Agneepath Scheme | सीमेवर देशासाठी सेवा बजावणं सुद्धा कंत्राटी नोकरीचा प्रयोग? | देशभर मोदी सरकारविरोधात रोष
राष्ट्रीय सुरक्षा हा प्रयोगाचा विषय होऊ शकतो का? आज हा प्रश्न आहे कारण जवळपास दोन वर्षांनंतर लष्करात भरतीसाठी सरकारकडून काही मोठ्या घोषणा झाल्या आहेत आणि त्याचबरोबर हा प्रश्नही समांतर चालू आहे. अलिकडेच भारतीय लष्करातील नव्या भरतीच्या संदर्भात सरकारने ‘अग्निपथ’ प्रवेश योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या घोषणेमुळे देशातील अनेक भागांत युवा चळवळी सुरू झाल्या आहेत. उदाहरणार्थ, उत्तर भारतात हे आंदोलन उग्र रूप धारण करताना दिसत आहे. या तरुणांबरोबरच देशातील माजी लष्करी अधिकारीही या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
3 वर्षांपूर्वी