महत्वाच्या बातम्या
-
ICSE बोर्डाचे सीईओ व आदित्य ठाकरेंची भेट; मुंबई पालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावणार
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची आज आयसीएसई शिक्षण बोर्डाचे सीईओ गॅरी अरॅथॉन यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आयसीएसई दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्न करत असून, त्यानिमित्त ही भेट झाल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
खैरे, आढळराव-पाटील, अनंत गिते यांना आराम; तर प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाणार?
एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत आहेत. मात्र शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंकडून माहुलवासीयांसाठी गोराई येथील घरांच्या चाव्यांचे वितरण
तेल आणि रासायनिक कंपन्यांचा शेजार लाभलेल्या माहुलवासीयांचे जगणे अस्वच्छता, गैरसोयी आणि मुख्य म्हणजे प्रदूषित हवेमुळे असह्य़ बनले आहे. एकमेकांना खेटून असलेल्या येथील इमारतींत दिवसाही सूर्यप्रकाशाला थारा नसतो. त्यामुळे श्वसनाच्या आणि त्वचेच्या विकारांनी हे रहिवाशी ग्रासले आहेत. आयआयटी, केईएम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींनी केलेल्या विविध पाहणीत वारंवार माहुलमधील प्रदूषणावर बोट ठेवण्यात आले होते. आजही माहुलवासीयांचा प्रश्न न्यायालयाच्या दरबारात अधूनमधून उठत असतो; परंतु पालिका, युती सरकार अशा सर्वच यंत्रणा त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाय योजण्याऐवजी कागदी घोडे नाचविण्यातच दंग होते.
5 वर्षांपूर्वी -
रेशमी किड्याला आयुष्यातील 'उपहास' कधीच समजणार नाही: अमृता फडणवीस
शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्याला उत्तर देत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना माफी मागा अशी मागणी केली होती. आदित्य ठाकरेंच्या या आरोपांवर आता भाजपने पलटवार केलाय. भाजपने फडणवीसांच्या भाषणाचा व्हिडीओच ट्वीट करून त्याला उत्तर दिलंय. त्याच भाषणात फडणवीस म्हणाले होते की, माझ्याकडून बांगड्यांचा झालेला उल्लेख हा महिलांना आवडणार नाही. त्यामुळे मी माझं वक्तव्य मागे घेतो. त्यानंतर त्यांनी शिवसेना मूग गिळून बसलीय का? असा सवाल केला होता.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य यांचं मिशन 'शिवसेना इमेज बिल्डिंग'; प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर जाणार? - सविस्तर वृत्त
एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
संभाजीनगर: ३ दशकानंतर सुचलं? आता फक्त विकासकामांवरच बोलेन: आदित्य ठाकरे
काल औरंगाबाद महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीत लढली जाणार हे वृत्त पसरताच शिवसैनिकांमध्ये असंतोष वाढला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना तातडीने औरंगाबादला धाडण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील औरंगाबादच्या दौऱ्यावर असल्याने शिवसेनेत धावपळ वाढली आहे आणि त्याच मुख्य कारण म्हणजे मनसेने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर कारण्यासाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणेकरांनी 'आफ्टरनून लाइफ'चं वक्तव्य विनोदाने घ्यावे: आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘प्लास्टिक वापर बंदीबाबत पुणे चांगली भूमिका बजावत आहे, इकोफ्रेंडली वातावरणासाठी पुणे चांगली दिशा दाखवू शकते. पुण्यात ज्या प्रकारे कापडी पिशव्यांचा बांबूच्या वस्तूंचा वापर केला जातो, त्या गोष्टी राज्यात किंबहुना देशातही सगळीकडे व्हायला हव्यात.पुण्याला कार्बन मुक्त करण्यासाठी २०३० टार्गेट आहे, परंतु पुणे २०२५ मध्ये ते पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. महाविकास आघाडीचं सरकार पर्यावरणासाठी सकारात्मक आहे. जगातील बेस्ट प्रॅक्टिस राज्यात आणणार असंही नमूद करायला ते विसरले नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर २७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरु
मुंबईत नाईट लाईफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ‘पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,’ अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ‘मुंबईचा महसूल वाढण्यासाठी आम्ही २०१३ मध्ये ही नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. आता सात वर्षानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. २७ जानेवारीपासून नाईट लाईफबाबतचा नियम लागू होईल,’ अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी मुंबईकर ते नाईट लाईफ आणि त्यामागील राजकीय फायदे: सविस्तर वृत्त
२६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी केली. मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. त्यानंतर लगेच पुण्यातही नाईट लाईफ संकल्पनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणेकरांचा दुपारी 'झोपा आणि झोपू द्या' नियम; आदित्य यांना 'नाईट लाईफ' प्रस्तावाची अपेक्षा? सविस्तर
२६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. अशातच पुण्यातही नाईट लाईफ संकल्पनेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा: आदित्य ठाकरे
राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेले सर्व स्वातंत्र्यसैनिक महान होते, ते आपली दैवतं आहेत. मात्र, किती दिवस इतिहासावर बोलत राहणार आहात. आता इतिहासाकडून शिकून, प्रेरण घेऊन आजचे प्रश्न साडवायला हवेत, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
संदीप देशपांडेंचं ते ट्विट सत्य; रस्त्यावरील खड्डयांनी त्रस्त जनता विरुद्ध नाईट लाईफ: सविस्तर वृत्त
मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
नको आम्हाला नाईट लाईफ, होईल त्याने वाईट लाईफ; राष्ट्रवादीचं ते विरोध प्रदर्शन: सविस्तर
मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरे म्हणाले तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे, असं म्हणताच एकच जल्लोष...पुढे?
महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यापैकी कोणाचा जास्त राग येतो?...अन आदित्य म्हणाले
महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्र्वादी या पक्षांसोबत काम कारण सोपं: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी यांना प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी बोलतं केलं.
5 वर्षांपूर्वी -
इंदिराजींबद्दल कोणताही शिवसैनिक अपशब्द काढणार नाही: आदित्य ठाकरे
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीविषयी संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सारवासारव केली आहे. “शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जे विधान केले, ते वेगळ्या कारणांमुळे होते. कोणताही शिवसैनिक इंदिराजींबद्दल अपशब्द काढणार नाही,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
शिक्षण-पर्यटनाचं आधुनिक राजकारण! आदित्य ठाकरेंची फेसबुक-इंस्टाग्रामच्या कार्यालयाला भेट
शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. दोघांच्या भेटीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, या भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीत आले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांची पुन्हा भेट झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्या अधिकाऱ्यांना PoK'वर पाठवा म्हणाले होते; अन राज्याच्या प्रधान सचिवपदी बढती दिली
राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज मुंबई मेट्रो -३ च्या संचालक अश्विनी भिडे यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अश्विनी भिडे यांना आता प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. तसेच एमएमआरसीएल आणि मेट्रो -३ चे संचालकपदही अश्विनी भिडे यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. आरे येथील मेट्रो-३ च्या कारशेडच्या मुद्द्यावरून अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. मात्र हे मतभेद बाजूला ठेवत अश्विनी भिडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य बाळासाहेबांचा नातू, पण त्याच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही: अजित पवार
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर नागपुरात पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी अनेक नवखे आमदार विधिमंडळात आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरेही पहिल्यांदाच आमदार झाला आहे. आता त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘आदित्य हा बाळासाहेबांचा नातू आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. मात्र त्याच्या वागण्यात अजिबात अहंकार नाही. तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागतो.’ असं अजित पवार म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS