BREAKING | राज्यपालांचा अधिवेशन बालविण्याचा निर्णय घटनाबाह्य | सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरोधात गेल्यास आम्हालाही...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेनं याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी होण्याची शक्यता आहे. अभिषेक मनू सिंघवी शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. मात्र आता घटनातज्ञ जो दावा करत आहेत त्यानुसार राज्यपालांवर संशयाचे ढग अधिक गडद झाले आहेत. विशेष म्हणजे घटना तज्ज्ञांनी दिलेली माहिती लोकशाहीसाठी अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक असल्याची जोरदार टीका समाज माध्यमांवर आणि सामान्य लोकांकडून केली जाऊ लागली आहे.
3 वर्षांपूर्वी