डब्याला (बोगी) आग लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सदर घटना काही काळापूर्वी येथील कांसरो स्थानकाजवळ घडली आहे. कांसरो स्टेशन राजाजी व्याघ्र प्रकल्पातील कोर एरियामध्ये आहे. याविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला आहे. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
मुलांवर लक्ष ठेवा | लोखंडी शिडीला वीजेच्या तारा | खेळताना स्पर्श होताच मुलगा भस्मसात
मुंबईतील ऐरोली परिसरात एका 12 वर्षीय मुलाचा वीजेच्या धक्क्यानंतर जळून मृत्यू झाला आहे. हा मुलगा रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या एका लोखंडी शिडीला स्पर्श करत होता. तर ती शिडी रस्त्यावरच असलेल्या वीजेच्या तारांना स्पर्श झाली. स्पर्श होताच आगीचा भडका उडाला आणि तो मुलगा जळून जागीच मृत्यूमुखी पावला.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये भरधाव ट्रकखाली चिरडून फूटपाथवर झोपलेल्या १३ मजुरांचा मृत्यू
गुजरातमधील सुरतमध्ये आज मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये अनेक मजुरांचा मृत्यू झाला आहे. रात्री सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे झालेल्या एका अपघातामध्ये काही मजूर चिरडले गेले असून त्यापैकी १३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेले सर्वजण हे मजूर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भंडारा | शिशु केअर युनिटच्या अग्नितांडवात १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू | चौकशीचे आदेश
नव वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशु केअर युनिटला आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक २०० फूट दरीत कोसळला | चौघांचा जागीच मृत्यू
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. हा ट्रक थेट 200 फूट दरीत कोसळला असून 4 जण जागीच ठार झाले आहेत, तर अंदाजे 30 ते 35 जण जखमी असल्याची माहिती आहे. मदतकार्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
जर्मनीत बारमध्ये गोळीबार, ८ जणांचा मृत्यू
जर्मनीच्या दोन बारमध्ये बुधवारी रात्री उशिरा गोळीबार झाला आहे. या गोळीबारामध्ये तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जर्मनीच्या स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी शहराच्या शिशा बारमध्ये गोळीबार केला. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; २० प्रवाशांचा जागीच मृत्यू
तमिळनाडूमधील अविनाशी परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि लॉरीची भीषण धडक झाली. या भीषण अपघातात २० जणांचा जागीच मृत्यू झाला असून २४ जण जखमी आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
देवदर्शनावरुन परतताना स्कॉर्पिओ गाडीची ट्रकला धडक, ६ जणांचा मृत्यू
गाडी वेगावर नियंत्रण ठेवा नाहीतर जीवाशी मुकाल अशा कितीही सुचना दिल्या तरी गाड्यांचा वेग काही कमी होत नाही. चंद्रपूरमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या एका कारला भीषण अपघाता झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चंद्रपूरमधील मूल तालुक्यातील केसलाघाट इथे हा भीषण अपघात झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नेरुळमधील सीहोम्स इमारतीला भीषण आग, ७ जवान जखमी
काळचौकी परिसरातील एका इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग लागल्याची घटना ताजी असताना, नवी मुंबईतही एका टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईत नेरुळच्या सीवूड सेक्टर ४४ मध्ये एका टॉवरमध्ये शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास आग भडकली होती. त्यांना उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
जळगाव: ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला असून सांगली जिल्ह्यात कार चालकाचे निंयत्रण सुटल्याने ही कार विहिरीत पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातात एकूण १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याने रविवारचा दिवस अपघातवार ठरला आहे. दोन्ही अपघात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा भीषण अपघात; २० ठार
नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात १० ते ११ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सात ते आठ जणांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला भीषण अपघात
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी हे अपघातात जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना झाली.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; अपघात बाप-लेकीचा जागीच मृत्यू
यात्रेसाठी गावी जाणाऱ्या बाप-लेकीवर वाटेतच काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि तीन वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गावर भीमा नदीवरील पुलावर शनिवारी ही घटना घडली. या घटनेमुळे निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं
कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटी विमानतळावर टेक ऑफ घेताना जवळ असलेल्या दोन मजली इमारतीवर हे विमान आदळलं. यावेळी विमानात १०० प्रवासी प्रवास करत होते. यापैकी काही प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
बोरघाटात खासगी बसचा अपघात, ५ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी
दोन वेगवेगळ्या अपघातमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात दुर्घटना घडली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO