महत्वाच्या बातम्या
-
विकृतीचा कळस गाठणाऱ्या आघाडी-बिघाडी फेसबुक पेज विरोधात संताप वाढतो आहे? सविस्तर
सध्या समाज माध्यमं हा एखादा विषय चिघळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मात्र विषयाला अनुसरून होणारी टीका समाज माध्यमं देखील स्वीकारतात, मात्र यात अनेक फेसबुक पेजेस विकृतीचा कळस गाठताना दिसत आहेत. त्यात सर्वाधिक संताप हा ‘आघाडी-बिघाडी’ या पेजविरोधात होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावर मार्केटिंगसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा देखील खर्च केला जात असल्याचं निदर्शनास आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिखर बँक घोटाळा: सुप्रीम कोर्टाने सहा विशेष याचिका फेटाळल्या
महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश योग्यच असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालकांसह राज्यातील बड्या नेत्यांसाठी हा झटका मानला जात आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीतही यामुळे वाढ होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सहकारी बँक घोटाळा: राष्ट्रवादी, सेनेच्या नेत्यांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे आर्थिक गुन्हे शाखेने (ईवोडब्ल्यू) दिले आहेत. २५ हजार कोटींच्या कर्जवाटप घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण, आनंदराव अडसूळ यांच्यासह इतर बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे याचिकेत नमूद आहे. अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट; ईव्हीएमविषयी चर्चा झाल्याची शक्यता
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. परंतु विरोधकांकडून भारतीय जनता पक्षाने हा विजय ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून मिळवला असल्याची टीका होत आहे. त्यामुळे विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काहींना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही; त्यामुळे असे निर्णय घेतात: अजित पवार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकावर एक राजकीय धक्के बसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या माजी आणि विद्यमान आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा सपाटा लावला होता, तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेत प्रवेशाचा सपाटा लावला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात प्रतिनिधी म्हणून धाडण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईतील वरळी किंवा शिवडी या दोन विधानसभा मतदारसंघापैकी एकाची निवड करण्याची दाट शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
आगामी विधानसभा: डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी: अजित पवार
शिरूरचे नवनिर्वाचित आणि जाईंट किलर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे एनसीपी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री आणि एनसीपीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केले. डॉ. अमोल कोल्हे खासदार झाल्यापासून भोसरीत आले नसल्याच्या तक्रारींना उत्तर देताना ते आता शिरूरपुरते मर्यादित नसून त्यांचा राज्यासाठी विचार सुरू असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष सध्या त्यांना मोठी जवाबदारी सोपविण्याचा गंभीर पणे विचार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
कॉंग्रेस आघाडीबरोबर येण्याची वंचितची मानसिकता नाही: अजित पवार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र घेत भारतीय जनता पक्षाच्या युतीला शह देण्याचा चंग कॉंग्रेस आघाडीने बांधला आहे. त्यादृष्टीने कॉंग्रेस आणि एनसीपीने इतर पक्षांशी आघाडी बाबत चर्चा सुरु केल्या आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीची कॉंग्रेस आघाडी बरोबर येण्याची मानसिकता नसल्याची माहिती एनसीपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंना परदेश दौरा संपल्यावर शेतकऱ्यांची आठवण: अजित पवार
महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागली असून, आतापासूनच आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहे. त्यातच, परदेशी दौरे करून आल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण येत असल्याची टीका, एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. एनसीपी पक्षाचा आज २० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत 'तो' निर्णय झाल्यास भाजप कार्यकर्ते गळफास लावून घेणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडणार आहे. पवार यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी बारामतीकडे वर्ग केले आहे असा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे. दरम्यान आज होणा-या मुंबई येथील बैठकीत बारामतीचे पाणी जैसे थे राहावे, असा निर्णय झाल्यास सांगोला तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते आणि तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते शिवाजी चौक सांगोला येथे गळफास लावून घेणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत पाकिस्तानचं पाणी अडवण्याच्या धमक्या देऊन बारामतीचं पाणी बंद?
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजा दुर्लक्षित करून भाजपचे सर्वच नेते मंडळी भाषणात केवळ पाकिस्तानवर केंद्रित झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर भाषणात थेट पाकिस्तानचं पाणी रोखण्याची भाषा केली होती. भारतातुन वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखून पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करणारे आज बहुमताने केंद्रात सत्तेत येताच पाकिस्तनाला विसरले असून, देशातील सामान्य लोकांच्या तोंडाचे पाणी पळवण्याचे काम करत आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
मावळ: पार्थ पवारांचा पदार्पणातच पराभव; शिवसेनेच्या श्रीरंग बाराणेंकडून धोबीपछाड!
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार थेट लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने या मतदार संघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना तगडी स्पर्धा होती. त्यात विरोधी उमेदवार थेट पवार घराण्यातील असल्याने मावळ लोकसभा मतदासंघ प्रसार माध्यमांसाठी मोठा चर्चेचा विषय झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
अजित पवारांनी आझाद मैदानात घेतली आंदोलक मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांची भेट
राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन छेडलं आहे. एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या २५० विद्यार्थ्यांचं भविष्य सध्या सरकारच्या गलथान कारभारामुळे अंधारात आहे. या विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला? असा सवाल रोखठोक अजित पवार यांनी प्रसार माध्यमांकडे उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
बोलायला मुद्दे नाहीत म्हणून जातीचे कार्ड खेळताय मोदी : अजित पवार
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून जोरदार प्रचार सभा घेतल्या जात आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला जातीवरून टार्गेट करण्यात येत असल्याचं सांगितले. यावर अजित पवार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. बोलायला मुद्दे नाहीत म्हणून नरेंद्र मोदी जातीचे कार्ड खेळताय आशी टीका एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी केली आहे. आयोजीत प्रचार सभेत त्यांनी प्रसार माध्यमांसमोर मत व्यक्त केलं.
6 वर्षांपूर्वी -
त्या चुकीसाठी पार्थला फासावर लटकवणार का? अजित पवार
माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल. इतर तालुक्यांप्रमाणेच सांगोला तालुक्यातूनही संजय शिंदेंना आघाडी मिळाली पाहिजे, अन्यथा तुमच्या डोक्यावर उरलेले केसदेखील राहणार नाहीत असा सज्जड दम, एनसीपीचे नेते अजित पवार यांनी एनसीपीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांना भर सभेत दिला.
6 वर्षांपूर्वी -
ग्रामीण भागात आले की 'युती गेली खड्ड्यात' अन मुंबईत गुपचूप युतीची बोलणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा राज्याच्या ग्रामीण भागात दौऱ्यावर गेले की, ‘युती गेली खड्ड्यात’, अशा घोषणा देतात. त्यानंतर मुंबईत पोहोचले की पाठच्या दाराने गुपचूप मुख्यमंत्र्यांसोबत निवडणुकसंदर्भात युतीची चर्चा सुरु करतात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भर सभेत केली.
6 वर्षांपूर्वी -
सिंचन घोटाळा; माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास : अजित पवार
महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकण विभागातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारास संबंधित खात्याचे मंत्री म्हणून तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार हेच पूर्णपणे जबाबदार आहेत, असे प्रतिज्ञापत्र अँटी करप्शन विभागाने हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी रीतसर दाखल करण्यात आले आहे. त्यावर प्रसार माध्यमांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न केला असता माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुका आल्यावर भाजप - शिवसेनेला राम आठवतो
निवडणुका जवळ आल्या की भाजप आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींना लगेच राम आठवतो, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा युतीबाबत कोणताही निर्णय झाला तरी काँग्रेस आणि एनसीपी’ची आघाडी होणारच आहे, असे सुद्धा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, उद्धवला सांभाळा! त्याचा अर्थ काल समजला: रोहित पवार
राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याची अजून एक नवी समोर येत आहे. होय! एनसीपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवार आता सामनातील टीकेला उत्तर देण्यासाठी आणि काकाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार हे राजकारणातील टाकाऊ माल आहेत, अशी हलक्या भाषेतील टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंना रोखठोक प्रतिउत्तर दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचं स्मारक ५ वर्षे का रेंगाळले या प्रश्नामुळे उद्धव यांना मिरची झोंबली: अजित पवार
सामनातून झालेल्या टीकेतून शिवसेनेकडून तीच भाषा अपेक्षित होती. परंतु उद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या का झोंबल्या ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अजित पवार या गटारी किड्याला आम्ही किंमत देत नाही: शिवसेना
एनसीपीचे ज्येष्ठ नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेने सामना उभा मुखपत्रातून जहरी टीका केली आहे. अजित पवार टीका करताना उद्धव ठाकरे यांना म्हणाले होते की, यांच्या काय तर म्हणे २५ तारखेला अयोध्येला जाणार. काय तिथं दिवा लावणार तिथे! अरे तुला सत्ता असताना तुझ्या बापाचं स्मारक ५ वर्षात करता आलं नाही. आणि तिथं अयोध्येला जाऊन काय करणार आहे?, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. दरम्यान, अजित पवारांची ती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागल्याचे जाणवते आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय