महत्वाच्या बातम्या
-
तीस वर्षीय आदित्य ठाकरे यांची एकूण संप्पती ११ कोटी ३८ लाख
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिले ठाकरे ठरले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंब उपस्थित होते. हा अर्ज भरण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल
शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याआधी आदित्य ठाकरे यांनी वाजतगाजत रोड शो केला. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. शिवसैनिकांमध्ये यावेळी प्रचंड उत्साह दिसत होता. आदित्य यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे आणि लहान भाऊ तेजस ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
काकाचा दिलदारपणा दिसणार? मनसे वरळीतून उमेदवार देणार नसल्याचं वृत्त
शिवसेनेने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्यात ७० उमेदवारांच्या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. इथले शिवसेनेचे प्रमुख विरोधक असलेले राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष सचिन अहिर यांनाच शिवसेनेने पक्षात घेतल्यामुळे आता हा शिवसेनेसाठी ‘सेफ’ मतदारसंघ झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे त्यांच्याकडून आदित्य ठाकरेंना कडवी टक्कर दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य यांचं 'केम छो वरली'; मराठी माणूस म्हणतो इथेच आपला 'गेम छो मुंबई': सविस्तर
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल वरळी मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. देशात आणि महाराष्ट्रात मराठी हक्कासाठी लढणारा पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेकडून वरळीत “केम छो वरली” असे लिहिलेले बॅनर झळकले आहेत.या बॅनरवर आदित्य ठाकरे यांची छबी असल्याने विरोधकांना निवडणुकीच्या तोंडावर आयते कोलीत मिळाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
वरळीला जागतिक पातळीवर घेऊन जाणार: आदित्य ठाकरे
विधानसभेसाठी महायुती होणार की नाही याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार की नाहीत, याविषयी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, महायुतीसह आदित्य यांच्या निवडणूक लढवण्यावरही सोमवारी शिक्कामोर्तब झाले. ‘वरळी मतदारसंघातून मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे’, असे खुद्द आदित्य यांनीच जाहीर केले. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात उतरणारे आदित्य हे ‘ठाकरे’ कुटुंबातील पहिली व्यक्ती ठरले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
होय मी विधानसभा निवडणूक लढवणार: आदित्य ठाकरे
राजकारणाशिवाय मी काहीही करू शकत नाही, असं सांगतानाच तुमची परवानगी असेल तर मी विधानसभेची निवडणूक लढवणार, असं सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून स्वत:ची उमेदवारी आज घोषित केली. या निमित्ताने निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती आहे. आदित्य यांनी त्यांची उमेदवारी घोषित केल्याने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरल्याचे संकेतही शिवसेनेने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंसाठी संजय राऊत पवारांकडे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र आता या भेटीबाबत नवी माहिती समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काही लोकांनी भाड्याने पत्रकारीता करायला सुरूवात केली आहे: प्रियांका चतुर्वेदी
आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या अँकर अंजना ओम कश्यप यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावेळी अँकरने काँग्रेसे नेते राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात तुलना करणारी धक्कादायक टिप्पणी केल्याचं या व्हिडीओ’मध्ये स्पष्ट दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
नव्हे नव्हे नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल; सुमित राघवन यांचा आदित्य यांना टोला
स्मार्ट सिटी’च्या वल्गना करत मोफत वायफायसारख्या सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांतील रस्त्यांची अवस्था पाहिली तर ‘आपण खेडय़ात तर नाही ना’ असा प्रश्न निर्माण होतो. अशा खड्डेमय रस्त्यांवरून दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य एकीकडे मिळेल त्या माध्यमातून आपल्या वेदना मांडत असताना मराठी चित्रपट-नाटय़सृष्टीतील कलाकारांनीही यात आपला आवाज सामील केला आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी यांच्यासह आता अभिनेता पुष्कर श्रोत्री यानेही प्रशासनावर जोरदार टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
५ वर्ष उद्योगमंत्री सेनेचेच; मग आदित्य यांनी बेरोजगारी कमी का केली नाही? डॉ. अमोल कोल्हे
मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असे म्हणत जनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत. पाच वर्ष कामे केली असती तर हि वेळ आली नसती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रदुषण मुख्य महाराष्ट्र करण्याची भाषा करत आहेत. मग पर्यावरण मंत्री रामदास कदम काय करत होते. पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली १५ कामे दाखवा असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना भाजपवर निशाणा साधला. ते कर्जत येथे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान आयोजीत सभेत बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
SaveAarey: आदित्य ठाकरे नाही; ते तर 'पप्पू ठाकरे' आहेत: आपच्या नेत्या प्रीती शर्मा
आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेड डेपोवरून सध्या मुंबई शहरातील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर आणि पर्यावरणप्रेमी वृक्षतोडीविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेत, राज्यात, दिल्लीत सत्ता असताना केवळ दाखवण्यापुरता विरोध केला जातं असल्याचा आरोप यापूर्वी देखील विरोधकांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
#SaveAarey: मुंबईकर व पर्यावरणवाद्यांच्या संतापामुळे आदित्य यांचा दिखावा: सविस्तर
आमचा मेट्रो रेल्वेला विरोध नाही, पण आरेमध्ये कारशेड बांधण्यामुळे तेथील जैवविविधता नष्ट होण्याचा व मुंबईला पुराचा धोका असल्याने पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी मात्र आरेमध्ये कारशेड न झाल्यास मेट्रो-३ अशक्य असल्याची धमकी धमकी देत आहेत, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर टीकास्त्र सोडले. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना जमत नसेल तर सरकारने दुसरा सक्षम अधिकारी नेमावा, अशी मागणीही आदित्य यांनी अश्विनी भिडे यांचा नामोल्लेख न करता केली.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल: प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी कॉंग्रेससोबत युतीचे मार्ग बंद झाले अशी घोषणा केली. तसेच, त्यांनी शिवसेनेला एक सल्लादेखील दिला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा ‘राहुल गांधी’ होऊ द्यायचा नसेल तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं युतीत मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरे ‘वरळी’ विधानसभेतून लढणार हे जवळपास निश्चित
राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून लढणार असल्याची घोषणा आमदार अनिल परब यांनी वरळीतल्या शिवसैनिकांनामध्ये केली आहे. वरळीतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केल्याचे समोर आले आहे. तसेच ‘कामाला लाग‘, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. याआधी युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी देखील इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची मागणी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
निवडणूक कर्जमुक्ती, पीक विमा, महिलांचे प्रश्न, दुष्काळमुक्त महाराष्ट्र मुद्यांवर लढणार: आदित्य ठाकरे
विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. युवा सेनाप्रमुख आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची भावना आहे. यावर सूचक मौन पाळत आदित्य मैदानात उतरले आहेत. आदित्य यांनी १८ जुलैपासून जळगावमधून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली होती. या यात्रेद्वारे ते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. सध्या या यात्रेचा तिसरा टप्पा सुरू असून ती नागपुरात पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंच्या आवाजाची खिल्ली उडवणारे राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव सेनेत प्रवेश करणार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार गळती लागली आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष राहिलेले सचिन अहिर यांनी पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता, तर माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आता कोकणात राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असणारे भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी -
बीडीडी चाळ पुनर्विकास समितीतून सेनेला डावललं; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर नाराजी
मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील विविध ठिकाणच्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबतीत ३१ ऑगस्टला भेट घेणार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. म्हाडाच्या प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात गुरुवारी वांद्रे येथील म्हाडा भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ही त्यांनी ही माहिती दिली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी येत्या २६ तारखेला प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये याबाबतचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असेही सांगण्यात आले. यावेळी शिवसेनेचे इतर आमदारही उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
देशभरात प्लॅस्टिक बंदी कठोरपणे करा: आदित्य ठाकरे
संपूर्ण देशात प्लॅस्टिकबंदी कायदा करून कडक अंमलबजावणी करा, अशी मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू झाली असून अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु आता ‘सिंगल यूज’ प्लॅस्टिक देशातून हद्दपार करण्याची गरज असून त्यासाठी कठोर कायदा करून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
ठाण्यात आदित्य ठाकरेंचा ताफा खड्ड्यांमुळे वाहतुककोंडीत अडकला; खापर फोडलं मेट्रो प्रशासनावर
मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमधील महानगर पालिकेत देखील शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईप्रमाणेच या शहरातील पायाभूत सुविधांची अवस्था देखील देखील बकाल झाली आहे. अगदी रोजच्या प्रवासात सामान्य शहरवासीयांचा अर्धा वेळ या प्रवासातच निघून जातो. त्यात खड्यांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढलं असून प्रवासात एखाद्याचा जीव जाण यात काहीच नवीन उरलेलं नाही. मुंबई, ठाणे. कल्याण-डोंबिवली या शहरांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं स्थानिक नागरिकांचं देखील म्हणणं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही: आदित्य ठाकरे
लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. याच पार्श्वभूमीवर युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्याच्या जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. रविवारी सकाळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा परभणीहुन बीड जिल्ह्यात पोहोचली आहे. यावेळी त्यांनी बीडमध्ये नागरिकांशी संवाद साधला यावेळी बोलताना शेतकऱ्यांविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही अस विधान केले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News