महत्वाच्या बातम्या
-
जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री - अजित पवार
साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
सीबीआय कारवाईच्या पुड्या सोडून ED'मार्गे अजित पवार यांचं कुटुंब चौकशीच्या रडारवर? | राजकीय ब्लॅकमेलिंगची शंका
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता. अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या प्रकरणात संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी केली जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदा महाराष्ट्रात मंजूर होणार नाही | उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान
शेतकरी विरोधी कोणतीही भूमिका घेऊन केंद्र सरकारने मंजूर केलेले बिल हे महाराष्ट्रात मंजूर केले जाणार नाही, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (गुरुवारी) सय्यद पिंपरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी त्यांनी केंद्रीय कृषी कायद्याबाबत आपले मत व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
भाजप अध्यात्मिक आघाडीच्या नेत्याच्या इशाऱ्यासंबंधित प्रश्न | अजितदादा म्हणाले, कोण तुषार भोसले?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी तुषार भोसले यांनी वारीबाबत राज्य सरकारला इशारा दिल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी कोण आहेत तुषार भोसले? असा सवाल पवारांनी केला. त्यावर ते भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी | उपमुख्यमंत्र्यांनी सुनावलं
राज्याच्या जीएसटीची थकलेली रक्कम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. यावेळी अजित पवारांनी जीएसटीची थकलेली रक्कम २४ हजार ३०६ कोटी द्यावेत अशी मागणी केली होती. याच जीएसटीच्या रकमेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून लोकशाही मोडून काढण्याच प्रयत्न | पत्रकारितेची अवस्था सुद्धा गंभीर - अजित पवार
केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचं काम सुरु आहे. लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु असून हे गंभीर आहे अशी टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राने सुरुवातीला भारतातील कोरोना लस परदेशात पाठवली, त्यामुळे भारतात तुटवडा निर्माण झाला - उपमुख्यमंत्री
सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी लसींचे डोस मागितले आहेत. मात्र, आतापर्यंत आपल्याला फक्त 3 लाख डोस मिळाले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगाने लसीकरण करण्याचा मनसुबा राज्य सरकारला अंमलात आणता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर | उपमुख्यमंत्र्यांची भाजप नेते आणि मनसेच्या शॅडो मंत्र्यासोबत बैठका | भाजप टेन्शनमध्ये
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने असून दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना मैदानात उतरवलं. दोन्हीही उमेदवार तगडे असल्याने उत्सुकता निर्माण झालेली असतानाच भाजपच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
माझी कोणतीही चौकशी करायची ती करा | उपमुख्यमंत्र्यांचं खुलं आव्हान
सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात असल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझे प्रकरणी झालेले आऱोप फेटाळून लावत, या प्रकरणी माझी कोणतीही चौकशी करावी त्यास माझी तयारी आहे. असे खुले आव्हान विरोधकांना दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | अजून तरी लॉकडाऊनचा निर्णय नाही | नियम पाळा... उपमुख्यमंत्र्यांकडून अल्टिमेटम
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या जिल्ह्यांत रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशात राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार की नाही असा प्रश्न लोकांना पडला आहे. दरम्यान, पुण्यात झपट्याने रुग्ण संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन केला जाणार का असा सवाल नागरिकांना पडला असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सध्या तरी लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगितले आहे. आज (२६ मार्च) पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ उमेदवारी | अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून, त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मतं विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
रामटेकमधील विकास कामांना पूर्वी पेक्षा दुप्पट निधी | भाजपचे माजी आमदार अजित पवारांवर खुश
रामटेक तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी मिळाल्याने, भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानलेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तिर्थक्षेत्राच्या विकासाला महाविकास आघाडी सरकारने 14 कोटी रुपये मंजूर केलाय. फडणवीस सरकारच्या काळात सात कोटी रुपये निधी देण्यात आला होता, पण नंतर निधी मिळाला नाही.
4 वर्षांपूर्वी -
कार्यकर्ते आणि आमदार सोबत राहावेत | म्हणून सरकार पडण्याचं गाजर दाखवावं लागतं - उपमुख्यमंत्री
राज्य सरकार पडणार आहे हे प्रमुख विरोधी पक्षांना वारंवार बोलावच लागतं. 1995 ते 99च्या काळात आम्ही एकूण 80 जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्तेबरोबर राहण्याकरिता आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार पलटवार केला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
चंपा'चे ते वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे | उपमुख्यमंत्री संतापले
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी पुण्यात ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘राजकारणात येण्याआधी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. पण, राजकारणात आल्यावर समजले की, शरद पवार खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
4 वर्षांपूर्वी -
कन्नडिगांची मुजोरी | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळला
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा काल आठवा स्मृतीदिन झाला. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
आज आठवा स्मृतीदिन | बाळासाहेबांचे 'ते' स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करू - अजित पवार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५’वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
4 वर्षांपूर्वी -
गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालयीन कामकाज सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम केला, ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करतील. यादरम्यान मात्र अजित पवार दिसेनासे झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याचे त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अजित पवारांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. अजित पवार हे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना दिसले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आ. शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांची पुण्यात तासभर चर्चा | राजकीय चर्चा रंगली
राजकीय वर्तुळात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते भेटले की चर्चांना उधाण येते. असेच काहीसे उधाण पुन्हा एकदा आले आहे. साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशाप्रकारे भेट घेतली होती.
5 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार योजनेची SIT चौकशी | कॅगच्या अहवालानंतर कॅबिनेटचा निर्णय - उपमुख्यमंत्री
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून यावर अजून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नसलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलंय. राजकीय जीवनात अनेक भेटीगाठी होत असतात, त्यामुळे भेट झाली म्हणजे काही तरी काळंबेरं आहे असं समजू नये, असं अजित दादा म्हणाले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA