महत्वाच्या बातम्या
-
संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार: निलेश राणे
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतात शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसविण्याचे भाष्य केले होते. त्याला अनुसरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
वरळी की शिवडी विधानसभा? आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?
मागील काही दिवसांपासून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची राजकीय चर्चा रंगली होती. मात्र प्रत्यक्ष ते अधिकृतपणे शिवसेनेमध्ये कोणीही बोलण्यास तयार नाही. परंतु आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं खात्रीलायक वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आहे. त्यासाठी वरळी किंवा शिवडी विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यासाठी अंतर्गत चाचपणी सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
वरळी विधानसभा लढाई; रस्त्यावरील खड्डयांनी त्रस्त जनता विरुद्ध नाईट लाईफ अशी असेल
शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता शिवसेनेतच जोर धरू लागली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची पूर्ण चाचपणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेने केल्याची खात्रीलायक माहिती प्रसार माध्यमांकडे आहे. युवा सेनेचे सरचिटणीस व आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून या विषयाची माहिती सार्वजनिक केली. संबंधित पोस्टमध्ये लिहिले की, ‘हीच वेळ आहे हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय!’ त्यामुळे ठाकरे कुटुंबात आदित्य यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जाते.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा लढवण्याची शक्यता
शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता शिवसेनेतच जोर धरू लागली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची पूर्ण चाचपणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेने केल्याची खात्रीलायक माहिती प्रसार माध्यमांकडे आहे. युवा सेनेचे सरचिटणीस व आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून या विषयाची माहिती सार्वजनिक केली. संबंधित पोस्टमध्ये लिहिले की, ‘हीच वेळ आहे हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय!’ त्यामुळे ठाकरे कुटुंबात आदित्य यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जाते.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. देशात पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असे म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केलं. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल, अशी व्यंगात्मक टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली. शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी आयोजित सभेत आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.
6 वर्षांपूर्वी -
‘युवांचा आदित्य’मध्ये आदित्य ठाकरेंवर प्रश्नांचा भडीमार, पण टोलवायचं कसं ते मात्र शिकले?
जास्तीत जास्त तरुणांशी स्वतःला आणि पक्षाला जोडण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ‘युवांचा आदित्य’ या कार्यक्रमाच्या माध्यमांतून एक प्रयत्न केला. मात्र यावेळी अनेकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आणि भारताच्या राजकारणात वेळ मारून घेण्याची किंवा विषय टोलवण्याची कला अवगत असणारेच अधिक टिकतात हे सर्वश्रुत असल्याने आदित्य ठाकरेंची ती पोलिटिकल सायन्सची कला यावेळी पाहायला मिळाली. त्यामुळे खोलवर मूळ पोहोचलेला पक्ष आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आदित्य ठाकरे अधिक भक्कम करू पाहत आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
आता डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल: नीलेश राणे
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी मुंबई नाइट लाइफची मागणी देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार पुन्हा चालू झाले, अशी बोचरी टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
वाळलेल्या कापसाला 'कापूस सुकून गेलाय' असं आदित्य म्हणाले, अन शेतकरी सुद्धा हसले
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ते दुष्काळग्रस्त भागांना भेटी देत आहेत. काल नांदेडपासून सुरु झालेला त्यांचा दौरा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील साळवा गावाला भेट देण्यापर्यंत झाला.
6 वर्षांपूर्वी -
होय जाणारच अमितच्या लग्नाला, त्यात राजकारण नाही! आदित्य ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेचं लग्न येत्या २७ जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिकाही मातोश्रीवर नेऊन दिली, उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला लग्नाचे निमंत्रण दिले. परंतु, पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना लग्नाला जाणार का असा गमतीने प्रश्न विचारला.
6 वर्षांपूर्वी -
‘थर्टी फर्स्ट’ला नाईट-लाईफला परवानगी देण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
येत्या थर्टी फर्स्टला आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई शहरातील सर्व ठिकाणं रात्रभर कायदेशीररित्या आणि अधिकृतपणे खुली ठेवावीत अशी लेखी मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वार मागणी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंना खुलं पत्र; ३ दशकं सत्ता, तरी औरंगाबादचे नाव 'कचराबाद' असे झाले आहे?
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेच्यावतीने अनेक विकासकामांचे उदघाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये हजर झाले आहेत. त्यामुळे एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत एका खुल्या पत्राद्वारे सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: राजस्थानमध्ये आदित्य ठाकरेंकडे मतदारांचं दुर्लक्ष, प्रचार वाया गेला
शिवसेनेनं राष्ट्रीय पक्ष बनण्याचा ध्यास घेतला खरा, परंतु सर्वच ठिकाणी अपयशाची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात उतरलेले आदित्य ठाकरे यांना पूर्णतः अपयश आले आहे. इथल्या मतदारांनी मतदान करताना शिवसेनेला साधं विचारात सुद्धा घेतले नसल्याचं दिसतं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान गाडीचे टायर फुटले
सध्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या आलिशान गाडीला मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ खड्ड्यांमुळे फटका बसला असून त्यांच्या रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले. गुरुवारी मध्य रात्री ही घटना घडल्याचे समजत.
6 वर्षांपूर्वी -
काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या पेंग्विनच्या यकृतात बिघाड झाल्याने दुर्दैवी मृत्य
मुंबईतील राणीच्या बागेत दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोड्याला ९ दिवसांपूर्वी बाळ झाले होते. भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात म्हणजे राणीच्या बागेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा हलला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तसेच मुंबईकरांसाठी सुद्धा आनंदाचं बातमी आली होती.
6 वर्षांपूर्वी -
आनंदाची बातमी; राणीच्या बागेत नवजात पेंग्विनचा जन्म: आदित्य ठाकरेंचं ट्विट
मुंबईतील राणीच्या बागेत मध्यरात्री दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोड्याला आज बाळ झाले आहे. भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात म्हणजे राणीच्या बागेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा हलला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेच्या डझनभर मंत्र्यांची सत्तेत कामगिरी तरी काय? आता पुन्हां एकहाती सत्ता?
सध्या भाजपसोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत सामील असलेली शिवसेना आणि त्यांच्या डझनभर मंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारीतील खात्यांमार्फत राज्यातील जनतेसाठी कोणती विकासाची कामं केली ते माहित नसल्याने शिवसेना हळुवार पणे भावनिक मुद्यांकडे वळत असल्याचे चित्र आहे. आज शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन असल्याने मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
युवासेना अध्यक्षांची महत्वाकांक्षी 'टॅब' योजने 'अव्यवहार्यतेमुळे' गुंडाळली
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या मुंबई महापालिकेतील ‘टॅब’ वाटप योजनेची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती. परंतु सखोल अभ्यास न करताच तिची अंमलबजावणी करण्याची घाई अखेर ‘टॅब’ योजना गुंडाळण्यापर्यंत जाऊन पोहोचल्याच समजतं. सेनेचे नगरसेवक त्यावर उघड पणे बोलणं सुद्धा टाळत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मनसे पादचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर होती, तर सेना फेरीवाल्यांच्या
काही महिन्यापूर्वी राज ठाकरे यांचा मनसे पक्ष एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील दुर्घटनेनंतर मुंबई शहरातील पादचाऱ्यांच्या आणि लाखो प्रवाशांच्या पाठीशी खंबीर पणे उभी होती.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर : शिवसेना
२०१९ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा आज शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली.
7 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंना नेतेपद नाहीच, तर आदित्य ठाकरेची नेतेपदी वर्णी.
आज मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंची नेतेपदी नियुक्ती झाल्याचे घोषित करण्यात आले.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार