महत्वाच्या बातम्या
-
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला | आता अजित पवारांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काही लोक कधी कधी काही तरी बोलून जातात, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंचं नाव घेणं देखील टाळलं.
4 वर्षांपूर्वी -
Bhuvikas Bank | भूविकास बँकेची 348 कोटींची कर्जे माफ | 33,895 शेतकऱ्यांना लाभ - उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेची सरसकट थकीत शेती कर्जे माफ करण्याचा तसेच कामगारांची देणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना आणि ३ हजार २९६ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
गडकरींच्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, परंतु, कुठल्याही....
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना शिवसेनेचे स्थानिक प्रतिनिधी विरोध करत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे रखडली असल्याचे सांगितले होते. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल, असे पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी आज (रविवारी) 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या, यावेळी ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे - अजित पवार
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. आज दुपारी १:३० वाजता पूरग्रस्ते चिपळूण आणि ४:३० वाजता महाड शहाराची ते पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत असल्याने मदत कार्यात विलंब होतो, त्यामुळे तूर्तास नेत्यांनी दौरे थांबवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. परंतु, आज काँग्रेसचे नेते राऊत आणि आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. काही दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पावसामुळे कोकणात मोठ्या प्रममाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पदाचा मान बाजूला ठेवत उपमुख्यमंत्र्यांकडून कार्यकर्त्याच्या चहा स्टॉलचं उद्घाटन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना त्यांची दुसरी बाजू बारामतीकरांना पाहायला मिळतात. अजितदादांचं असंच एक दिलखुलास रुप आज बारामतीत पहायला मिळाले. माझ्या चहाच्या टपरीचं उद्घाटन करा, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखलवल्यावर अजितदादांनी उद्घाटन तर केलंच शिवाय त्याच्या टपरीतल्या चहाचाही आस्वादही घेतला.
4 वर्षांपूर्वी -
स्वप्नील लोणकर आत्महत्या | SEBC संदर्भात 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने मुलाखती रखडल्या - उपमुख्यमंत्री
एमपीएससी परीक्षेतील उमेदवार स्वप्नील लोणकर यांनी केलेल्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. त्यावरुन, सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच जुपल्याचे पाहायला मिळाले. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांस 50 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली.
4 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टींनी ४३ कारखान्यांसंदर्भात ईडी'कडे फेऱ्या मारलेल्या | ED'ने केवळ जरंडेश्वर साखर कारखाना निवडला?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता. अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या प्रकरणात संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी केली जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
ED'ला कोणीतरी सांगतोय, अमूक-अमूक माणूस त्रासदायक ठरतोय | त्याचा काटा काढायचाय - राजू शेट्टी
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता. अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या प्रकरणात संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी केली जाऊ शकते अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील महसूलमंत्री असताना त्यांच्यावर आ. राजेश क्षीरसागर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते - उपमुख्यमंत्री
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करण्यात आलीय. भारतीय जनता पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत याबाबतचा ठराव पारित करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना एक निवेदन पाठवलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या या ठरावावर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलंय.
4 वर्षांपूर्वी -
पुणे आंबिल ओढा प्रकरण | माझा काय संबंध ? मला का बदनाम केले जात आहे - अजित पवार
काही दिवसापूर्वी पुणे महापालिकेने दांडेकर पुलानजीक असलेल्या आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण कारवाई केली होती. अतिक्रमण कारवाई दरम्यान वाद उफाळला होता. त्यावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांस टीकाटिपणी करू लागले. याच मुद्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील घरांवरील कारवाईचा आणि माझा काय संबंध ? मला का बदनाम केले जात आहे, अशी विचारणा करीत या कारवाईत हस्तक्षेप नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावेळी पवार हे मंगळवारी मुंबईतील एका बैठकीत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
अविनाश भोसलेंवरील ED कारवाई हा अजित पवारांवर दबाव | ED भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी हे करतय - अंजली दमानिया
अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त करत केलेल्या कारवाईवरुन भाजपा किंवा केंद्राकडून आदेश मिळाल्यानंतर ईडी कारवाई करतं हे स्पष्ट दिसत आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा वापर सतत होताना दिसत आहे,” अशी टीका अंजली दमानिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात शनिवारी-रविवारी दुकानं बंद राहणार | फिरायला जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करणार
पुण्यात शनिवार आणि रविवार दुकानं बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी निर्बंध अजून कठोर करण्याचा इशारा देताना विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं जाईल असं सांगितलं आहे. तसंच पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सगळ्या लोकप्रतिनिधींना अडवून गाडा बोलणारे पण लोकप्रतिनिधीच आहेत - अजित पवार
मराठा आरक्षणासाठी काल (१४ जून) छत्रपती संभाजीराजे यांनी उदयनराजेंची पुण्यात भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंनी संभाजीराजेंच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. तसंच संभाजीराजे यांनी अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचं सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | कोल्हापुरात उपमुख्यमंत्री आणि श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट, मालोजीराजेही उपस्थित
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. आज(दि.14)त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली आहे. कोल्हापूरातील न्यू पॅलेस येथे ही भेट होत आहे. या भेटीवेळी संभाजीराजे छत्रपती यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे हेदेखील उपस्थित आहेत. या भेटीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर यांची काय लायकी राहिली असती - निलेश राणे
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष करण्याचा सपाटा लागल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला चंद्रकांत पाटील रोज नवनवी विधानं करून अजित पवारांना लक्ष करत आहेत. त्यावर अजित पवार यांनी तिखट शब्दात प्रतिउत्तर दिल्यावर भाजपचे इतर नेते देखील संतापल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
ही लोकं काही काळ आमच्यासोबतही होती, त्यामुळे त्यांचा आवाका किती आहे हे आम्हाला ठाऊक आहे - अजित पवार
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही पंतप्रधानांना भेटा आणि तौक्ते चक्रीवादळासाठी महाराष्ट्राला योग्य ती मदत द्या असे सांगा - उपमुख्यमंत्री
मुंबईतील मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मार्गिकांचे सोमवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमात अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासमोर काही प्रस्ताव मांडले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याशी बोलताना महाराष्ट्राला काय मदत हवी, अशी विचारणा केली. त्यामुळे मी रामदास आठवले यांना तौक्ते चक्रीवादळातील पीडितांना केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी, अशी विनंती करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मिडीयासाठी खर्च आणि यंत्रणा नको | सोशल मीडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा निर्णय रद्द
उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१३ मे) दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही.
4 वर्षांपूर्वी -
उपमुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर ६ कोटी खर्चाची योजना | तर मोदी सरकारचा २०२० मध्ये ७१३ कोटीचा मार्केटिंग विक्रम
राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने काल यासंदर्भातील आदेश जारी केले आहे. या आदेशात अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघेल.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | पुण्यात लहान मुलांसाठी राखीव रुग्णालय - उपमुख्यमंत्री
लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे पुण्यात लहान मुलांसाठी रुग्णालय राखीव करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर ज्यांना कोरोनाचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्याला प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA